कृषी कायद्यांचा विरोध करताना भारताविरोधात घोषणाबाजी वॉशिंग्टन डीसी ः वृत्तसंस्था भारतातील सुधारित कृषी कायद्यांना विरोध करणार्या शेतकर्यांच्या समर्थनार्थ भारतीय-अमेरिकन शिख युवकांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये प्रदर्शन केले. या वेळी तेथील महात्मा गांधींच्या पुतळ्याची अवमानना झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी खलिस्तानी झेंडे सापडले असून, वॉशिंग्टनच्या भारतीय दूतावासासमोरच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. …
Read More »मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही -कोळसे पाटील
नागोठणे : प्रतिनिधी सत्याग्रह कसा असतो व तो कसा करायचा असतो, हे येथील जनतेला शिकवून दिले आहे. 36 वर्षांपूर्वी सरकारी कंपनीशी केलेला करार आता रिलायन्सला सुद्धा लागूच होत असून कोणताही पंगा न घेता तसेच कंपनी बंद न पाडता आंदोलन चालूच राहणार आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही अशी स्पष्टोक्ती …
Read More »चणेरे ग्रामस्थ जनहित याचिका दाखल करणार
एकात्मिक नवनगर वसाहत रद्द प्रकरण पनवेल : प्रतिनिधी मुंबई आणि नवी मुंबई वरील ताण कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यात सिडकोच्या माध्यमातून एकात्मिक नवनगर वसाहत उभारण्यात येण्याची युती शासनाची अधिसूचना ऑक्टोबर 2020 मध्ये महाविकास आघाडी सरकारने रद्द केल्याने रायगड जिल्ह्यातील 40 गावांच्या विकासावर त्याचा परिणाम होणार आहे. त्याविरोधात चणेरे ग्रामस्थ सेवा मंडळ …
Read More »लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कळंबोलीत रक्तदान शिबिर
पनवेल : वार्ताहर कळंबोली येथील मायाक्का देवी मंदिरामध्ये दैवत फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. याठिकाणी 52 रक्तदात्यांनी रक्तदान केले. दैवत फाउंडेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष अक्षय आंधळे यांच्या संकल्प संकल्पनेतून हा कार्यक्रम राबवण्यात आला. या वेळी त्यांना मंडळाचे सल्लागार …
Read More »खारघर येथील गतिरोधकांवर सफेद पट्टे
नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांचा पुढाकार खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथील बालभारती शाळा ते नीफ्त् कॉलेजच्या रोडवरील गतिरोधकांवर सफेद मार्किंगचे पट्टे मारण्यात आले आहेत. भाजप नगरसेविका हर्षदा अमर उपाध्याय यांच्या पुढाकाराने स्थानिक नागरिक व ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीने गतिरोधकांवर सफेद पट्टे मारण्यात आले. खारघर सेक्टर 4 बालभारती शाळा ते नीफ्त् कॉलेजच्या …
Read More »भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी निळकंठ घरत
उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील चिर्ले गावचे निळकंठ घरत यांची नुकतीच भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांना राज्याचे माजी शिक्षणमंत्री व आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. शेलार यांनी घरत यांचे अभिनंदन केले. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, …
Read More »मोहोपाड्यातील सीसीटीव्हींकडे दुर्लक्ष
कॅमेरे बंद अवस्थेत आणि गायब मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पाताळगंगा हा औद्योगिक परीसर असून या परिसरातील मोहोपाडा ही मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. परंतु जबाबदारी घेतलेल्या संबंधितांकडून कॅमेरांची देखभाल करण्यात आली नाही. परिणामी काही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत, तर काही कॅमेरेच गायब करण्यात …
Read More »पेण तालुक्यातही अवकाळी पाऊस
पेण : प्रतिनिधी तालुक्यात शुक्रवारी (दि. 11) पहाटे तीन ते चार तास पावसाच्या सरी बरसल्याने कडधान्य व आंबा पिकाला धोका निर्माण झाला आहे. या अवकाळी पावसाने स्थानिक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात भातपीक घेतल्यानंतर शेतकरी वाल, चवळी, हरभरा, तूर अशा कडधान्य पिकांचे उत्पादन घेतात. कडधान्य पिकांना पाऊस चालत नाही. लहान …
Read More »साई खैरावाडी येथे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन
माणगाव : प्रतिनिधी सूर्योदय फाऊंडेशन आणि जैन इरिगेशन यांच्या सहकार्याने माणगाव तालुक्यातील साई खैरावाडी गावासाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचे भूमिपूजन सामाजिक कार्यकर्ते कृष्णा महाडिक, जैन इरिगेशनचे इंजिनिअर रणजित निकम व अनंत थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. माणगाव तालुक्यातील साई गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर आणि 800 फूट …
Read More »बलात्कारप्रकरणी आरोपीस सश्रम कारावास
पेण : प्रतिनिधी चिमुरडीवर बलात्कार केल्याप्रकरणी पेण फणसडोंगरी येथील आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावासासह 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. पेण नवीन वसाहत फणसडोंगरी येथील चंद्रकांत विष्णू चौधरी याची पीडित मुलीच्या घरी नेहमी ये-जा असायची. 26 जून 2018 रोजी त्याने तिला आपल्या नातवासोबत खेळण्यासाठी त्याच्या घरी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper