Breaking News

Ramprahar Team

इनरव्हील क्लबकडून सात वर्गखोल्यांचे सुशोभीकरण

पनवेल : रामप्रहर वृत्त इनरव्हील क्लब बॉम्बे एअरपोर्ट, मिडवेस्ट आणि हार्बरसह इतर वेगवेगळ्या क्लबच्या वतीने युसूफ मेहेरअली सेंटर संचलित भानुबेन प्रवीण शहा माध्यमिक विद्यालयाच्या तारा येथील सात वर्गखोल्यांची दुरुस्ती व सुशोभीकरण इनरव्हीलच्या विविध क्लबकडून स्वखर्चाने करण्यात आले. या वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थी प्रवेश कार्यक्रम नुकताच क्लबच्या डी. सी. प्रेसिडेंट आमला मेहता यांच्या …

Read More »

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी माधव पाटील यांची फेरनिवड

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांची सर्वानुमते फेरनिवड झाली आहे. मंचची वार्षिक सर्वसाधारण बैठक बुधवारी (दि. 24) झाली. या वेळी सन 2021-22करिता कार्यकारिणीची बिनविरोध निवड जाहीर झाली. त्यानुसार अध्यक्षपदी पाटील, सरचिटणीसपदी मंदार दोंदे, उपाध्यक्षपदी हरेश साठे, खजिनदारपदी नितीन कोळी, कार्यकारिणी सदस्य …

Read More »

जातीय दंगा काबूविरोधी पथकाची रंगीत तालीम

पनवेल ः वार्ताहर पनवेल तालुका पोलीस ठाण्याकडून नुकतीच जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम पोलीस उपायुक्त परिमंडळ 2चे शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील शेडुंग टोल नाका येथे जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली. दंगा काबू योजनेच्या रंगीत तालमीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र …

Read More »

बलात्काराच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अटक

तब्बल 22 वर्षांनी पोलिसांना यश नवी मुंबई ः प्रतिनिधी भुवनेश्वर येथील बहुचर्चित बलात्काराच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी तब्बल 22 वर्षांनी पोलिसांच्या हाती लागला आहे. नाव बदलून अँबी व्हॅली येथे तो राहत असल्याची माहिती भुवनेश्वर पोलिसांना मिळाली होती. त्यांनी नवी मुंबई पोलिसांची मदत मागितली असता गुन्हे शाखेने शिताफीने त्याचा शोध घेऊन अटक …

Read More »

कृषी उत्पन्न बाजार समितीवर पालिकेची करडी नजर

कोविडविषयक नियमांची पायमल्ली करणार्‍यांवर तत्काळ कारवाई पनवेल ः वार्ताहर कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याचे वाढलेल्या रुग्णसंख्येवरून दिसून येत आहे. अशा परिस्थितीत पनवेल महानगरपालिकेने याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, सदस्य यांच्यासोबत मंगळवारी (दि. 23) बैठक घेऊन बाजार समितीत कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याची सूचना केली आहे. कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांवर …

Read More »

जेएनपीटीच्या कामगारांना दिलासा

थकबाकीची रक्कम अदा; आमदार महेश बालदी यांचे प्रयत्न उरण ः वार्ताहर जेएनपीटी टाऊनशिपमधील कचरा, गारबेज उचलणार्‍या कामगारांना कोणत्याही प्रकारची अग्रिमेंटची सुविधा उपलब्ध नव्हती. अशा कामगारांना मागील पाच वर्षांपासूनची थकबाकी मिळवून देण्याचे काम जेएनपीटी जनरल कामगार संघटनेने केले आहे. थकबाकीपोटी प्रत्येक कामगाराला सुमारे दीड लाख रुपये मिळवून देण्याचे काम युनियनच्या माध्यमातून …

Read More »

आपला तो बाब्या…

सार्वजनिक जीवनामध्ये वावरताना साधनशुचिता पाळावयाची असते हे काही नेते पूर्णत: विसरून गेले आहेत. किंबहुना, सामाजिक जीवनात काही मूल्ये पाळावीच लागतात हे त्यांच्या गावीच नसते. अशा अनीतीमान राजकारण्यांचे सध्या फावते आहे ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. सत्तेसाठी राजकारणात पडायचे आणि ती एकदा हस्तगत झाली की बेमुर्वतपणे वर्तन करायचे अशा प्रकारची मानसिकता …

Read More »

कर्जतचे प्रसादबुवा पाटील यांचा समाजरत्न पुरस्काराने सन्मान

कर्जत : बातमीदार भजनभूषण गजाननबुवा पाटील यांचे चिरंजीव आणि देशविदेशात भजनाचे कार्यक्रम करणारे प्रसादबुवा पाटील यांना नवी मुंबई येथील अँटी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया या संस्थेने राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. कै. गजाननबुवा पाटील यांचा भजन गायनाचा वारसा प्रसादबुवा पाटील समर्थपणे जपत असून, प्रसादबुवा यांनी स्वतः अनेक ओव्या …

Read More »

नागोठणे ग्रामपंचायतीकडून नागरिकांना आवाहन

नागोठणे :  प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीने पुन्हा डोके बाहेर काढले आहे. शहरात अद्याप एकही रुग्ण आढळून आला नसला तरी,  नागरिकांनी पूर्ण दक्षता घेताना मास्कचा वापर करावा, असे आवाहन नागोठणे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी केले आहे. नव्या कोरोनाविषयी जनजागृती होण्यासंदर्भात संपूर्ण शहरात दवंडीसुद्धा देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गतवर्षी  कोरोनाच्या …

Read More »

नागोठण्यात बिबट्याचे दर्शन

नागोठणे : प्रतिनिधी अनेक दशकानंतर नागोठणे शहराच्या परिसरात मंगळवारी रात्रीच्या दरम्यान एका व्यक्तीला बिबट्याचे दर्शन झाले. नागोठणे शहरात मुंबई- गोवा महामार्गालगत असणार्‍या एका हॉटेलच्या परिसरात वाघ फिरत असल्याचे एक व्यक्तीच्या निदर्शनास आले. त्याने उत्सुकतेने आपल्या मोबाइलवर त्याचे चित्रणसुद्धा केले. महामार्गावरून जाणार्‍या वाहनांच्या आवाजामुळे घाबरून हा वाघ तेथून निघून गेला. ही …

Read More »