Breaking News

Ramprahar Team

पनवेल तालुका पोलिसांकडून निराधार ज्येष्ठ नागरिकांना मदत

पनवेल : बातमीदार तालुक्यातील मौजे साई, पाले बुद्रुक, कोळवाडी, वावंजे, भिंगारवाडी व रिटघर येथील निराधार तसेच ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक सामुग्रीचे वाटप शनिवारी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कुदळे यांच्यासह त्या त्या बिट मधील पोलीस कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. या वेळी रिटघर येथील …

Read More »

परीक्षेसाठी राजस्थानला गेलेल्या विद्यार्थ्यांना घरी आणण्यासाठी राज्य शासनाने कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त नीट 2020 परीक्षेसाठी राजस्थानमधील कोटा येथे गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आपल्या घरी सुखरूप पोहचण्यासाठी राज्य शासनाने लवकरात लवकर नियोजन व कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.महाराष्ट्रातील जवळपास एक हजार विद्यार्थी नीट 2020 परीक्षेची …

Read More »

पोलिसांना सेफ्टी गॉगल्स

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पोलीस ठाण्याची हद्द मोठी असून जवळपास 81 गावासह मुंबई-पुणे महामार्ग, एक्सप्रेस महामार्ग व मुंबई-गोवा महामार्गाचा काही भाग त्यांच्या अखत्यारीत येतो. या ठिकाणी दिवस-रात्र कर्तव्य बजावित असणार्‍या 50 अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी पुढाकार घेवून व्हिनस कंपनीच्या सेफ्टी …

Read More »

पनवेलमध्ये काही नागरिकांकडून केले जातेय नियमांचे उल्लंघन!

पनवेल : बातमीदार पनवेल परिसरात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढू लागले आहेत. असे असले तरी देखील मोठ्या प्रमाणात काही नागरिकांची वर्दळ बाजारात व रस्त्यांवर दिसू लागली आहे. त्यामुळे काही ग्रामपंचायतींनी स्वतःहून पुढाकार घेत ग्रामपंचायत हद्दीत लॉकडाऊन पुकारले आहे. पनवेल महापालिका हद्द व ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या जवळपास 40 वर गेलेली …

Read More »

आधार लिंक नसलेल्या रेशनकार्ड धारकांनासुद्धा धान्य द्या -तहसीलदार

पनवेल : बातमीदार पनवेल परिसरात आधार लिंक नसलेल्या रेशनकार्ड धारकांना धान्य मिळत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आधार लिंक नसलेल्या रेशनकार्ड धारकांना सुद्धा धान्य देण्याच्या सूचना तहसीलदार अमित सानप यांनी सर्व रेशन दुकानदारांना दिल्या आहेत. धान्यापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी शासन प्रयत्न करत आहे. पनवेल तालुक्यातील ग्रामीण …

Read More »

उरण पालिका हद्दीत स्वच्छतेला प्राधान्य

उरण : रामप्रहर वृत्त उरण शहर कोरोनाच्या विळख्यात अडकू नये म्हणून शहराला स्वच्छ ठेवण्याचे काम उरण नगरपालिकेचे सफाई कर्मचारी करीत असल्याने त्यांचेही मोलाचे सहकार्य असल्याची चर्चा उरण शहरवासीयांत सुरू आहे. कोरोनाच्या व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात आमजनतेला याची भीती वाटत नाही. आजच्या घडीला उरणमध्ये 4 जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव …

Read More »

‘अत्यावश्यक सेवा बजावणार्या कर्मचार्यांची कोरोना चाचणी करा’

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी व कंत्राटी कामगार स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना संकटात आपली सेवा बजावत आहेत. त्यामुळे या कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी त्यांची कोरोना चाचणी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे राहुल शिंदे यांनी केली आहे. आपली 16 लाख लोकसंख्या असताना सुद्धा आपल्या महानगरपालिकेतील कर्मचार्‍यांनी घेतलेल्या मेहनतीच्या व …

Read More »

पनवेलमध्ये ड्रोनद्वारे 10 जणांवर कारवाई

शहर पोलिसांनी घेतले ताब्यात; गुन्हा दाखल पनवेल : बातमीदार, वार्ताहर, प्रतिनिधी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्यावश्यक कामे नसताना देखील नागरिक फिरु लागले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांमार्फत ड्रोन कॅमेर्‍याद्वारे निगराणी सुरू करण्यात आलेली आहे. कोळीवाडा येथील काही व्यक्ती खाडी किनार्‍यावर जमत असल्याचे आढळून आल्याने शहर पोलिसांनी त्यांच्या विरोधात साथ रोग …

Read More »

मुस्लिम वेल्फेअरकडून सुरक्षा किट

खोपोली ः प्रतिनिधी अपघात असो किंवा अन्य कोणतीही आपत्ती आणीबाणीच्या प्रसंगी खोपोलीतील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यरत टीम नेहमीच प्रशासनाला सहकार्य करीत असते. कोविड-19च्या पार्श्वभूमीवरही टीमचे काही सदस्य मदतीसाठी कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी खोपोली मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनकडून सुरक्षेच्या उपाययोजनांकरिता पीपीई किटचे वाटप करण्यात आले. तसेच नगरपालिका आरोग्य व स्वच्छता विभागातील कर्मचार्‍यांनाही असोसिएशनकडून अशा …

Read More »

डॉ. महेंद्र धाडवड यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

कर्जत, मुरबाडकरांचे टेन्शन दूर कर्जत ः बातमीदार नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र धाडवड यांची तसेच त्यांच्या पत्नीची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. 21 एप्रिलला कस्तुरबा रुग्णालयातून आलेल्या आरोग्य पथकाने त्यांचे स्वॅबचे नमुने घेतले होते. त्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल आले असून ते निगेटिव्ह आहेत. यामुळे कर्जत व मुरबाड …

Read More »