Breaking News

Ramprahar Team

लाकडाने मारहाण, एक जखमी

पनवेल ः जय मल्हार हॉटेलसमोर उभे केलेली शेड काढत असताना संग्राम भोपी याने ताई तुकाराम ढोकळ (वय 60) या महिलेला लाकडाच्या सहाय्याने मारहाण केली. शहर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरढोण येथील ताई तुकाराम ढोकळ शिरढोण गावचे बस स्टॉपजवळ जय मल्हार हॉटेलसमोर जागा आहे. या ठिकाणी गावातील …

Read More »

‘पदपथावर दुचाकी उभी करणार्यांवर कारवाई करा’

पनवेल ः प्रतिनिधी नवीन पनवेलमध्ये रस्त्याने चालण्यासाठी जागा नसताना आता दुचाकीवाले आपल्या गाड्या पदपथावर उभ्या करू लागल्याने आता चालायचे कोठून, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. वाहतूक पोलिसांनी अशा दुचाकी वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. नवीन पनवेलमध्ये रेल्वे स्टेशन समोरील रस्त्याच्या कोणत्याही बाजूला जागा मिळेल तिथे रिक्षा स्टँड …

Read More »

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

खांदा कॉलनी ः जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने पूज्य पिताजी कैलासवासी चांगू काना ठाकूर यांच्या 17व्या पुण्यस्मरणानिमित्त खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. हा सोहळा संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्या प्रमुख …

Read More »

खारघर येथे सिडकोच्या माध्यमातून टॅक्सी स्टँड मंजूर

खारघर ः येथील लिटील व्हर्ल्ड मॅलसमोर सिडकोच्या माध्यमातून टॅक्सी स्टँड मंजूर करण्यात आला आहे. या कामासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रयत्न केल्याने हे काम मंजूर झाले. त्याबद्दल शिवसेऩा उपमहानगर प्रमुख गुरुनाथ पाटील, तसेच टॅक्सी स्टॅण्डच्या सभासदांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे …

Read More »

पुढल्या वर्षी टेकऑफ

नवी मुंबई विमानतळ कामाला सिडकोकडून गती नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 2020मध्ये विमानाचे पहिले टेकऑफ होईल, या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीबरोबरच विमानतळापर्यंत प्रवाशांना कमीत कमी वेळात पोहोचता यावे, यासाठी सिडकोने जलमार्गाच्या पर्यायावर भर दिला आहे. त्यानुसार नवी मुंबई ते मुंबई दरम्यानच्या सागरी …

Read More »

चौल चोरी प्रकरणातील आरोपी ताब्यात

रेवदंडा ः प्रतिनिधी डिसेंबर 2018मध्ये चौल जाखमाता मंदिर परिसरातील चोरी प्रकरणातील फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यात रेवदंडा पोलिसांना यश मिळाले. रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार  व्ही. के. सरके व पोलीस नाईक कल्पेश नलावडे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथून आरोपीला जेरबंद केले. रेवदंडा पोलिसांनी तपास करून त्यावेळी  दोन अल्पवयीन मुले व 20 …

Read More »

वयोवृद्ध महिला दोन तास वेठीस

म्हसळा पोलीस स्थानकातील संतापजनक प्रकार म्हसळा ः प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित व आनंदी जीवन जागता यावे, यासाठी महाराष्ट्र पोलीस विभागाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. मात्र  शनिवारी (दि. 13) म्हसळा पोलीसांत चोरीची तक्रार देण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ महिलेला तब्बल दोन तास तक्रार न घेताच वेठीस धरून ठेवले. म्हसळा तालुक्यातील देवघर येथील …

Read More »

कै. चांगू काना ठाकूर यांची पुण्यतिथी

गव्हाण कोपर ः ज. भ. शि. प्र. संस्थेच्या एम. एन. एम. विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयात कै. चांगू काना ठाकूर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या वेळी विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, मुख्याध्यापिका  नम्रता न्यूटन, अरुण जोशी, गौरी देशपांडे तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.  शिवाजीनगर …

Read More »

गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव समारंभ

नवीन पनवेल ः पिताजी कै. चांगू काना ठाकूर यांच्या 17व्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांच्या गौरव समारंभाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. हा सोहळा संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य शिक्षण …

Read More »

घारापुरी बेटाच्या स्वच्छतेसाठी ओएनजीसीकडून साडेपंधरा लाखांचा निधी

ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांना यश; ग्रामस्थांमध्ये समाधान उरण ः प्रतिनिधी जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटाच्या स्वच्छतेसाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ओएनजीसी अधिकार्‍यांनी सीएसआर फंडातून 15 लाख 45 हजार 803 रुपये निधीचा धनादेश ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केला आहे. जागतिक किर्तीच्या घारापुरी बेटावरील अद्भुत प्राचीन कोरीव लेण्यांमुळे बेटाला जागतिक वारसा लाभला आहे. शिवकालीन लेणी पाहण्यासाठी जगभरातून …

Read More »