Breaking News

Ramprahar Team

कासाडी नदी झाली प्रदूषणमुक्त

लॉकडाऊन इफेक्ट; नागरिकांत समाधान पनवेल ः वार्ताहर लॉकडाऊनच्या काळात पनवेल तालुक्यातील महत्त्वाची अशी कासाडी नदी स्वच्छ दिसू लागल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव मासेमारी करताना दिसत आहेत. लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यवसाय बंद असल्याचा सकारात्मक परिणाम तळोजा एमआयडीसीमधून वाहणार्‍या कासाडी नदीवर दिसून येत आहे. औद्योगिक प्रदूषणामुळे …

Read More »

ब्राह्मण सभेचे ‘व्हॉट्सअॅप मार्गदर्शन’

पनवेल ः प्रतिनिधी ब्राह्मण सभा, नवीन पनवेल या संस्थेच्या वतीने सध्याच्या लॉकडाऊनच्या कालखंडात ’व्हॉट्सअ‍ॅप मार्गदर्शन’ या एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात्मक कार्यक्रमात व्हॉट्सअ‍ॅप समूह तयार करण्यात आले. त्यावर सलग 14 दिवस विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले. समूहांंमधील नागरिकांनी आपल्या शंका व प्रश्न विचारले. त्यावर या सर्व …

Read More »

चांभार्ली हद्दीतील कामगारांना मदतीचा हात

मोहोपाडा ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनतेला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा याची काळजी वाटू लागली आहे. हातावर पोट भरणार्‍यांची अवस्था दोरी तुटलेल्या पतंगासारखी झाली आहे. यातच चांभार्ली हद्दीतील वृंदावन फ्लोरा प्रोजेक्टमधील 260 कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याचे रसायनी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांना समजताच त्यांनी …

Read More »

नवी मुंबईतील गावांना सकाळी जत्रेचे स्वरूप

नवी मुंबई : बातमीदार मुंबई, पुणे व ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईतही कोरोनाबधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शासनदेखील चिंतेत आहे. पालिका व पोलिसांकडून अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे, मात्र असे असले तरी काही नागरिकांकडून हलगर्जीपणा कमी होताना दिसत नसल्याने शिस्तीत घरी थांबून सामाजिक अंतर राखणारे इतर नवी मुंबईकर चिंतेत आहेत. सकाळी काही …

Read More »

पनवेल परिसरात काही नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली

पनवेल ः वार्ताहर पनवेल परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग राखणे जरुरीचे आहे, परंतु लॉकडाऊन काळात अनेक ठिकाणी बाजारपेठेत काही नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली होताना दिसत असल्याने हा आजार त्यामुळे आणखी बळावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लॉकडाऊनच्या काळात भाजीपाला, फळे, दूध, औषधे आदी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक …

Read More »

माजी सरपंचांकडून पागोटेत शिधावाटप

उरण ः रामप्रहर वृत्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून पागोटे गावच्या माजी सरपंच पूनम योगेश पाटील आणि त्यांचे पती तथा माजी सरपंच योगेश पाटील यांनी पागोटे गावातील भाजप पक्षातर्फे तसेच जय मल्हार क्रिकेट क्लब पागोटे यांच्या वतीने भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे आमदार महेश …

Read More »

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत शिधावाटप; गरजू कुटुंबांना दिलासा

उरण ः प्रतिनिधी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी नवी मुंबई आयुक्तालयातील गरीब, गरजू कुटुंबांबाबत माहिती गोळा करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांना सांगितले होते. त्याप्रमाणे सर्व प्रभारी अधिकार्‍यांनी सदरची माहिती गोळा करून त्यानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या वतीने सोमवारपासून (दि. 20) उरण शहर व परिसरातील गरीब, …

Read More »

विकासचक्र पुन्हा फिरणार

कोरोनामुळे गेले अनेक दिवस बंद असलेली उद्योगासह अन्य क्षेत्र पुन्हा एकदा सुरू होत आहेत. माणसाचा जीव सर्वात महत्त्वाचा असला तरी याच माणसाला जगविण्यासाठी विकासाचे चक्र अविरत फिरणे आवश्यक आहे. म्हणून केंद्र शासनाने टाळेबंदीतील काही निर्बंधांमध्ये सूट देऊन शिथिलता आणली आहे. त्यामुळे आता नागरिकांची जबाबदारी अधिक वाढली आहे. संपूर्ण जग सध्या …

Read More »

दत्तात्रेय घुले यांचा एक महिन्याचा पगार पंतप्रधान सहाय्यता निधीत जमा

पनवेल : वार्ताहर सध्याचे महाराष्ट्राचे आर्थिक परिस्थिती पाहता पुढील काही महिन्यांमध्ये आर्थिक टंचाई होण्याची शक्यता आहे, अशावेळी अनेकांनी पंतप्रधान निधीमध्ये किंवा मुख्यमंत्री निधीमध्ये आपापल्या परीने  निधी जमा केला आहे. यामध्ये नवी मुंबई आयुक्तालयमध्ये आपल्या कामाने नावाजलेले व सर्वांच्या परिचयाचे असे निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी दत्तात्रय घुले यांनी आपला एक महिन्याचा …

Read More »

विचार मंचतर्फे गोरगरिब, गरजुंना जेवण वाटप

कळंबोली : प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणार्‍या रोजंदारी, मजूर व गोरगरीब नागरिकांची मात्र यामुळे उपासमार होताना दिसून येत आहे. अशा गोरगरिबांची उपासमार होऊ नये म्हणून हेमंतराजे धायगुडे पाटील विचारमंच यांच्या वतीने जेवणाचे वाटप करण्यात येत आहे. हेमंतराजे धायगुडे पाटील विचारमंचाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक हेमंत धायगुडे पाटील यांचे …

Read More »