Breaking News

Ramprahar Team

पुराच्या पाण्यात दहिवली गावाच्या स्मशानभूमीची शेड गेली वाहून

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील उल्हासनदीच्या दहिवली-मालेगाव पुलालगत असलेल्या स्मशानभूमी अंत्यसंस्कार शेडचे पावसाच्या पाण्याने नुकसान झाले आहे. नदीच्या धामोतेकडील बाजूस असलेल्या स्मशानभूमी शेडचे लोखंडी खांब आणि पत्रे जमिनीवर पडून वाहून गेले आहेत. ही गरज लक्षात घेऊन दहिवली ग्रामपंचायतीने तात्काळ उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कोसळलेले पत्र्याचे शेड बाजूला करून …

Read More »

खोपोलीतील 30 विद्यार्थी एसपीसीमध्ये सहभागी

खोपोली ः बातमीदार खोपोलीतील छत्रपती शाहू महाराज माध्यमिक विद्यालयात रायगड जिल्हा पोलिस आयोजित एसपीपी (स्टुडंट पोलीस कॅडेट) या केंद्र शासनाच्या बहुउद्देशीय कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. अभियानात  माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवी व नववीमधील 15 मुले व 15 मुली अशा 30 कॅडेट्सची  निवड करण्यात आली. एसपीसीमध्ये विविध बाबींचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले …

Read More »

भिलवले पूल धोकायदायक

खोपोली : प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे भिलवले-वावंढळ रस्त्यावरील जिल्हा परिषदेच्या पुलाला धोका निर्माण झाला असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सतत पडणार्‍या मुसळधार पावसामुळे उंचीने कमी असलेल्या या पुलावरून पाणी जात होते. वाहून आलेल्या कचर्‍याचे साम्राज्य या पुलावर तयार झाले आहे. मोठमोठ्या खड्ड्यात हा पूल उभा असून पुलाचे कठडे दिसत नाहीत. …

Read More »

गजल ग्रुपतर्फे ए. के. शेख यांचा पनवेलमध्ये सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त येथील गजल ग्रुपतर्फे ज्येष्ठ गजलकार ए. के. शेख यांचा शनिवारी (दि. 13) सत्कार करण्यात आला. शेख सरांचा ‘गजलवेदना’ या गजलसंग्रहाचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या एमए (फर्स्ट पार्ट) मराठीच्या नवीन अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. याबद्दल त्यांचा सर्व स्तरातून सन्मान होत आहे. पनवेल येथील शासकीय बीएड …

Read More »

सागरी सुरक्षा जनजागृती अभियान

मोरा पोलीस ठाण्याच्या वतीने मार्गदर्शन पनवेल ः वार्ताहर मोरा सागरी पोलीस ठाणे यांच्या वतीने मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माणकेश्वर मंदिर केगाव येथे सागरी सुरक्षा जनजागृती अभियान याविषयी नुकतीच मिटिंग घेण्यात आली. समुद्रातील अनोळखी बोट, समुद्र किनारी इतरत्र अनोळखी फिरणारी व्यक्ती यांची माहिती मोरा …

Read More »

लाकडाने मारहाण, एक जखमी

पनवेल ः जय मल्हार हॉटेलसमोर उभे केलेली शेड काढत असताना संग्राम भोपी याने ताई तुकाराम ढोकळ (वय 60) या महिलेला लाकडाच्या सहाय्याने मारहाण केली. शहर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरढोण येथील ताई तुकाराम ढोकळ शिरढोण गावचे बस स्टॉपजवळ जय मल्हार हॉटेलसमोर जागा आहे. या ठिकाणी गावातील …

Read More »

‘पदपथावर दुचाकी उभी करणार्यांवर कारवाई करा’

पनवेल ः प्रतिनिधी नवीन पनवेलमध्ये रस्त्याने चालण्यासाठी जागा नसताना आता दुचाकीवाले आपल्या गाड्या पदपथावर उभ्या करू लागल्याने आता चालायचे कोठून, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. वाहतूक पोलिसांनी अशा दुचाकी वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. नवीन पनवेलमध्ये रेल्वे स्टेशन समोरील रस्त्याच्या कोणत्याही बाजूला जागा मिळेल तिथे रिक्षा स्टँड …

Read More »

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

खांदा कॉलनी ः जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने पूज्य पिताजी कैलासवासी चांगू काना ठाकूर यांच्या 17व्या पुण्यस्मरणानिमित्त खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. हा सोहळा संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्या प्रमुख …

Read More »

खारघर येथे सिडकोच्या माध्यमातून टॅक्सी स्टँड मंजूर

खारघर ः येथील लिटील व्हर्ल्ड मॅलसमोर सिडकोच्या माध्यमातून टॅक्सी स्टँड मंजूर करण्यात आला आहे. या कामासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रयत्न केल्याने हे काम मंजूर झाले. त्याबद्दल शिवसेऩा उपमहानगर प्रमुख गुरुनाथ पाटील, तसेच टॅक्सी स्टॅण्डच्या सभासदांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे …

Read More »

पुढल्या वर्षी टेकऑफ

नवी मुंबई विमानतळ कामाला सिडकोकडून गती नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 2020मध्ये विमानाचे पहिले टेकऑफ होईल, या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीबरोबरच विमानतळापर्यंत प्रवाशांना कमीत कमी वेळात पोहोचता यावे, यासाठी सिडकोने जलमार्गाच्या पर्यायावर भर दिला आहे. त्यानुसार नवी मुंबई ते मुंबई दरम्यानच्या सागरी …

Read More »