पनवेल ः बातमीदार दि. 2 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन होत आहे. परिसरातल्या बाजारपेठा देखील बाप्पाच्या आगमनासाठी सजलेल्या आहेत. गणेशभक्तचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलीस देखील सज्ज झालेले आहेत. त्यासाठी दिवस-रात्र पोलीस ठिकठिकाणी बंदोबस्त नेमणार आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांच्या उपस्थितीत पळस्पे येथे …
Read More »एपीएमसी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणार!
सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्याचा मानस असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (दि.29) सांगितले. येथील भाजीपाला संकुलाच्या छत्रपती संभाजी महाराज भाजीपाला आवारातील अतिरिक्त 285 …
Read More »उत्सव पर्यावरणस्नेही व्हावा
गरीब असोत वा श्रीमंत सर्व स्तरांतील वस्त्यांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव तितक्याच उत्साहात साजरा केला जाताना दिसतो. हा उत्सव जसा लोकांना एकत्र आणतो, सार्वजनिक जीवनाची रंगत वाढवतो, तसाच तो काही प्रमाणात प्रदूषणातही भर घालतो हे आपण मान्य करायलाच हवे. तसे ते केले तरच आपण हे प्रदूषण रोखण्यास वा कमी करण्यास हातभार लावू …
Read More »गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बदाम, पिस्त्याचे दर वधारले
पनवेल ः वार्ताहर गणेशोत्सव काही तासांवर येऊन ठेपला असताना पनवेल बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात सुक्या मेव्याची आवक वाढू लागली आहे. सद्यस्थितीत प्रतिदिन 50 ते 60 टन आवक होऊ लागली आहे. काजूसह अक्रोडचे दर स्थिर असले तरी बदाम, पिस्त्याचे दर काही प्रमाणात वाढले आहेत. पावसाळ्यामुळे दोन महिने बाजारपेठेत सुक्यामेव्याची आवक कमी झाली …
Read More »तिहेरी तलाकच्या पाठिंब्यासाठी मराठमोळ्या महिलेचा बुरखा घालून प्रचार
पनवेल ः वार्ताहर नुकताच केंद्र सरकारने तिहेरी तलाक कायदा मंजूर केल्याने मुस्लीम महिला वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात आनंद दिसून आला. हा कायदा खरोखरच मुस्लीम भगिनींसाठी फायद्याचा असून त्या कायद्याची प्रसिद्धी व्हावी व केंद्र सरकारचे अभिनंदन करावे, त्या कायद्याला पाठिंबा द्यावा, या उद्देशाने पनवेलमधील उद्योजिका मनीषा म्हात्रे या स्वतः बुरखा परिधान करून …
Read More »विसपुते अध्यापक महाविद्यालयाची स्नेहकुंज आधार घराला भेट
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील प्रसिद्ध असलेल्या विसपुते अध्यापक महाविद्यालयाने वृद्धांसाठी मानवतेचा प्रयोग चालत असलेल्या स्नेहकुंज आधारगृह नेरे येथील आश्रमाला भेट दिली. तेथील वृद्धांशी विद्यार्थ्यांनी गप्पा मारल्या. त्यांच्यासाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम केले. यात विविध गाण्यांवर नृत्य, नाट्यछटा इत्यादी करून वृद्धांचे मनोरंजन केले, तसेच वृद्धांसाठी एक एफएम रेडिओ भेट दिला. त्यानंतर …
Read More »गव्हाण विद्यालयात शिक्षक-पालक संघाची स्थापना
पनवेल : रामप्रहर वृत्त गव्हाण येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष 2019-20साठी पालक शिक्षक संघ व माता पालक संघाची स्थापना करण्यात आली. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत यांच्या …
Read More »‘एनएमएमटी’ची उरण, पनवेलकडे धाव
उत्पन्नवाढीसाठी महामुंबई क्षेत्रावर लक्ष नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त ‘एनएमएमटी’ उपक्रमाला उभारी देण्यासाठी प्रशासनाने आता महामुंबई क्षेत्रावर लक्ष देण्याचे ठरविले आहे. पुणे-पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बससेवेचा दाखला देत त्या धर्तीवर शेजारील पनवेल महापालिका व उरण नगर परिषदेने योग्य ते सहकार्य केल्यास नवी मुंबई परिवहन उपक्रमाचा तोटा भरून निघू शकतो, अशी अपेक्षा …
Read More »मुरूड-जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांचा ओघ वाढणार
मुरूड-जंजिरा महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्यावरील एक जलदुर्ग आहे. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी हा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला. अगदी किल्ला हातात आलाच होता, पण जंजिरा अखेरपर्यंत अजिंक्यच राहिला. सध्या झी मराठीवर छत्रपती संभाजी ही मालिका सुरू आहे. मागील काही भागात जंजिरा किल्ल्याशी संबंधित गोष्टी दाखविल्या जात आहेत. कोंडाजी फर्जंद सध्या …
Read More »विहीर पडल्याने ऐेन पावसाळ्यात पाणीटंचाई
पोलादपुरातील खोपड गावातील महिलांची वणवण सुरू पोलादपूर : प्रतिनिधी अतिवृष्टीमध्ये खोपड (ता. पोलादपूर) गावातील विहीर पडल्याने ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे. पोलादपूर तालुक्यातील गोवले ग्रामपंचायत हद्दीतील खोपड गावातील एकमेव विहीर 29 जुलैला झालेल्या अतिवृष्टीत पूर्ण कोसळली असून, त्या विहिरीत असलेला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper