रोहे : प्रतिनिधी लॉकडाऊन तसेच संचारबंदीच्या काळात कोलाड पोलीस ठाण्याच्या वतीने विभागात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर 24 तास कोलाड पोलिसांची गस्त सुरू आहे. रोहा तालुक्यात तीन पोलीस ठाणे असून एक पोलीस ठाणे तालुक्याच्या ठिकाणी, तर दोन महत्त्वाचे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोलाड व नागोठणे …
Read More »आरोग्य सभापतींकडून विविध यंत्रणांशी संवाद
कर्जत ः बातमीदार रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि आरोग्य तसेच शिक्षण समितीचे सभापती सुधाकर घारे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कर्जत तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी तसेच ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख यांच्याशी संवाद साधला. या वेळी त्यांनी तालुक्यातील सर्व सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना करून त्यांच्याकडून समस्या ऐकून …
Read More »वैद्यकीय अधिकार्यांनी घेतला कामाचा आढावा
पेण ः प्रतिनिधी राज्यासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. कोरेनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. पेण तालुका अधिकारी तथा वाशी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा म्हात्रे यांच्या टीमने पेण तालुक्यातील प्राथमिक …
Read More »मुलांसाठी आहार
मुलांच्या वाढीत सकस आणि संपूर्ण आहार महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो. वाढत्या वयाच्या मुलांची मूलभूत गरज या माध्यमातून पूर्ण होते. आयुष्यभरातल्या खाण्यापिण्याच्या सवयींचा पायाच लहान वयात पडत असतो. त्यामुळे वाढत्या वयात मिळणार्या आहाराला नितांत महत्त्व आहे. विशेषत: बाळ जन्मल्यापासून ते दोन वर्षांचे होईपर्यंत पोषक आहार द्यायला हवा. यासाठी वयोमानानुसार बालकांना काय आहार …
Read More »जंगलातील हातभट्ट्या उद्ध्वस्त
नेरळ पोलिसांची धडक कारवाई; 51 हजारांचे निर्मिती साहित्य नष्ट कर्जत ः बातमीदार सर्वत्र लॉकडाऊन आणि त्यात नेरळमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने परिसर ताब्यात घेतला आहे. अशा वेळी नेरळ पोलिसांनी या कामातून वेळ काढत दुर्गम भागात चालविण्यात आलेल्या गावठी दारूभट्ट्यांकडे लक्ष वळवून दोन हातभट्ट्या उद्ध्वस्त करीत 51 हजारांचे …
Read More »चिरनेर-खारपाडा रोडवरील आग विझवण्यात यश
वणवे लावल्याने वन्य जीवांचे अस्तित्व धोक्यात उरण : प्रतिनिधी उरण, पनवेल, पेण तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या जंगलाना बेसुमारपणे वणवे लावण्याचा प्रताप वर्षानुवर्षे सुरूच आहे. असाच प्रताप उरण तालुक्यातील चिरनेर-खारपाडा रस्त्यावरील तलाखराच्या घाटातील पूर्वेच्या डोंगरांला वणवा लावण्यात आला होता. मात्र ही खबर वनविभागाला मिळताच वनरक्षक सन्नी ढोले आणि वन्यजीव …
Read More »नवी मुंबई पोलिसांमार्फत वाहनांसाठी नियमावली
पनवेल : वार्ताहर सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर कामाशिवाय वाहने रस्त्यावर येवू नयेत यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून दुचाकी तसेच चारचाकी वाहनांसाठी नियमावली करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ई-पास शिवाय दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहनांना नवी मुंबई आयुक्तालय हद्दीत प्रवेश दिला जाणार नाही. दुचाकी वाहनांवर फक्त चालक असणार आहे डबल …
Read More »भाजप नेते किरण माळी यांच्याकडून गोरगरिब कुटूंबांना जीवनावश्यक वस्तू
मोहोपाडा : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात जांभिवली ग्रामपंचायत, कराडे खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील गरजू गोरगरिबांवर उपासमारीची वेळ येवू नये यासाठी भाजपाचे केळवणे जिल्हा परिषद विभागाचे अध्यक्ष तथा माजी सरपंच किरण माळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच माजी सरपंच आंबो कोडींलकर यांच्या स्मरणार्थ मौजे जांभिवली, चांवढोली, कराडे खुर्द, कासप आदी गावातील …
Read More »श्रीवर्धनमध्ये उसळली नागरिकांची गर्दी
पूर्णत: लॉकडाऊनपूर्वी लोकांची खरेदीसाठी झुंबड श्रीवर्धन : प्रतिनिधी औषधाची दुकाने व दवाखाने याव्यतिरिक्त भाजीपाला व सर्व व्यवहार बंद राहील असे अनेक मेसेज श्रीवर्धनमध्ये व्हॉट्सअॅप वरती फिरत होते. त्यामुळे गुरुवारी सकाळी काही नागरिकांनी खरेदीसाठी श्रीवर्धन बाजारपेठेत एकच गर्दी केल्याचे दिसून आले. कोरोना आपल्यापासून फक्त तीन किलोमीटर लांब आलेला आहे. याचे कोणतेही …
Read More »समर्थ नेतृत्व
अफाट लोकसंख्येच्या भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यावर भयावह परिस्थिती ओढवेल अशी भीती जगभरातच अनेकांना वाटत होती, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संकटाच्या काळात असे काही झपाट्याने आणि खंबीरपणे निर्णय घेतले आहेत की अनेकविध स्तरांवर त्यांचे कौतुक होत आहे. भारतातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर प्रगाढ विश्वास आहे हे तर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper