Breaking News

Ramprahar Team

पेणच्या बहिराम कोटक येथील बंधार्याला उधाणाचा तडाखा

ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे शेकडो एकर शेती बचावली पेण : प्रतिनिधी जागतीक बँकेच्या सहकार्याने पेण तालुक्यातील नारवेल-बेनवले येथील 17 किलोमीटरच्या बंधार्‍याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र दोन दिवसांच्या उधाणाचा फटका या योजनेच्या कामाला बसला असून या योजनेतील बहिराम कोटक गावाजवळच्या बाह्यकाट्याला सकाळी नऊच्या सुमारास खांड गेली. मात्र ग्रामस्थ अमरचंद पाटील, रामकृष्ण पाटील, …

Read More »

कर्जत खांडस भागात वणवा

 300 एकरमधील वनसंपदा नष्ट; जनावरांच्या चार्‍याचाही प्रश्न कर्जत : बातमीदार तालुक्यातील खांडस भागात शनिवारी (दि. 3)अचानक लागलेल्या वणव्यात तब्बल 300 एकर जमिनीवरील गवत, झाडेझुडपे जळून नष्ट झाली आहेत. त्यामुळे आता प्रामुख्याने या भागातील जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच पाणीटंचाई असलेल्या या भागात लागलेला हा वणवा सर्वांच्या डोळ्यात पाणी …

Read More »

रेवदंड्यामध्ये विनामास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई

रेवदंडा : प्रतिनिधी येथील बाजारपेठेत विना मास्क फिरणार्‍यांवर रेवदंडा ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे येथून जा-ये करणारे प्रवासी तसेच ग्रामस्थांना चांगलाच धाक बसला असून आता प्रत्येकांच्या चेहर्‍यावर मास्क दिसू लागला.  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रेवदंंडा ग्रामपंचायतीने मास्क व सॅनिटायझर वापरण्याचे तसेच सुरक्षीत अंतर ठेवण्याचे आवाहन केले …

Read More »

खालापुरात दोन वाहने उलटली

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील महामार्गावर रविवारी (दि. 4) सकाळी दोन वाहने उलटण्याच्या घटना घडल्या असून, त्यात जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुंबई – पुणे महामार्गावरील हॉटेल बागेश्री जवळ रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास खोपोलीकडून पनवेलच्या दिशेने जाणारा ट्रक (एमएच-46,एएफ-2500)  उलटला तर खोपोली – पेण मार्गावर …

Read More »

पेणमध्ये हजारो ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

पेण : प्रतिनिधी महावितरणने थकीत वीज देयकांची वसुलीसाठी पेण तालुक्यात मोहीम हाती घेतली असून, त्याचाच एक भाग म्हणून दोन हजार वीज ग्राहकांचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे.  पेण तालुक्यात 58 हजार 220 वीज ग्राहक असून  त्यातील 19 हजार 195 जणांनी गेल्या सहा महिन्यांतील वीज देयके वेळेवर भरलेली नाहीत. या ग्राहकांकडून …

Read More »

कर्जत तालुक्यात कोरोनाचा उद्रेक

सर्वाधिक 74 रुग्णांची नोंद; माथेरान ठरतेय हॉटस्पॉट कर्जत : बातमीदार तालुक्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढू लागला आहे. रविवारी (दि. 4) कर्जत तालुक्यात 74 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, शनिवारी दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने तालुक्यात घाबराट पसरली आहे. मागील महिन्यापासून कर्जत तालुक्यात पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येऊ लागले …

Read More »

नवोपक्रम स्पर्धेत कर्जत शिक्षण विभागाची बाजी

यु ट्यूब चॅनेल ठरतेय भारी कर्जत : बातमीदार तालुका शिक्षण विभागाच्या ’शिक्षण क्रांती’ यू ट्यूब चॅनलच्या कोरोना काळातील कामगिरीने राज्य शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आयोजित राज्यस्तरीय नवोप्रकम स्पर्धेत भरारी घेतली आहे. या उपक्रमाने कर्जत तालुका राज्यात चौथ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. गट शिक्षण अधिकारी संतोष दौंड यांच्या प्रयत्नाने तसेच …

Read More »

ओलमण-चेवणे रस्ता आठ दिवसातच उखडला

कर्जत : बातमीदार तालुक्यातील साळोख-ओलमन-चेवणे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा रस्ता काही दिवसातच उखडला असून, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात  खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवासी, वाहनचालक संताप व्यक्त करत असून, संबंधीत अधिकार्‍यांनी  पाहणी करून ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. वर्षोनुवर्षे …

Read More »

अलिबागचे पोलीस ठाणे होणार बालस्नेही

अलिबाग : प्रतिनिधी येथीले पोलीस ठाणे लवकरच बालस्नेही होणार आहे. बालकांच्या तक्रारी निराकरण, गुन्ह्यात अडकलेल्या बालकांचे पुनर्वसन आणि समुपदेशन करण्याचा प्रयत्न या बालस्नेही पोलीस केंद्रामार्फत केला जाणार आहे. कोकणात पहिल्यांदाच ही संकल्पना पोलिसांच्या माध्यमातून राबविली जाणार आहे. अलिबाग पोलीस ठाण्याच्या समोरील भागात या बालस्नेही पोलीस केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. …

Read More »

बॅग, मोबाइल चोरटा पनवेल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

पनवेल : प्रतिनिधी पनवेल रेल्वे स्टेशनवरून मुंबईला रवाना होणार्‍या कोईम्बतुर एक्सप्रेसमधील प्रवाशाची बॅग आणि पनवेल स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरील सी डब्ल्यू ऑफिसमधील कर्मचार्‍याचा मोबाइल पळवणार्‍या आरोपीस पनवेल रेल्वे सुरक्षा बलाने अटक केली आहे. कोईम्बतुर एक्सप्रेसमधून प्रवाशाची 30 हजार रुपयांसह एकूण 35 हजारांचा ऐवज असलेली बॅग पनवेल स्टेशनवरून गाडी सुटताना …

Read More »