Breaking News

Ramprahar Team

माणगावात कलशारोहण समारंभ

माणगाव : जुने माणगाव येथील श्री स्वयंभू संगमेश्वर देवस्थान मंदिराचा कलशारोहण समारंभ 30 व 31 मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त गुरुवार (दि. 30) दुपारी कलश पूजन व मिरवणूक काढण्यात येणार आहे. भद्रकाली नृत्यमंडळ कला पथक (बंगलोर) हे या मिरवणुकीचे विशेष आकर्षण आहे. शुक्रवार (दि. 31) पहाटे रुद्राभीषेक, वास्तुशांती, …

Read More »

विहिरी आटल्या अन् कूपनलिका कोरड्या

कळंबमध्ये गेल्या 10 वर्षांतील सर्वात मोठी पाणीटंचाई; ट्रँकरने पाणीपुरवठा करण्यात अडथळे कर्जत : बातमीदार तालुक्यातील कळंब या मोठ्या लोकसंख्येच्या गावात मागील 10 वर्षातील सर्वात मोठी पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. गावाला पाणीपुरवठा करणार्‍या पाचही विहिरी आटल्या असून,  बोअरवेल कोरड्या पडल्याने भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, हे गाव पाणी …

Read More »

परजिल्ह्यातील पतसंस्था पतहिनांना प्रतिष्ठादायक

पोलादपूर तालुक्यात गेल्या 20 व्या शतकाच्या अखेरीस स्थानिक पतसंस्थांनी तालुक्यातील गोरगरीब जनतेला ’सहकाराचं कोंबडं आरवण्यापूर्वीच कापून खाल्लं’ असा नैराश्यजनक अनुभव दिल्यानंतर नव्या 21 व्या शतकाचे पहिले दशक संपल्यानंतर परजिल्ह्यातील न्यू सातारा पतसंस्था, मोरेमाऊली पतसंस्था-मुंबई आणि चिपळूण नागरी पतसंस्था या तीन पतसंस्थांनी आगमन केले आहे. सहकाराची विश्वासार्हता संपुष्टात आणणार्‍या स्थानिक बुडीत …

Read More »

हवामान संकटाच्या दिशेने

मानवतेवरील हे मोठे संकट परतवून लावायचे असेल तर आपण तितकेच परिणामकारक असे बदल केले पाहिजेत असा हा मतप्रवाह आहे. आणि हा बदल घडवून आणून जागतिक तापमानवाढ 1.5 अंशावरच रोखायची असेल तर आपल्या हातात अवघी 12 वर्षे आहेत असे शास्त्रज्ञ सांगतात. अन्यथा अवघे जग एका मोठ्या कडेलोटाच्या दिशेने पुढे सरकते आहे …

Read More »

विमानतळ बाधितांचे योग्य पुनर्वसन करावे -पुंडलिक म्हात्रे

उरण : प्रतिनिधी नवी मुंबई विमानतळासाठी बाधित होणार्‍या गावांचे पुनर्वसन करतांना गावातील सर्व वास्तू, सुविधा पुनर्वसन होणार्‍या ठिकाणी उभारल्या जातील, असे आश्वासन सिडकोच्या वतीने ग्रामस्थांना देण्यात आले. त्यानुसार गावात स्मशानभूमी पासून मंदिरे, समाजमंदिरे आणि सार्वजनिक तलावही बांधून देण्यात येणार आहेत. यासाठी काही भूखंड राखीव ठेवण्यात आले आहेत, मात्र प्रत्यक्षात गावात …

Read More »

तालुक्याला पाणीपुरवठा करणारी विहीर भग्नावस्थेत

उरण : बातमीदार तालुक्याला पाणीपुरवठा करणारी विहीर म्हणून समजली जाणारी उरण पंचायत समितीच्या विहिरीची अवस्था पाणी असूनही भग्नावस्था झाली आहे. उन्हाचे चटके बसू लागल्याने पाणीटंचाईचा सामना आम जनतेला करावा लागत असतानाही या विहिरीतील पाण्याचा वापर होत नसल्याने आमजनतेत नाराजीचा सूर आहे. तरी जिल्हा परिषदेने उरण पंचायत समितीच्या  माध्यमातून या पाण्याचा …

Read More »

23 जूनला आवरे, गोवठणे ग्रा. पं.च्या निवडणुका

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील जुलै ते सप्टेंबर 2019 मध्ये मुदत संपणार्‍या, तसेच नव्याने स्थापित करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता थेट सरपंच व सदस्य पदांच्या निवडणुका घेण्यात येणार असून, तालुक्यातील आवरे व गोवठणे या दोन ग्रामपंचायतीचे बिगुल वाजले असून, 31 मे 2019 ते 6 जून 2019  सकाळी 11:00 ते दुपारी …

Read More »

पनवेल ते जेएनपीटी जलवाहिनी फुटली

लाखो लिटर पाण्याची नासाडी, एमजेपीचे दुर्लक्ष खारघर : प्रतिनिधी पनवेल ते जेएनपीटीकडे जाणारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी मोठ्या प्रमाणात फुटल्याने दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. अनेक वेळा दुरुस्त करून देखील जलवाहिनी वारंवार फुटत आहे. विशेष म्हणजे पनवेल महानगरपालिका व सिडको क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी संकट ओढवले असताना लाखो …

Read More »

स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन!

पनवेल : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पुष्पहार अर्पण करून स्वातंत्र्यवीर सावकरांना अभिवादन केले. या वेळी माजी उपमहापौर चारुशीला घरत, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, भाजपचे पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा तथा नगरसेविका मुग्धा लोंढे, पनवेल …

Read More »

मेरिटाईम बोर्डाच्या मालमत्तेला मोरा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

उरण : प्रतिनिधी मोरा-मुंबई जलमार्गावरील मोरा धक्क्यावर मोटारसायकली घेऊन जाण्यास बंदी असतानाही प्रवाशी बिनधास्त मोटारसायकली घेऊन जात आहेत. त्यावर बंदी घालण्यासाठी मोरा बंदराच्या प्रवेशद्वाराला मोरा पोलिसांनी बेडी लावून बंदराचे प्रवेशद्वार बंद केले आहे. सदरचे काम मेरिटाईम बोर्डचे असतानाही हे काम पोलिसांना करावे लागत असल्याने ते नियमाला धरून नसल्याने प्रवासी वर्गातून …

Read More »