Breaking News

Ramprahar Team

मुरूड तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत

मुरूड ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर मुरूड तालुक्यातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज कर्मचारी व अभियंत्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन मुरूड तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत केला आहे. तालुक्यातील सर्व गावांना सुरळीत वीजपुरवठा होत आहे. आता फक्त डोंगराळ व जिथे खूपच पडझड झाली तेवढाच भाग अंधारात असून तेथील वीजपुरवठाही तातडीने सुरळीत …

Read More »

गणेशमूर्ती कारखानदारांना कोरोनाचा फटका

नागोठणे ः प्रतिनिधी दरवर्षी गणेशमूर्तींची जून महिन्यापासून आगाऊ नोंदणी होत असते, मात्र श्रावण महिना सुरू होऊनही दरवर्षीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षा जास्त मूर्तींची नोंदणीच झाली नसल्याने कोरोनाच्या महामारीचा फटका येथील एका दिव्यांग कारखानदाराला बसला आहे. तयार अर्ध्याअधिक मूर्ती शिल्लक राहिल्या तर प्रचंड आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल, अशी खंत व्यक्त करण्यात आली. …

Read More »

शिल्पकारनगरला मिळाल्या मूलभूत सोयीसुविधा

पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील रासळ शिल्पकारनगरमध्ये रासळ ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांमुळे वीज-पाणी, रस्ते आदी मूलभूत नागरी सोयीसुविधा मिळाल्या आहेत. त्याबद्दल ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात चार विजेचे पोल आणि त्यावर लाइट बसविण्यात आले आहेत. तसेच येथील नळांना मुबलक पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शिल्पकारनगरमधील जनतेला भेडसावणारे प्रश्न …

Read More »

पोलादपुरात पोलीस कर्मचार्यांसह सहा कोरोना पॉझिटिव्ह

पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यात मागील दोन दिवसांत प्राप्त कोविड टेस्टच्या अहवालानुसार सहा कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पोलादपूर शहरातील तीन रुग्णांचा समावेश असून त्यापैकी दोन रुग्ण पोलीस कर्मचारी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याखेरीज एका मृत कोरोना रुग्णाच्या कुटुंबीयांकडून कोविड टेस्ट करण्यास नकार देण्यात आल्याने यंत्रणा हतबल असल्याची माहिती प्राप्त …

Read More »

वजन कमी करण्याचे उपाय

आरोग्य प्रहर Older Male Weight Gain; Shutterstock ID 10924927; PO: The Huffington Post; Job: The Huffington Post; Client: The Huffington Post; Other: The Huffington Post कमी खाऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे व अत्याधिक खाणे दोन्ही आरोग्यासाठी घातक आहे. शरीराला कोणत्याही प्रकारचा अपाय न होता वजन कमी होणे अत्यंत महत्त्वाचे …

Read More »

कोरोनाच्या संकटातही शिक्षकांचे नावीन्यपूर्ण शैक्षणिक कार्य

विविध प्रयोगांतून विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानगंगा पाली ः प्रतिनिधी कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 16 मार्चपासून शाळा बंद झाल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा 15 जूनपासून काही ठिकाणी ऑनलाइन शाळा सुरू झाल्या आहेत, मात्र या सर्व कालखंडातदेखील कोविड-19ची विविध प्रकारची कामे व जबाबदार्‍या सांभाळत अनेक शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही. अनेक शिक्षक …

Read More »

सकारात्मकतेचे बळ

सतत कोरोनाच्या बातम्या ऐकून, वाचून, पाहून अनेकांना ताणाचा अनुभव येतो आहे. येणारच. स्वाभाविकच आहे ते. मग कसा टाळायचा हा ताण? वर्तमानपत्रे टाळली, न्यूज चॅनल्स टाळले तरी आपल्या आसपासच्या घडामोडी समाजमाध्यमांवरही येतातच सामोर्‍या. मग कशी राखायची सकारात्मकता? सद्यस्थितीची आवश्यक तेवढी माहिती करून घेऊन सकारात्मकतेने आजच्या दिवसाला सामोरे जाण्यासाठी थोडासा नियोजनपूर्वक प्रयास …

Read More »

पनवेल मनपातर्फे अँटीजेन टेस्ट; खारघर केंद्रात सुविधा

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाची लागण झाली किंवा नाही याची जलद तपासणी करण्यासाठी पनवेल महापालिकेने खारघरमधील नागरी आरोग्य केंद्रात अँटीजेन टेस्ट चाचणी सुरू केली आहे. या चाचणीनंतर अवघ्या 30 मिनिटांत रुग्णास अहवाल प्राप्त होत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. खारघर आणि तळोजा परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या तीन …

Read More »

अनधिकृत मोबाइल टॉवरवर महापालिकेची धडक कारवाई

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका हद्दीमधील खारघर प्रभागातील इनामपुरी गावामध्ये एका खासगी जमिनीवर हाय टेन्शन विद्युत वाहिनीच्या बाजूलाच मोबाइल टॉवर उभारण्यात येत होता. याबाबत पालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. याबाबत माहिती मिळताच आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशाने मंगळवारी (दि. 21) संध्याकाळी त्याच्यावर प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी यांनी  कारवाई करून …

Read More »

नौदलाच्या करंजा येथील सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन

उरण ः प्रतिनिधी फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ, वेस्टर्न नेव्हल कमांड व्हाइस एडमिरल अजित कुमार यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 21) पश्चिम नौदल कमांडच्या पहिल्या दोन मेगावॅट (2चथ) कॅपॅसिटी सौरऊर्जा प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. नेव्हल स्टेशन करंजा येथे हा प्रकल्प स्थापित करण्यात आला आहे. तो या प्रदेशातील सर्वांत मोठ्या सौर सयंत्रांपैकी …

Read More »