Breaking News

Ramprahar Team

पनवेल येथून अल्पवयीन मुलाला फूस लावून पळविले

पनवेल : वार्ताहर 16 वर्षीय मुलास अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून फूस लावून नेल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे. शहरातील पनवेल रेल्वे स्टेशनजवळील आझाद नगर झोपडपट्टी येथे राहणार्‍या विमल कुमारस्वामी कोंडर यांचा 16 वर्षीय मुलगा आकाश याला राहत्या घरातून कोणीतरी अज्ञाताने काही कारणावरून फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस …

Read More »

ब्राह्मण सभेच्या वतीने सावरकर जयंती व व्यसनमुक्ती पथनाट्य

पनवेल : रामप्रहर वृत्त ब्राह्मण सभा, नवीन पनवेल या संस्थेच्या वतीने स्वा. सावरकर जयंती व व्यसनमुक्ती पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. नवीन पनवेल, सेक्टर 11 येथील सिडको उद्यानातील एम्फी थिएटरमधेे हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला नगरसेविका मुग्धा लोंढे, संवेदना रुग्णसेवा समितीचे प्रवर्तक प्रसाद अग्निहोत्री, शिवसेेेना महिला आघाडीच्या अपूर्वा प्रभू, भाजपा युवा …

Read More »

खोपोली नगरपालिका शाळांत तुटलेली खेळणी

खोपोली : प्रतिनिधी शंभर कोटीपेक्षा अधिक वार्षिक बजेट असलेल्या खोपोली नगरपालिकेकडून नागरिकांना मुलभूत सुविधा देण्याकडे पूर्ण दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट होत आहे. खोपोली नगरपालिकेच्या बहुतेक शाळांत स्वच्छतागृहांची अतिशय दुरावस्था झाल्याने बंद ती आहेत.दुसरीकडे नगरपालिका शाळांच्या आवारात खेळणी आहेत, पण ती तुटलेली व असुरक्षित स्थितीत आहेत. खोपोली नगरपालिकेच्या बारापैकी काही शाळांमध्ये स्वच्छतागृहेच …

Read More »

जंजिरा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला कुलूप

मुरूड : प्रतिनिधी ऐतिहासिक मुरूड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी देश विदेशातून  पर्यटक येत असतात. मात्र पुरातत्व खात्यांने कोणतीही पुर्वसूचना अथवा लेखी पत्र न देता रविवारी (दि. 26) किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला अचानक कुलूप लावल्याने हजारो पर्यटकांना निराश होऊन परतावे लागले. काही महिन्यापुर्वीच पुरातत्व खात्याने जंजिरा किल्ल्याला नवीन मोठे लोखंडी प्रवेशद्वार बसविले आहे. हा …

Read More »

रोह्यातील 229 प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या

तालुक्यात केंद्र प्रमुखासह 61 कर्मचार्‍यांची कमतरता रोहे ः प्रतिनिधी तालुक्यातील 229 प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यातील 82 शिक्षकांनी जिल्हा बदली घेतली असून, परजिल्ह्यातील एकूण 111 शिक्षक रोहा तालुक्यात दाखल झाले आहेत. तरीही तालुक्यात आद्याप केंद्र प्रमुखांसह 61 शिक्षकांची कमतरता आहे. रोहा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 237शाळा आहेत. तेथे 2018-19 …

Read More »

स्टेशन ठाकूरवाडीत पाण्याचे दुर्भिक्ष

टंचाईच्या काळात रेल्वेकडूनही ग्रामस्थांची कोंडी कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील स्टेशन ठाकूरवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष जाणवत आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर असलेल्या या वाडीतील आदिवासी महिला कर्जत आणि लोणावळा या दोन स्थानकातून पिण्याचे पाणी घरी घेऊन जात असत. मात्र रेल्वे प्रशासनाने ट्रेनमधून पाणी वाहून नेण्यास हरकत घेतल्याने या वाडीत पाणीटंचाईचे …

Read More »

राजीव कुमार यांच्याविरोधात सीबीआयची लूक आऊट नोटीस

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्याविरोधात सीबीआयने लूक आऊट नोटीस जारी केली आहे. यानुसार राजीव कुमार यांना परदेश दौरा करायचा असल्यास विमानतळ प्राधिकरण त्याची माहिती सीबीआयला देणार आहे. 23 मे रोजी त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली असून ती एका वर्षासाठी वैध असेल. राजीव …

Read More »

प्रगती एक्स्प्रेसचे इंजीन बंद; प्रवाशांचा खोळंबा

ठाणे ः प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात काल प्रगती एक्स्प्रेसचे इंजीन बंद पडल्यामुळे पुण्याहून मुंबईला येणार्‍या शेकडो प्रवाशांचा खोळंबा झाला. अर्ध्या तासापासून प्रगती एक्स्प्रेस स्थानकात उभी होती.  गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेचे वेळापत्रक ’रुळावर’च आले नाही. रेल्वे रुळांना तडे, ओव्हरहेड वायर तुटणे, इतर तांत्रिक बिघाड आदी कारणांमुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत …

Read More »

तीन चिमुकल्यांची निर्घृण हत्या

इफ्तार पार्टीला न बोलावल्याचा राग बुलंदशहर ः वृत्तसंस्था रोजा इफ्तार पार्टीचे निमंत्रण न दिल्याच्या रागातून विशीतल्या तीन तरुणांनी तीन लहान बालकांचा खून केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथे घडली. अपहरण करून बालकांचा गोळी घालून निर्घूण खून करण्यात आला. त्यानंतर या तीन बालकांचा मृतदेह पाण्याच्या हौदात टाकण्यात आला होता. या …

Read More »

शपथविधीसाठी जगनमोहन रेड्डींचे मोदींना आमंत्रण

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आंध्र प्रदेशात प्रचंड बहुमत मिळवत सत्तास्थापनेच्या मार्गावर असलेल्या वायएसआर काँग्रेसप्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी रविवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत आपल्या शपथविधी सोहळ्यास येण्याचे आमंत्रणही दिले. जगनमोहन 30 मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. जगनमोहन …

Read More »