अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील एकूण 809 ग्रामपंचायतींपैकी 33 ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी, तर 124 ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 218 सरपंचपद आरक्षित आहेत. 434 ग्रामपंचायत सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी असून, त्यातील 217 पदे महिलांसाठी राखीव आहेत. ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तालुकानिहाय जिल्ह्यातील …
Read More »भटके-विमुक्त आघाडीचा रायगड दौरा
पनवेल ः प्रतिनिधी भटके-विमुक्त आघाडी रायगड यांच्या वतीने बुधवारी (दि.9) उत्तर रायगड जिल्हा दौरा करण्यात आला. या वेळी भटके-विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश कोकण सहसंयोजक भास्कर यमगर, रायगड उत्तर जिल्हा संयोजक बबन बारगजे व सहसंयोजक उत्तम जरग उपस्थित होते. कामोठे, कळंबोली, पनवेल शहर, पनवेल ग्रामीण, कर्जत, खालापूर, खोपोली या विभागांत दौरा …
Read More »जागतिक दिव्यांग सप्ताह उत्साहात
पनवेल ः वार्ताहर भारतीय मानव विकास ट्रस्ट संचालित बौद्धिक अक्षम मुलांची विशेष शाळा नवीन पनवेल येथे दरवर्षी जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जातो, पण या वर्षी कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रेया जाधव यांनी कार्यक्रमाचे सातत्य राखण्यासाठी तसेच मुलांचा व पालकांचा उत्साह वाढवण्याच्या दृष्टीने वेगळ्या प्रकारे ऑनलाइन कार्यक्रमांचे आयोजन …
Read More »जेएनपीटीला ‘सर्वोत्कृष्ट ग्लोबल पोर्ट’चा पुरस्कार
उरण ः वार्ताहर भारतातील प्रमुख कंटेनर पोर्ट असलेल्या जेएनपीटीला प्रतिष्ठित अशा सहाव्या अटल शास्त्र मार्केनोमी पुरस्कार 2020मध्ये ‘भारतातील सर्वोत्कृष्ट ग्लोबल पोर्ट’ म्हणून गौरविण्यात आले. हा पुरस्कार प्राप्त झाल्याने जेएनपीटीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जेएनपीटीला सलग तिसर्यांदा हा प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाला. जेएनपीटीचे डेप्युटी कंजरवेटर कॅप्टन अमित …
Read More »वेश्या व्यवसाय चालवणारी महिला जेरबंद
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई पनवेल ः वार्ताहर वेश्या व्यवसाय चालवणार्या महिलेस नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने तळोजा फेज-2मधील सिल्व्हर लाइफ स्टाइल इमारतीतील घरावर छापा मारून अटक केली आहे. या वेळी पथकाने वेश्या व्यवसायासाठी बोलाविण्यात आलेल्या दोन मुलींचीही सुटका केली आहे. तळोजा से. 20 भागात शाल्या …
Read More »लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक
पनवेल ः वार्ताहर लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक करण्यात आल्याची घटना खारघर वसाहतीत घडली. खारघर परिसरातील एक महिलेने मागील 10 वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवून इच्छेविरुद्ध जबरदस्तीने वारंवार बलात्कार करण्यात आल्याचा तक्रार अर्ज वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्याकडे दिला आहे. महिला पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी या प्रकरणाची सखोल …
Read More »‘इनरव्हील’कडून निराधार वृद्धांना मदत
पनवेल : वार्ताहर सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणार्या इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन संस्थेने नुकतीच शांतीवन येथील आधारघर, शांतीवन वृद्धाश्रम आणि कुष्ठरोग निवारण समिती यांना भेट देऊन तेथील निराधार वृद्धांसाठी फराळ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी डायपर्स भेट दिले. येथील ज्येष्ठ नागरिकांच्या चेहर्यावरील हास्य पाहून इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या …
Read More »नवी मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींना मिळणार चार एफएसआय
आमदार मंदा म्हात्रेंच्या प्रयत्नांना यश नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबईतील सिडकोनिर्मित, खासगी तसेच एपीएमसी बाजार आवारातील मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींचा चार एफएसआय देऊन पुनर्विकास करावा, अशी मागणी बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सातत्याने शासन दरबारी केली होती. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर बैठक झाली. मुख्यमंत्री …
Read More »नांदगाव हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप
मुरुड : प्रतिनिधी यशवंतनगर नांदगाव येथील श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयातील दहावीच्या 95 विद्यार्थ्यांना उसरोली ग्रामपंचायतीकडून सरपंच मनीष नांदगावकर यांच्या हस्ते मास्क व सॅनिटायझरचे मोफत वाटप करण्यात आले. सरपंच नांदगावकर यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सागर राऊत यांनी केले. उपसरपंच महेशकुमार पाटील, ग्रामपंचायत सदस्या समीना जुबेर घलटे, शाळेचे …
Read More »जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेतकर्यांनी प्रयत्न करावेत -कृषी विशेषतज्ज्ञ सुळे
कर्जत : बातमीदार मातीचा पोत कायम राखण्यासाठी शेतकर्यांनी जमिनीला आपले मानून जमिनीचा पोत राखण्याचे आव्हान स्वतःहून स्वीकारावे, असे आवाहन ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ अरविंद सुळे यांनी येथे केले. जागतिक मृदा दिनानिमित्त तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी कशेळे अंतर्गत माले, कळंब, अंजप आणि वाकस या कार्यक्षेत्रात कृषी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper