Breaking News

Ramprahar Team

पनवेलमध्ये लवकरच कोरोना लस

सरकारी रुग्णालयात मोफत; खाजगी रुग्णालयात 250 रुपयांत लस खारघर : प्रतिनिधी पनवेलमध्ये कोरोना लस आता सर्वसामान्य नागरिकांसाठीही उपलब्ध होणार आहे. ही लस सरकारी रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात नागरिकांना घेता येणार आहे. पनवेल पालिका क्षेत्रात कोरोना लसीकरण पहिला व दुसरा टप्पा झाल्यानंतर आता शासनाच्या आदेशानुसार सर्वसामान्यांनादेखील ही लस घेता येणार आहे. याकरिता …

Read More »

चिरनेर येथील ट्रान्सफार्मर परिसराला आग

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील चिरनेर जवळील मोठे भोम परिसरातील रहिवाशांच्या घरात, दुकानात करण्यात येणार्‍या विद्युत वाहक ट्रान्सफार्मर परिसराला आग लागण्याची घटना शनिवारी (दि. 27) घडली. चिरनेर गावातील नागरिक व गावातील महावितरण कार्यालयातील कर्मचारी यांच्या प्रसंगावधानतेमूळे आग आटोक्यात आली असून मोठा अनर्थ टळला आहे. उरण महावितरण कार्यालयातील उप अभियंता हरिदास …

Read More »

खंडाळा घाटात अनियंत्रित कारची दुचाकीला धडक

खोपोली : प्रतिनिधी खंडाळा घाटातून खोपोलीकडे येत असलेली कार सायमाळ पुढील पोलीस चौकी उतारावर अनियंत्रित झाली. अनियंत्रित कारने एका दुचाकीला धडक दिली. झालेल्या अपघातात कार सुरक्षा कठडा तोडून रस्त्यावरून खाली गेल्याने कारचे मोठे नुकसान झाले. अपघातातील तिन्ही जखमींना खोपोली येथील रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले. यात दुचाकीवरील एक व कारमधील …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बोंडारपाड्यात अन्नदान

पनवेल : रामप्रहर वृत्त राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेल-रायगड यांच्या वतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70 व्या वाढदिवासानिमित्त 70 आयोजित कार्यक्रमांतर्गत रविवारी (दि. 28) पनवेल तालुक्यातील बोंडारपाडा याठिकाणी अन्नदान करण्यात आले. या उपक्रमावेळी सरपंच रंजनी गोमा ढुमणे, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, गोमा ढुमणे, भारत …

Read More »

इस्रोची 2021मधले पहिले यशस्वी प्रक्षेपण

पीएसएलव्ही-सी51, अमेझोनिया-1सह 18 पेलोड उपग्रह झेपावले नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने 2021 मधले पहिले प्रक्षेपण यशस्वीरित्या केले आहे. रविवारी सकाळी 10.24 वाजता श्रीहरीकोटा, सतीश धवन स्पेस सेंटर (एसडीएससी) येथून हे प्रक्षेपण झाले. चेन्नईपासून 100 कि.मी. अंतरावर असलेल्या आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा स्पेसपोर्टच्या प्रक्षेपण पॅडमधून प्रथमच भारतीय रॉकेट ब्राझीलच्या …

Read More »

काँग्रेसच्या नादाने स्वातंत्र्यवीर सावरकरांना अपमानित करू नका

देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा मुंबई ः प्रतिनिधी अनेक वर्षे शिवसेनेसोबत आणि मुख्यमंत्र्यांसोबत काम केले आहे. त्यामुळे त्यांना नको असला तरी फुकटचा सल्ला देतो की शेवटी सत्ता येते आणि जाते, पण जन्मभर इतिहास हे लिहून ठेवतो की सत्तेत कोणी किती लाचारी स्वीकारली. त्यामुळे कृपया काँग्रेसच्या नादी लागून स्वातंत्र्यवीर सावरकरांना अशा प्रकारे …

Read More »

पाण्याची जपणूक सामूहिक -पंतप्रधान

’कॅच द रेन’ अभियानाची ‘मन की बात’मधून माहिती नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी ’मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला.  पंतप्रधान मोदींची ही या वर्षातली दुसरी आणि एकूण 74 वी मन की बात आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, निसर्गाने पाण्याच्या रूपानं आपल्या सर्वांना एक सामूहिक भेट …

Read More »

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी पालिका प्रशासन सज्ज

नवी मुंबईत कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. त्यानुसार बंद करण्यात आलेले कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. तर सुरू असलेल्या …

Read More »

आशिया चषकावर टांगती तलवार

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था मागील वर्षी कोरोनामुळे आशिया चषक रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आशिया चषकाचे आयोजन या वर्षी करण्यात येणार आहे, पण यंदा होणारा आशिया चषकही रद्द होऊ शकतो असे संकेत मिळत आहेत. त्याचबरोबर आशिया चषक रद्द होण्याचे खापर पाकिस्तान आता भारतावर फोडत असल्याचेही पाहायला मिळत आहे. या वर्षी …

Read More »

कांदा-बटाट्याच्या दरात घसरण

नवी मुंबई : प्रतिनिधी कांद्याच्या दरात प्रचंड वाढ होत असताना घाऊक बाजारात मागील आठवड्याच्या तुलनेत दरात घट झाली आहे. 40 ते 45 रुपयांनी उपलब्ध असलेला कांदा 25 ते 30 रुपयांवर खाली उतरला आहे. दुसरीकडे बटाट्याच्या दरातही घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागच्या महिन्यापर्यंत अगदी, घाऊक बाजारात 20 ते 25 रुपये …

Read More »