आजपासून नवरात्रोत्सवाची धूम अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यामध्ये रविवारपासून (दि. 29) शारदीय नवरात्रोत्सवाची धूम सुरू झाली आहे. सकाळी ढोलताशांच्या गजरात दुर्गामातेचे आगमन झाले. रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात 1294 ठिकाणी दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. नवरात्रोत्सव हा गुजरात राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होत असला तरी महाराष्ट्रातही सार्वजनिक मंडळांमार्फत गरबा नृत्याचे आयोजन …
Read More »वणवे रोखण्याची उपाययोजना पाहण्यासाठी वन विभागाचे अप्पर सचिव मोहन कर्नाट यांनी घातले डोंगर पालथे
कर्जत : बातमीदार सगुणा वनसंवर्धन तंत्राच्या माध्यमातून वणवे रोखण्याचे काम केले जात आहे. या कामाची माहिती घेण्यासाठी वन विभागाचे अप्पर सचिव मोहन कर्नाट यांनी पाहणी केली. त्या वेळी त्यांनी अनेक डोंगर चढून वणवे रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. वन विभागात वेगळे व्हिजन ठेवून काम करणारे अधिकारी म्हणून मोहन …
Read More »मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी घेतला कर्जत बाल उपचार केंद्राचा आढावा
कर्जत : बातमीदार तालुक्यातील कुपोषण कमी करण्यासाठी शासनाच्या वतीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात बाल उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याला रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी भेट देऊन आढावा घेतला. कर्जत उपजिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या सिटीसीमध्ये सध्या एकूण 13 तीव्र श्रेणीतील बालके उपचार व पोषण सेवा …
Read More »औरंगाबाद-मुरूड एसटी बस रस्त्यात बंद
मुरूड : प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळाची औरंगाबाद-मुरूड गाडी शुक्रवारी (दि. 27) रात्री 11.30 वाजता पेण येथे बंद पडली. या गाडीतील प्रवाशांना मुंबई -मुरूड या निमआराम बसमध्ये बसवण्यात आले, मात्र ती बसही प्रवाशांनी भरलेली असल्याने अनेक प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. गिअर पडत नसल्याने औरंगाबाद-मुरूड गाडीचा …
Read More »चौकमध्ये शिक्षक गुणगौरव सोहळा उत्साहात
खालापूर : प्रतिनिधी दिलासा फाऊंडेशन आणि पत्रकार संघाच्या वतीने चौक येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात खालापूर तालुक्यातील गुरुजनांचा पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, ज्येष्ठ व्यंगचित्रकार भरत सावंत, शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास पत्रकार बाबू पोटे, गुरुनाथ साटेलकर, दिनेश पाटील, अर्जुन कदम व …
Read More »विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर पोलादपुरात वाहनांची झाडाझडती
दोन स्थिर सर्वेक्षण पथके कार्यरत -तहसीलदार दीप्ती देसाई पोलादपूर : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्ग आणि महाबळेश्वर-वाई राज्यमार्गावर वाहनांची झाडाझडती घेऊन मतदारांना पैशांची अथवा वस्तुरूपी आमिष दाखविण्याच्या प्रकारांवर नियंत्रण आणण्यासंदर्भात चौकशीअंती गुन्हे दाखल करण्यात येणार असून शहरातील छ. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ स्थिर सर्वेक्षण पथक 24 तास …
Read More »भाजपचे कामोठे शहर युवा मोर्चा चिटणीस अमित सावंत यांचा वाढदिवस
पनवेल ः भाजपचे कामोठे शहर युवा मोर्चा चिटणीस अमित सावंत यांचा वाढदिवस शुक्रवारी उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी अमित सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, …
Read More »वावंजे विद्यालयात कर्मवीर जयंती साजरी
पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 132वी जयंती रयतच्या सर्व शाळा आणि महाविद्याल यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. वावंजे येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व कै. गोटीरामशेठ पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये जयंती सोहळा शुक्रवारी साजरा करण्यात आला. हा सोहळा रयतचे मॅनेजिंग …
Read More »गव्हाण विद्यालयात स्वच्छता ही सेवा अभियान
पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये भारत सरकारच्या वतीने देशभर राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियान अर्थात ’स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, शास्त्रशुद्ध हात धुणे प्रात्यक्षिक आदी विविध उपक्रम राबविण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन …
Read More »भाजप प्रभाग 9, 10ची बैठक
नवी पनवेल ः रामप्रहर वृत्त पुन्हा आणू या, आपले सरकार या शीर्षकाखाली भारतीय जनता पार्टी पनवेल यांच्या वतीने महापलिका प्रभागांमधील कार्यकर्त्यांच्या बैठकींचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत प्रभाग क्रमांक 9 आणि 10ची बैठक शुक्रवारी कळंबोलीमध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper