Breaking News

Ramprahar Team

कळंबोलीच्या एमजीएम रुग्णालयात बजरंग दलाकडून रक्तदान शिबिर

कळंबोली : प्रतिनिधी कोरोना महामारीत रक्ताचा तुटवडा होत असून त्यात कोरोना रुग्णांचा जीव जात आहेत. या रुग्णांना जीवनदान मिळावे म्हणून विश्वहिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल कळंबोली समित्यांच्या वतीने सुधागड विद्यासंकुल कळंबोलीच्या सभागृहात एमजीएम रूग्णालय कामोठ्याच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 19) आयोजित करण्यात आले होते. बजरंग दल कळंबोली समितीच्या …

Read More »

तळोजा परिसरात इमारतीला आग

बालकासह परिवाराचे जवानांनी वाचवले प्राण पनवेल : वार्ताहर तळोजा येथील एका इमारतीत रविवारी (दि. 19) लागलेल्या आगीत नऊ महिन्यांच्या बालकासह त्याचा परिवार जवळपास एक तास आत अडकला होता. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. तळोजा फेज-1 से.-11 येथे एके प्लाझा या …

Read More »

खालापुरातील आरोग्य यंत्रणेची पोलखोल

खालापूर : प्रतिनिधी वर्षानुवर्ष व्हेंटीलेटरवर असलेली खालापूर तालुक्यातील आरोग्य सेवेचा पंचनामा कोरोनानी मांडला असून कोरोनामुळे पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या थैमानात व्हेंटीलेटरची, बेडची सोय प्रशासन करू शकलेले नाही. नियमावर बोट दाखवत रूग्णांच्या जिवाशी खेळ मात्र सुरूच आहे. यामुळे राज्यकर्त्यांचा भोंगळ कारभार यानिमित्ताने समोर आला आहे. कोरोना महामारीच संकटापूर्वी देखील तालुक्यातील रूग्णालये …

Read More »

रोहा तालुक्यात 27 नवीन रुग्ण

रोहे : महादेव सरसंबे रोहा तालुक्यात रविवारी 27 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्याची माहिती रोहा तहसीलदार कविता जाधव यांनी दिली आहे. तर कोरोना संसर्गमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधीतांची संख्या 337 वर पोहचली आहे. आतापर्यंत 269 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत कोरोना संसर्गमुळे आठ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. रोहा तालुक्यात …

Read More »

पनवेल तालुक्यात 181 नवे कोरोनाग्रस्त

पाच जणांचा मृत्यू; 117 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी  (दि. 19) कोरोनाचे 181 नवीन रुग्ण आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 117 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 139 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 98 …

Read More »

जेएनपीटी वसाहतीच्या रहिवासी घर भाड्यात दुपटीने वाढ

दरवाढ मागे घेण्याची कामगारांकडून मागणी उरण : प्रतिनिधी जेएनपीटी वसाहतीच्या गळक्या आणि नादुरुस्त निवासी इमारतींची दुरुस्ती न करताच 18 जुलैपासून प्रशासनाने रहिवासी व वाणिज्य वापर होणार्‍या इमारतींच्या भाड्यात दुपटीने वाढ केली आहे. कोरोनाच्या संकटात रोजगारावर आधीच गदा आली असतानाच 17 वर्षांनंतर अचानक भरमसाठ करण्यात आलेली दरवाढ मागे घेण्याची मागणी येथील …

Read More »

खारघर ‘रोटरी मिडटाऊन‘चे विविध उपक्रम

पनवेल : वार्ताहर सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रत्येकाने आपली काळजी घेणे गरजेचे झाले आहे. मास्क वापरणे, सॅनिटायझरने वेळोवेळी हात साफ करणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यावश्यक आहे. रोटरी खारघर मिडटाऊनच्या वतीने या महामारीच्या काळात अनेक चांगले उपक्रम राबविले गेले. गरजुंना अन्नधान्याचे मोफत वाटप केले. यात रोजच्या वस्तूंचा समावेश होता. …

Read More »

‘सेंट जोसेफ’चा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त फेब्रुवारी 2019-20 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक 12वी परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कळंबोली येथील सेंट जोसेफ हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजने सायन्स व वाणिज्य शाखेत 100 टक्के यश संपादन केले आहे. विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक मिळवून विदुला घोडेकर हिने 95.84 टक्के गुण प्राप्त केले तसेच वाणिज्य शाखेत …

Read More »

भाजपकडून चिपळे गावात श्रमदान

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील चिपळे गावामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्य केले आहे. यामध्ये गावातील गणेश घाटाची साफसफाई व दुरुस्ती तसेच गावदेवी मंदिर चिलाई येथील रस्त्याचे काम श्रमदान म्हणून केले. या वेळी श्रमदान करण्यासाठी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच धनंजय पाटील, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा पनवेल तालुका सरचिटणीस …

Read More »

इंडिया बुल्स क्वारंटाइन सेंटरमध्ये महिलांसाठी सुरक्षा रक्षक नेमावा

नगरसेविका वृषाली वाघमारे यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त इंडिया बुल्स येथील अलगीकरण व विलगीकरण सेंटरमध्ये महिलांसाठी महिला सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत, अशी मागणी भाजप नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना लेखी निवेदन दिले आहे. नगरसेविका वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे पनवेल …

Read More »