उरण : प्रतिनिधी उरणच्या जेएनपीटी बंदरातील 11 नंबरच्या आरटीसीजी क्रेनचा रोप तुटण्याची घटना सोमवारी (दि. 8) घडली. कंटेनर हाताळत असतानाच हा रोप तुटल्याने उचलला जात असलेला कंटेनर खाली असलेल्या दुसर्या कंटेनरवर आदळला. त्यामुळे दोन्ही कंटेनरचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. जेएनपीटीच्या अधिकारी वर्गाने या वृत्ताला दुजोरा देताना वातावरणात असलेल्या सोसाट्याच्या …
Read More »प्रतिक पाटील यांचा वाढदिवस
पनवेल : आरीवली गावातील प्रतिक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी बुधवारी पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी सौरभ कडू उपस्थित होते.
Read More »मोठा खांदा उपवस्तीत वह्यावाटप कार्यक्रम
पनवेल : श्री. रामशेठ ठकूर सामाजिक विकास मंडळातर्फे मोठा खांदा उपवस्तीत वह्यावाटप कार्यक्रम झाला. या वेळी माजी नगरसेविका अलका भगत, प्रभाग 14चे युवा मोर्चा अध्यक्ष परेश पाटील, रमेश भगत, बूथ अध्यक्ष अमोल भगत, बूथ अध्यक्ष अरविंद भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
Read More »खारघर येथे वह्यावाटप, वृक्षारोपण
नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती अ चे अध्यक्ष शत्रुघ्न काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने बुधवारी वह्यावाटप, तसेच वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (दि. 10) करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत …
Read More »चटकदार मक्यांना उरणमध्ये मागणी
उरण : वार्ताहर पावसाळा सुरू झाल्याने ठिकठिकाणी धबधबे, डॅम ओसंडून वाहू लागले आहेत. पर्यटकांची वाढणारी गर्दी व पावसाळ्याच्या दिवसात मक्यांना असणारी मागणी लक्षात घेता ठिकठिकाणी भाजलेल्या, उकडलेल्या मक्यांच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्याच्या दिवसात पांढर्या मक्यांचा हंगाम सुरू असतो. त्यामुळे पावसाळ्यात या मक्यांचा आस्वाद लहान मुले व वयोवृद्धांपर्यंत …
Read More »रिपाइं डेमोक्रेटीकच्या महिला जिल्हाध्यक्षपदी निलीमा पवार
पनवेल शहराध्यक्षपदी सुरेखा कोळी पनवेल : वार्ताहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात युवा राष्ट्रीय अध्यक्ष कनिष्क कांबळे यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निलीमा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर पनवेल शहराध्यक्षपदी सुरेखा कोळी यांची नियुक्ती …
Read More »आवरे व कडापे येथे वह्यावाटप
कळंबोली : प्रतिनिधी उरण पूर्व भागातील आवरे येथील स्व. छबीबाई गणपत गावंड सामाजिक संस्थेतर्फे रायगड जिल्हा परिषद शाळा आवरे शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आले. या वेळी गुणवंत विद्यार्थांचा सत्कार, फाईलचे वाटप, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कारही करण्यात आला. या वेळी रा.जि.प शाळा कडापे या ठिकाणी आवरे गावातील नवनिर्वाचित सदस्य संतोष पाटील, माजी …
Read More »वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिक, गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन
पनवेल : प्रतिनिधी महानगरपालिकेतील भाजपच्या नगरसेविका सुशिला घरत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 15 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता नवीन पनवेलमध्ये ‘गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ’ आयोजित करण्यात आला आहे. हा सत्कार सोहळा …
Read More »पाच जणांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल
पनवेल : बातमीदार तालुक्यातील एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 32 वर्षीय पीडित महिला नवबौद्ध असून पनवेल तालुक्यातील एका गावात राहत आहे. 2006 मध्ये तिचे लग्न झाले आहे. अंतरजातीय विवाह केल्यामुळे पीडित महिलेला तिची सासू, दीर, …
Read More »खारघरमधील समस्यांबाबत सिडको अधिकार्यांबरोबर बैठक
खारघर : रामप्रहर वृत्त खारघरमध्ये नाला फुटण्याच्या घडलेल्या घटनेबाबत मंगळवारी (दि. 9) दुपारी सिडको भवन येथील तिसर्या माळ्यावरील मुख्य अभियंत्याच्या कार्यालयात सिडकोचे मुख्य अभियंता श्री. वरखेडकर व अधीक्षक अभियंता श्री. गिरी, तसेच कार्यकारी अभियंता श्री. अनुसे, श्री. बनकर यांच्यासोबत बैठक झाली. या वेळी पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग समितीचे सभापती शत्रुघ्न काकडे, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper