बिल वेळेवर भरतो मग सेवा का नाही; व्यापारी वर्गाचा संतापजनक सवाल महाड : प्रतिनिधी तालुक्यात भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या सेवेचा गेल्या वर्षभरापासून बोजवारा उडाला असून, या खंडित सेवेमुळे ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत ऐकून घेण्यास स्थानिक पातळीवर अधिकारीदेखील नसल्याने ही सेवा म्हणजे वार्यावरची वरात झाली आहे. …
Read More »नेरळकरांची तहान भागणार
मुख्यमंत्री पेयजल योजनेला पालकमंत्र्यांकडून तत्त्वतः मान्यता कर्जत : बातमीदार नेरळला नवीन पाणी योजना मंजूर करण्यात यावी, यासाठी नेरळ भाजपच्या वतीने पालकमंत्र्यांची भेट घेण्यात आली. त्या वेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री पेयजल योजनेमधून नेरळ वाढीव नळपाणी योजनेला तत्त्वतः मान्यता दिली. नेरळची लोकसंख्या …
Read More »काँग्रेसचे नेते मारुती देवरेंचा भाजपत प्रवेश
नागोठणे : प्रतिनिधी रोहे तालुका काँग्रेसचा राजीनामा दिलेले मारुती देवरे यांनी मंगळवारी (दि. 30) मुंबईत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी रामचंद्र देवरे, परशुराम तेलंगे, सचिन मोदी यांच्यासह मारुती देवरे यांचे शेकडो समर्थक भाजपत दाखल झाले. भाजपचे ज्येष्ठ नेते संजय कोनकर, युवा नेते …
Read More »निसार तांबोळी पदकाने सन्मानित
पनवेल ः रामप्रहर वृत्त पोलीस खात्यात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांना नुकतेच राज्य पोलीस मुख्यालयात राज्यपालांच्या हस्ते पोलीस मेडलने सन्मानित करण्यात आले. हिंगोली, नांदेड, वर्धा, नंदुरबार, औरंगाबाद, नाशिक तसेच मुंबई येथे निसार तांबोळी यांनी पोलीस खात्यावरील ठिकाणी अतिशय चांगले काम केले. त्यांनी 20 वर्षे पोलीस खात्यात …
Read More »जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी केली विचुंबे पुलाची पाहणी
विचुंबे (ता. पनवेल) : येथील पुलावरील रस्ता खचल्याचे वृत्त समजताच जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांसमवेत पुलावर जाऊन पाहणी तसेच रस्त्याची डागडुजी केली. याच अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून नवीन पूल उभारण्यात येणार आहे. या पाहणीवेळी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भिंगारकर, सचिन …
Read More »जेएनपीटीने केला इंटर टर्मिनल रेल हँडलिंग ऑपरेशन सामंजस्य करार
उरण ः प्रतिनिधी जेएनपीटीने आयात-निर्यात समुदायासाठी अधिक गरजेचा असलेला इंटर टर्मिनल रेल हँडलिंग ऑपरेशनसाठी जेएनपीटी व इतर टर्मिनलमध्ये सामंजस्य करार करून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आयात-निर्यात मालाच्या एकत्रित रेल कंटेनरची हाताळणी करण्यासाठी 2007मध्ये जेएनपीटी, एनएसआयसीटी आणि जीटीआयमध्ये इंटर टर्मिनल रेल हँडलिंग ऑपरेशनसंदर्भात सामंजस्य करार झाला होता, तथापि एनएसआयसीटी आणि …
Read More »मुंबई मराठी पत्रकार संघाची वर्षा सहल रंगली
उलवे : रामप्रहर वृत्त मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांची वर्षा सहल यंदा रविवारी (दि. 28) रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, उलवे येथे नेण्यात आली होती. ही सहल चांगलीच रंगली. आंतरराष्ट्रीय स्तराचे हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पाहून पत्रकार व त्यांचे कुटुंबीय भारावून गेले. धो-धो कोसळणारा पाऊस आणि तरण तलावात …
Read More »सीकेटी महाविद्यालयात माहितीदूत उपक्रमाचे आयोजन
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत आणि युनिसेफ व राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्या प्रत्यक्ष सहभागाने ’युवा माहितीदूत’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाद्वारे महाविद्यालयातील युवकांमार्फत शासकीय योजनेची …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वावंजे आणि फणसवाडी शाळेत वह्यावाटप
पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील वावंजे आणि फणसवाडी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी (दि. 30) करण्यात आले होते. या वेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून मार्गदर्शन केले. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विविध शैक्षणिक उपक्रम राबवून गरीब गरजू विद्यार्थ्यांना …
Read More »सुगम संगीत स्पर्धेत ‘सीकेटी’च्या सुरांची मोहिनी
पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबईतील विक्रोळी येथील विद्या विकास सोसायटी संचलित मटकर संगीत विद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सुगम संगीत स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सीकेटी इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. संगीतकार सुधीर फडके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी 29 जुलै या त्यांच्या स्मृतिदिनी ही स्पर्धा घेतली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper