Breaking News

Ramprahar Team

उलवे विद्यालयात संविधान दिन

उलवे : रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल उलवे विद्यालयात मंगळवारी (दि. 26) भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विज्ञान शिक्षक व्ही. जी. पाटील हे होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. संविधान …

Read More »

पनवेल, उरणमध्ये संविधानाचा जागर

सीकेटीत विज्ञान प्रदर्शन आणि संविधान दिन पनवेल : रामप्रहर वृत्त सीकेटी विद्यालयात मंगळवारी (दि. 26) भव्य विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावरील नावीन्यपूर्ण प्रकल्प या वेळी इ. पाचवी ते दहाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीला लागावा, तसेच कल्पना शक्तीला वाव मिळावा म्हणून असे प्रदर्शन …

Read More »

‘इफ्फी’मध्ये घोडचूक

सत्यजीत रे यांच्याऐवजी दुसर्‍याचा फोटो पणजी : वृत्तसंस्था सध्याच्या घडीला गोव्यात सुरू असणार्‍या 50व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया म्हणजेच इफ्फी 2019मध्ये एक भलताच प्रकार घडल्याचे उघडकीस आले. ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. इफ्फीच्या संकेतस्थळावर झालेली ही चूक लक्षात येताच अनेकांना धक्का बसला. संकेतस्थळावर एका विभागात गतकाळातील काही लोकप्रिय आणि दिग्गज …

Read More »

रितेश-जेनेलियाच्या मुलाच्या बर्थडे पार्टीला स्टार किड्सची हजेरी

मुंबई : प्रतिनिधी अभिनेत्री रितेश देशमुख आणि त्याची मॉडेल-अभिनेत्री पत्नी जेनेलिया डिसुझा यांच्या मुलाच्या बर्थडे पार्टीला स्टार किड्सने हजेरी लावली. अर्थातच, त्यांचे पालकही या वेळी उपस्थित होते. मराठी आणि हिंदी कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणार्‍या अभिनेता रितेश देशमुख याच्या चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू असतानाच त्याची मुले आणि संपूर्ण कुटुंबसुद्धा …

Read More »

रोटरी क्लबच्या वतीने सायकल वाटप

कर्जत ः प्रतिनिधी पोशीर येथील श्रमजीवी जनता विद्यामंदिर विद्यालयात अनेक गावांतून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात, परंतु गावांमधून येणार्‍या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी चार ते पाच किलोमीटरची पायपीट करावी लागते. ज्या गावात रिक्षा, एसटी जात नाही अशा गावांमधील गोरगरीब, गरजू सुमारे 50 मुलींना रोटरी क्लब ऑफ देवनार यांच्या वतीने शनिवारी सायकलचे वाटप करण्यात …

Read More »

नलक्षवाद्यांकडून वाहनांची जाळपोळ

दंतेवाडा : छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांनी एक डम्पर आणि जेसीबीसह नऊ वाहने पेटवून दिली. या अगोदर झारखंडमध्ये लातेहार जिल्ह्यात नक्षलींनी केलेल्या हल्ल्यात चार पोलिसांचा मृत्यू झाला होता. तत्पूर्वी 13 नोव्हेंबर रोजी छत्तीसगड येथील सुकमामधील गचनपल्ली गावात डीआरजी (डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह फोर्स)कडून करण्यात आलेल्या कारवाईत एक लाखाचा इनाम असलेल्या नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला …

Read More »

फडणवीस सरकारकडून शेतकर्यांना मदत मिळेल : विखे-पाटील

नगर : प्रतिनिधी ओल्या दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍याला मदतीची अपेक्षा ही भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडूनच होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार मिळणार असल्यामुळे शेतकर्‍यांना भरघोस मदतीची असलेली अपेक्षा पूर्ण होईल, असा विश्वास माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याचा 70वा गळीत …

Read More »

खासदार संजय काकडेंनी घेतली शरद पवार यांची भेट

मुंबई : प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर सुनावणी सुरू होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय खासदार संजय काकडे यांनी ‘सिल्व्हर ओक’ला येत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. काकडे यांच्या पवार भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना वेग आला आहे, मात्र आपली ही खासगी भेट असून, …

Read More »

म्हसळ्यातील 1755 शेतकर्यांना मिळणार नुकसानभरपार्ई

म्हसळा : प्रतिनिधी क्यार व महा चक्रीवादळ आणि अवेळी पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. बाधित शेतकर्‍यांना आर्थिक साहाय्य देण्यासंदर्भात  राज्यपालांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महत्त्वाचा निर्णय झाला आहे.  म्हसळा तालुक्यात भातपिकाखालील एकूण क्षेत्र 2689 हेक्टर आहे. त्यापैकी 1755 शेतकर्‍यांचे 530.02 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यांना 42 लाख 40 हजार रुपये अनुदान …

Read More »

सुतारपाडा शाळा इमारतीची दुरवस्था

कर्जत : बातमीदार तालुक्यातील सुतारपाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर काही दिवसांपूर्वी झाड कोसळल्याने या शाळा इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अनेक दिवस उलटूनही या इमारतीची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांनी बसायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या विद्यार्थ्यांना शाळेच्या व्हरांड्यात बसावे लागत आहे, मात्र याकडे ग्रामपंचायतीसह शाळा …

Read More »