Breaking News

Ramprahar Team

‘माथेरानच्या राणी’ची पर्यटकांना प्रतीक्षा!

कर्जत : बातमीदार जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून नावलौकिक असलेल्या माथेरानला जगाच्या कानाकोपर्‍यातून पर्यटक भेट देतात. वाहनांना बंदी असल्यामुळे पर्यावरणपूरक पर्यटनस्थळ अशी माथेरानची ख्याती आहे. येथील ’माथेरानची राणी’ म्हणजे मिनीट्रेन. या मिनीट्रेनचा आनंद घेण्यासाठी परदेशातूनसुद्धा पर्यटक येतात, पण गेल्या काही महिन्यांपासून या रेल्वेमार्गामध्ये आलेल्या अडथळ्यांमुळे माथेरानची राणी यार्डात विश्रांती घेत आहे. त्यामुळे …

Read More »

आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या वतीने शतकोत्तर हीरक महोत्सव

नवीन पनवेल : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या वतीने शतकोत्तर हीरक महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवांतर्गत मंगळवारी अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आमदार महेश बालदी यांची सदिच्छा भेट उरण ः येथील …

Read More »

नामदेव पाटील आणि फुलाजी ठाकूर यांचा वाढदिवस

पनवेल : भाजप नेते नामदेव पाटील आणि फुलाजी ठाकूर यांचा वाढदिवस मंगळवारी साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, रवी जोशी, प्रकाश भगत, पुष्पा पाटील, लक्ष्मण पाटील, गुरू ठाकूर, कल्पेश ठाकूर, बिनदेश ठाकूर, उमेश मौर्य, भगवान सावंत …

Read More »

देवीचापाडा येथे महिला सशक्तीकरण मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त देवीचापाडा येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देवीचापाडा शाखेत नाबार्ड व रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सशक्तीकरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आसपासच्या गावांतील बचत गटातील 25 महिला उपस्थित होत्या. या महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी बँकेचे मॅनेजर आदेश मोहन …

Read More »

सिडकोची सोडत नियोजित दिवशीच

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा राज्यात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षामुळे सिडकोची नियोजित 26 नोव्हेंबरची घरांची सोडत रखडण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती, मात्र घरांची सोडत ही पूर्वनियोजित प्रशासकीय प्रक्रिया असल्याने ठरलेल्या दिवशीच म्हणजेच 26 नोव्हेंबर रोजीच होईल, असे सिडकोच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. स्वप्नपूर्ती प्रकल्पातील शिल्लक राहिलेली 814 आणि नवीन प्रकल्पातील …

Read More »

विद्यार्थ्यांसाठी डेंटल चेकअप कॅम्प

शिबिरात 300 विद्यार्थ्यांची दंत तपासणी पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे आगरी शिक्षण संस्थेच्या शाळेत विघ्नेश्वर ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी डेंटल चेकअप कॅम्प आणि पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. या डेंटल कॅम्पचे उद्घाटन रोटरी प्रांत 3131चे माजी प्रांतपाल डॉ. गिरीश …

Read More »

रस्त्यांचे रिसर्फेसिंगचे काम सुरू

खारघरमध्ये भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यश खारघर : प्रतिनिधी येथील सेक्टर 12 ते 21मधील रस्त्यांचे रिसर्फेसिंगचे काम मंगळवारी (दि. 19) सेक्टर 19मध्ये सुरू झाले. यासाठी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. ते श्रेय या सर्वांचेच आहे. टेंडर होईपर्यंत गेल्या तीन वर्षांत सेक्टर 19मधील इतर अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यांचाही …

Read More »

वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा

पनवेल : वार्ताहर पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर समर्थक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष फिरोज सय्यद यांनी त्यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 19) नेरेपाडा येथील स्नेहकुंज आधारवड या वृद्धाश्रमात साजरा केला. या वेळी उपस्थित वृद्धांना जीवनावश्यक वस्तूंचे तसेच ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास वृद्धाश्रमाचे संस्थापक नितीन जोशी, आयआयएफएल फायनान्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक …

Read More »

चिरनेरमध्ये रंगले 1985च्या दहावी ग्रुपचे स्नेहसंमेलन

उरण : वार्ताहर चिरनेर येथील सेकंडरी स्कूल दहावीच्या 1985 बॅचचे गेट टुगेदर अर्थात स्नेहसंमेलन रविवारी (दि. 17) राजेंद्र म्हात्रे यांच्या फार्म हाऊसमध्ये उत्साहात झाले. या वेळी या वर्गातील 24 विद्यार्थी आणि चार विद्यार्थिनी असे एकूण 28 जण उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत या ग्रुपमधील माजी न्यायाधीश चंद्रहास म्हात्रे यांनी केले. यानंतर …

Read More »

उरणमध्ये डेंग्यूची साथ

रुग्णांची धावाधाव; आरोग्य यंत्रणा सतर्क उरण : प्रतिनिधी पावसाळा सरून हिवाळ्याची चाहूल लागताच उरण तालुक्यात डेंग्यूच्या मच्छरांनी उच्छाद मांडला आहे. तालुक्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याने अनेकांनी शासकीय रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांत धाव घेतली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तुंबलेले पाणी व दमट वातावरणामुळे उरण तालुक्यात डासांची पैदास …

Read More »