मुरूड : प्रतिनिधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीच्या मार्फत राज्यात गावनिहाय अनुसूचित जातीचे सर्वेक्षण करण्यात येत असून, रायगड जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील 59 जातींचे गावनिहाय सर्वेक्षण समतादूत करीत आहेत. समतादूतांनी जिल्ह्यातील 15 पैकी सहा तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी देऊन गावांतील सविस्तर …
Read More »केंद्र सरकारच्या योजनांचा महिलांना लाभ मिळवून देणार
भाजप महिला मोर्चा शहराध्यक्ष दिपाली जाधव यांची ग्वाही माणगाव : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ माणगाव शहरातील जास्तीत जास्त महिलांना मिळवून देणार, अशी ग्वाही भाजप महिला मोर्चाच्या नवनिर्वाचित शहर अध्यक्ष दीपाली जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार दक्षिण रायगड …
Read More »तणावामुळे होतात विविध विकार; अशी घ्या काळजी
आरोग्य प्रहर स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी प्रत्येक जण कसोशीने प्रयत्न करीत असतो. या धावपळीमध्ये अनेक वेळा कामाचा ताण वाढला जातो. परिणामी शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होतात. आजकाल शारीरिक व्याधींसोबतच मानसिक समस्यांचं प्रमाणदेखील वाढल्याचं पाहायला मिळतं. परिणामी नैराश्य, ताण-तणाव या समस्या उद्धवतात. विशेष म्हणजे तणावाचं प्रमाण वाढल्यामुळे अनेक शारीरिक व्याधीदेखील …
Read More »कोविड केअर सेंटर केवळ निवारा केंद्र
कर्जतमध्ये रुग्णांचे हाल; नागरिकांचा आरोप कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील रायगड हॉस्पिटलमध्ये बनविण्यात आलेले कोविड केअर सेंटर हे केवळ निवारा केंद्र असून, तेथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी दाखल होऊ नये, अशी व्यथा खुद्द कोरोनाचा रुग्ण असलेल्या एका पोलिसाने व्यक्त केली आहे, तर या सेंटरमध्ये दिवसभरात डॉक्टरदेखील फिरत नाहीत, असा आरोप कशेळे …
Read More »वाढीव वीजबिलांचे काय?
लोकांनी ‘वर्क फ्रॉम होम’ केले व लॉकडाऊनमध्ये सर्वांनी घरात बसून टीव्ही पाहिले म्हणून वीजबिले वाढली असे ऊर्जा मंत्री म्हणतात. परंतु लोक हौसेने घरात बसले नव्हते. कोरोनाचा फैलाव व लॉकडाऊन यामुळे अनेकांना आर्थिक पेचांना तोंड द्यावे लागत असताना त्यांच्या माथी वाढीव वीजबिले मारण्याचे समर्थन होऊच शकत नाही. या प्रश्नी राज्य सरकारला …
Read More »भारतीय जनता युवा मोर्चाची कामोठे मंडळ कार्यकारिणी जाहीर
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर व भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चाची कामोठे मंडळ कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन …
Read More »‘भाजपची विचारधारा पटवून सांगणार’
माणगाव : प्रतिनिधी जगावर असलेल्या कोरोना नामक संकट दूर झाल्यावर पक्ष नेतृत्व यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव तालुक्यातील महिलांना संघटीत करून सामाजिक उपक्रम राबवून त्यांना भारतीय जनता पक्षाची विचारधारा, ध्येयधोरणे पटवून देऊन तालुक्यात भाजप महिला संघटन मजबूत करणार, असा दावा माणगाव तालुका भाजप महिला मोर्चाच्या नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांनी प्रसार माध्यमांजवळ …
Read More »सीवूड्समध्ये गरजूंना रेनकोटचे वाटप
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई सीवूड्समध्ये भाजप युवा मोर्चाचे विकास निकम यांच्यातर्फे गरजूंना रेनकोट व पालिकेच्या कर्मचार्यांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. पावसाळा सुरू झाला असल्याने अनेक हातावर पोट असणार्या नागरिकांना संरक्षणार्थ देण्यात आले. या वेळी वृक्षारोपण करण्यात …
Read More »उरण तालुक्यात 29 जणांना लागण
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण तालुक्यात शुक्रवारी कोरोनाचे 29 नवे रुग्ण आढळले आहेत तर 17 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरात भेंडखळ(बीपीसीएल एलपीजी) येथील एकाचा मृत्यू झाला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये डोंगरी चार, जसखार दोन, जेएनपीटी दोन, हनुमान मंदिर जवळ नवापाडा करंजा दोन, न्हावा शेवा, बोरी, घारापुरी, …
Read More »पनवेल तालुक्यात 196 नवे कोरोनाग्रस्त
सात जणांचा मृत्यू; 242 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 24) कोरोनाचे 196 नवीन रुग्ण आढळले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 242 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 158 नवीन रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 161 रुग्ण बरे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper