अलिबाग : प्रतिनिधी वसुबारस या दिवशी गायींसह वासरांची पूजा केली जाते. अलिबागजवळच्या खानाव इथल्या सहयोग गोपालन आणि गोसंवर्धन मंडळाच्या गोशाळेत गायींची आणि वासरांची पूजा करण्यात आली. यानिमित्ताने संस्थेचे देणगीदार राजेश प्रधान यांच्या हस्ते सपत्नीक मंत्रोच्चारात गणेशपूजन, होमहवन करण्यात आले. गोशाळेतील दोन गर्भवती गायींचा ओटी भरण्याचा कार्यक्रमदेखील यावेळी पार पडला. गाय …
Read More »कर्जतच्या फार्मसी महाविद्यालयाचा आयर्लंडच्या एआयटीबरोबर सामंजस्य करार
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर महाविद्यालय (कर्जत)आणि आयर्लंडमधील अॅथलोन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एआयटी) यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला. झूम मिटींग या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर स्वाक्षरी समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाची सुरूवात दोन्ही संस्थांच्या परिचयानंतर झाली. यावेळी राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाकडून प्राचार्य डॉ. मोहन काळे, सहाय्यक प्राध्यापिका …
Read More »बोर्लीच्या थेट सरपंचाविरोधात ग्रामसभेतही अविश्वास ठराव मंजूर
रेवदंडा : प्रतिनिधी ग्रामपंचायतीमध्ये मंजूर झालेल्या अविश्वास ठरावाला ग्रामसभेत ग्रामस्थांनीही संमती दर्शविल्याने शिवसेनेचे नौशाद दळवी यांना बोर्लीच्या थेट सरपंच पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत थेट सरपंचपदी नौशाद दळवी निवडून आले होते. मात्र उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी दळवी यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर केला होता. शासनाच्या …
Read More »आदिवासी सेवा संघातर्फे धान्यवाटप
कर्जत : बातमीदार आदिवासी सेवा संघाच्या वतीने कर्जत तालुक्यातील एकनाथवाडीमधील सर्व आदिवासी कुटुंबांना दिवाळी निमित्त मिठाई तसेच विधवा व निराधार महिलांना धान्य आणि विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा कोरोनायोध्दा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. आदिवासी सेवा संघांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील साळोख ग्रामपंचायत …
Read More »दिवाळी झाली गोड
विहिंपतर्फे आदिवासींना फराळ मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील टक्याचीवाडी येथील सुमारे 50 आदिवासी कुटुंबियांना विश्व हिंदू परिषदेतर्फे शनिवारी (दि. 14) दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. विहिंपतर्फे हा उपक्रम यंदा सलग चौथ्या वर्षीही राबविण्यात आला. मुरुडपासून सुमारे दोन कि.मी. अंतरावरील डोंगरावर वसलेल्या टक्याचीवाडी येथे दिवाळीच्या दिवशी जावून विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तेथील …
Read More »दुरितांचे तिमिर जावो
वेळीच लॉकडाऊन केल्यामुळे कोरोनामुळे होऊ पाहणारी महाप्रचंड जीवितहानी टाळण्यात यश मिळाले हे खरे असले तरी या जालिम उपायाचे परिणाम काही काळ भोगावे लागणार आहेत. तरीही पंतप्रधान मोदी यांनी देशाचे अर्थचक्र पूर्णत: ठप्प होऊ दिले नाही. याच काळात त्यांनी आत्मनिर्भर भारताची मुहूर्तमेढ रोवली. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत कित्येक गरजूंना उद्योग व्यवसायासाठी कर्जवाटप …
Read More »चिंचवली येथील गणेश विसर्जन घाटाचे भूमिपूजन
कर्जत : बातमीदार भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजन मंडळाने मंजूर केलेल्या निधीमधून कर्जत तालुक्यातील चिंचवली गावात गणेश विसर्जन घाट उभारण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे आणि कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांच्या हस्ते करण्यात आले. …
Read More »आदिवासी पाड्यात कपडे, फराळ वाटप
खारघर : प्रतिनिधी खारघरमधील घोळवाडी या आदिवासी पाड्यात आदर्श सेवा भावी सामाजिक संस्थेच्या वतीने साडीचोळी, मिठाई, फराळ आणि कौटुंबिक वस्तू वाटप करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार विश्वरथ नायर, श्री बालाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष दत्त्ता दळवी, संत सावता माळी सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश बनकर, संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मांजरेकर, अजय …
Read More »दिव्यांग बांधवांची, गरीबांची दिवाळी अंधारात
संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान रखडले पाली : प्रतिनिधी संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मिळणारे अनुदान तब्बल चार महिन्यांपासून रखडले असल्याने दिव्यांग बांधवांची यंदाची दिवाळी अंधारात जाणार आहे. जागृती अपंग कल्याणकारी संस्थेने पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना या बाबत निवेदन दिले आहे. दिव्यांग व्यक्तींना संजय गांधी निराधार अनुदानाचा मोठा आधार असतो. …
Read More »पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक अडचणीत
आमदार रविशेठ पाटील यांच्यासमोर मांडल्या व्यथा पेण : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक गेले सात-आठ महिने आर्थिक संकटात सापडले आहेत. आधी कोविड-19 नंतर आलेले निसर्ग चक्रीवादळ यामध्ये जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या उत्पन्नाचे साधन नसल्याने पोल्ट्री व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आपली व्यथा सरकार दरबारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper