Breaking News

Ramprahar Team

कुष्ठरोगी बांधवांना खाऊवाटप

पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुका पत्रकार महासंघाच्या कार्यकारिणीचे सदस्य अरविंद पोतदार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (दि. 20) पनवेल रेल्वे स्टेशन जवळील मालधक्का येथील गणेश कुष्ठरोग वसाहतीतील बांधवांना खाऊवाटप करण्यात आले. पनवेल तालुका पत्रकार महासंघाची स्थापना झाल्यावर सदस्यांचे वाढदिवस केक कापून साजरे न करता त्या ऐवजी गरजूंना मदत करून साजरे करू या …

Read More »

पनवेल महापालिका क्षेत्रात मास्क न वापरणार्यांवर कारवाई सुरू

पहिल्या दिवशी 87,500 रुपयांचा दंड वसूल पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोविड-19 विषाणूचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येत असतानाच मागील काही दिवसांत रुग्णसंख्या वाढत असल्याने संपूर्ण यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे आहे. त्यामुळे मास्कचा उपयोग न करणार्‍या नागरिकांवर 500 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्यावर शुक्रवारी (दि. 19) पाहिल्याच दिवशी …

Read More »

वाहतूक पोलिसांकडून देवदूतांचा सत्कार

पोलादपूरच्या नूरी पालोजी यांचा विशेष गौरव पोलादपूर : प्रतिनिधी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पोलादपूर तालुक्यातील कशेडी टॅप वाहतूक पोलिसांकडून अपघाताच्या वेळी मदत करणार्‍या पोलादपूर आणि खेड तालुक्यातील देवदुतांचा सत्कार करण्यात आला.  या वेळी कशेडी घाटातील दरीत कोसळलेली वाहने क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यासाठी सहकार्य करणारे नूरी पालोजी (रा. पोलादपूर) यांचा विशेष गौरव …

Read More »

चांगला विचार केला तरच जीवनात यशस्वी होऊ शकतो -शारदा निवाते

कर्जत : प्रतिनिधी नेहमीच मोठा व चांगला विचार केला तरच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. आपले विचार, उच्चार आणि आचारही चांगले असावेत, असे प्रतिपादन  लेखिका डॉ. शारदा निवाते यांनी येथे केले. जीवन विद्या मिशनच्या वतीने कोरोना काळात राज्यस्तरीय निबंध, चित्रकला, काव्यलेखन, लेखन अशा 28ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात …

Read More »

दिघी बंदराच्या विकासाला लवकरच येणार वेग

दिघी बंदराचा विकास हा आगरदांडा बंदरसमवेत कऱण्यात येणार होता. परंतु आगरदांडा बंदर विकासापासून खूप दूर राहिले. अनेक वर्ष काम बंद राहिल्याने आगरदांडा येथे ठेवलेली सर्व यंत्रसामुग्री गंजून गेली. तर गेल्या अनेक वर्षांपासून दिघी बंदराच्या विकासाचे काम रखडले होते. मात्र आता दिघी बंदराचा संपूर्ण ताबा गौतम अदानी यांना मिळाल्यावर त्यांनी दिघी …

Read More »

‘सही रे सही‘ला सहकार्याचा हात

‘अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी’ असलेल्या टीमची मदतीसाठी धाव खोपोली : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला जात असताना मुंबई-पुणे महामार्गावर  ‘सही रे सही‘ या नाटकाच्या कलाकारांची बस बंद पडली. याची माहिती कर्जतचे नायब तहसीलदार पुरुषोत्तम थोरात यांना मिळताच, त्यांनी खोपोलीतील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या टीमला पाचारण केले. टीमचे प्रमुख गुरुनाथ साठेलकर, सदस्य …

Read More »

महाडमधील बंद कॉलनीत आढळला मानवी सांगाडा

महाड : प्रतिनिधी येथील औद्योगिक क्षेत्रातील इंटरनॅशनल होम टेक प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची त्रिंबक) या बंद कंपनीच्या कामगार वसाहतीमध्ये दोन वर्षापूर्वीचा मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 16) उघडकीस आली.  पुणे येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेला सौरव अरूणकुमार दास (वय 22 रा. पीडीलाईट कॉलनी) सुट्टीनिमित्त आपल्या …

Read More »

सुधागडात मुसळधार पाऊस

 गारपिटीचा बागायतदारांना फटका; वीटभट्टी व्यवसायही कोलमडला पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात गुरुवारी (दि. 18) सायंकाळी   सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. गारपिटीने विविध भागाला झोडपून काढले. या वेळी वीज गायब झाली होती. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे. सध्या सुधागड तालुक्यात वाल, मूग, हरभरा आदी कडधान्ये …

Read More »

वळके येथील जनसुनावणी रद्द

शेतकर्‍यांचा विरोध, रास्ता रोको; वाघुलवाडी ते तळेखार प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्प रेवदंडा : प्रतिनिधी शेतकरी व मच्छीमार संघर्ष समितीने प्रस्तावित वाघुलवाडी ते तळेखार एमआयडीसी प्रकल्पाच्या वळके येथील जनसुनावणीस गुरुवारी (दि. 18) जोरदार विरोध दर्शविला. शासनाच्या वतीने जनसुनावणी रद्द केल्याचे सांगण्यात आले, मात्र तसे लेखी पत्र देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी संघर्ष …

Read More »

क्रिकेटच्या बाजारात

यंदा आयपीएलचा चौदावा हंगाम सुरू झाला आहे. चेन्नई येथे एका पंचतारांकित हॉटेलच्या हॉलमध्ये आयपीएलच्या खेळाडूंचा लिलाव गुरुवारी पार पडला. या लिलावाकडे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष होते. टीव्ही आणि अन्य माध्यमांनीही बाकी सार्‍या बे्रकिंग न्यूज मागे सारत आयपीएलच्या लिलावाच्या बातम्यांनाच प्राधान्य दिले. हे साहजिकच आहे. जगात काहीही घडत असले तरी भारतात …

Read More »