कामोठे ः रामप्रहर वृत्त कामोठे प्रभाग 11चे अध्यक्ष रमेश तुपे यांच्या अध्यक्षतेखाली शक्तीकेंद्र प्रमुख व बुथ अध्यक्ष यांची संवाद बैठक नुकतीच झाली. पनवेल विधानसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना मताधिक्य देण्यासाठी प्रभाग 11चे अध्यक्ष रमेश तुपे यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती केंद्रप्रमुख व बुथ अध्यक्षांची संवाद बैठक नगरसेविका संतोषी तुपे …
Read More »विद्या प्राधिकरणकडून पूरग्रस्तांना मदत
नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्त प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई येथील संस्थेत कार्यरत अधिव्याख्याता, विषय सहाय्यक, साधनव्यक्ती, कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्या योगदानातून कोल्हापूर येथील पूरग्रस्त जिल्हा परिषद शाळा शिये नं. 2 या शाळेतील विद्यार्थ्यांना प्राधिकरणाच्या वतीने वह्यांचे वाटप करण्यात आले. साहित्यवाटप करण्यासाठी प्राधिकरणाची टीम तयार करण्यात आली होती. या टीममध्ये …
Read More »रोटरी क्लब ऑफ उरणच्या अध्यक्षपदी मनोज ठाकूर यांची निवड
उरण ः रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ उरणचा पदग्रहण सोहळा रोटरी स्कूल हॉल, बोरी-उरण येथे उत्साहात झाला. या वेळी रोटरीयन मनोज ठाकूर यांची अध्यक्ष म्हणून तर अॅड. पराग म्हात्रे यांची सचिव म्हणून सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. रो. राजेश पंजवानी (माजी अध्यक्ष रोटरी क्लब उरण) यांनी आपल्याकडील पदभार मनोज ठाकूर …
Read More »कलंबुसरे नवरात्रोत्सवात रंगले कविसंमेलन
पनवेल ः रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील कलंबुसरे येथील आदर्श नवरात्रोत्सव मंडळाने रात्री नवदितांचे कविसंमेलन घेऊन अनोखी रंगत आणली. या कवीसंमेलनात कवी डॉ. आर. बी. राठोड, प्रा. एल. बी. पाटील, कवयित्री जोत्स्ना राजपूत, कवी किशोर पाटील, मधुबन कट्टाचे अध्यक्ष कवी अर्जुन हंडोरे, बाबू पुजारी, भगवान म्हात्रे, भास्कर पाटील, चेतन पाटील, कवियत्री …
Read More »उलवे विद्यालयात कर्मवीर जयंती साजरी
पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल उलवे विद्यालयात संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 132वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे चेअरमन शरद खारकर हे होते. प्रमुख वक्ते म्हणून फुंडे ज्युनिअर कॉलेजचे प्रा. दिनेश सासवडे हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून उलवे सरपंच …
Read More »‘रयत’मुळे बहुजन समाज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात’
पनवेल ः रामप्रहर वृत्त व्यवस्थेने नाकारलेल्या, गावकुसाबाहेर राहणार्या उपेक्षित, वंचित बहुजन समाजाला पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या दूरदृष्टीने स्थापित केलेल्या रयत शिक्षण संस्थेमुळेच शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील होता आले व आपली विद्वत्ता सिद्ध करता आली, असे प्रतिपादन गव्हाण येथील संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. …
Read More »‘अजितदादांचे राजीनामानाट्य म्हणजे एंटरटेन्मेंट’
लातूर : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेल्या राजीनामानाट्यावर त्यांनी स्वतः खुलासा केला असला, तरी भाजप नेते यावर टीकेची झोड उठवीत आहेत. एकीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील हे पवार कुटुंबात शांतता राहावी म्हणून कोल्हापूरच्या अंबामातेला प्रार्थना करू असे सांगत आहेत, तर दुसरीकडे भाजप नेते तथा राज्याचे अन्न-नागरी …
Read More »विजेच्या धक्क्याने दोघींचा मृत्यू; दोन गंभीर जखमी
नाशिक : प्रतिनिधी शिवपुरी चौकातील उत्तम नगर येथे विजेच्या धक्क्याने दोन महिलांचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, विजेच्या धक्क्याने नागरिकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. सोजाबाई मोतीराम केदारे (80) …
Read More »सौदी अरेबियाकडून भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताच्या संभाव्य विकासवाढीची दखल घेत जगातील सर्वांत मोठा तेल निर्यातदार देश असलेल्या सौदी अरेबियानं गुंतवणुकीसाठी आता भारतावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. देशातील पायाभूत सुविधा आणि खाण आणि पेट्रोकेमिकल्स या क्षेत्रांमध्ये शंभर अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. सौदीचे ब्रँड अॅम्बेसेडर डॉ. सऊद बिन मोहम्मद अल …
Read More »पॅनकार्ड-आधार कार्ड जोडणीस मुदतवाढ
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था सरकारद्वारे पॅनकार्ड-आधार कार्ड जोडणीसाठी देण्यात आलेली अंतिम मुदत वाढवण्यात आलेली आहे. याअगोदर पॅनकार्ड-आधार कार्ड जोडणीसाठी 30 सप्टेंबर ही मुदत देण्यात आली होती, तर, आता नवी अंतिम मुदत 31 डिसेंबर देण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांना पॅनकार्ड-आधार कार्ड जोडणी करून घेण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी मिळाला आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper