भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा दावा मुंबई ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या देशाचे लक्ष निकालांकडे लागून राहिले आहे. यंदाच्या निवडणुकीत बाजी मारून केंद्रात कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता जनतेला आहे. त्यातच विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवलेले अंदाज एनडीएसाठी विशेषत: भारतीय जनता पार्टीसाठी सुखावणारे आहेत. महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युती 45 जागा …
Read More »सेन्सेक्स 900 अंकांनी उसळला; एक्झिट पोल इफेक्ट
मुंबई ः प्रतिनिधी रविवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या एक्झिट पोल्सचा परिणाम शेअर मार्केटवर झाला आहे. काल सकाळी मार्केटने 900 अंकांनी उसळी घेतली, तर निफ्टीही 200 अंकांनी वधारला आहे. या बढतीमुळे जागतिक बाजारपेठेत रुपयाही 69 पैशांनी मजबूत झाला आहे. लोकसभेच्या 542 जागांसाठी सात टप्प्यांमध्ये रविवारी मतदान पार पडले. मतदान संपल्यावर विविध संस्थांनी …
Read More »पुणे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
पाच महिन्यांत 1337 जणांना मदतीचा हात; प्रोत्साहन देण्याची गरज पुणे ः प्रतिनिधी रस्त्यात आढळलेल्या 70 वर्षांच्या जखमी अवस्थेतील मनोरुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करणे, रिक्षात हरविलेली बॅग दागिन्यांसह महिलेच्या स्वाधीन करणे, मनाविरुद्ध लग्न ठरविल्याने घर सोडून गेलेल्या तरुणीला शोधून पालकांच्या ताब्यात देणे, आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला जीवदान अशा एक ना …
Read More »गारंबी जंगलात मोठी वारुळे
पावसाळा जवळ आला की पशू-पक्ष्यांना आधी चाहूल लागते व प्रत्येक जण आपले घरटे बांधण्याच्या कामाला लागतो. मुंग्यासुद्धा पावसाच्या पाण्यापासून संरक्षण व्हावे यासाठी जंगलात मातीच्या साह्याने मोठ-मोठी वारुळे तयार करीत असतात. या वारुळात पावसाळ्यातील दिवसांसाठी अन्नाचा साठा केला जातो. मुरूडमधील गारंबी जंगल परिसरात अशी मोठं मोठी वारुळे दिसून येतात. (छाया : …
Read More »ह.भ.प. सौ. उषाताई घरत यांचे निधन
गव्हाण : रामप्रहर वृत्त ह.भ.प. सौ. उषाताई नामदेव घरत यांचे शनिवारी (दि. 18) अल्पशा आजाराने निधन झाले. ह.भ.प. उषाताई या अत्यंत श्रद्धाळू होत्या. त्या गावातील सर्वच धार्मिक उत्सवांमध्ये उत्साहात सहभाग होत असत. गावातील भजनी मंडळांमध्येही त्यांचा सहभाग होता. त्यांचा होमविधी सोमवारी (दि. 20) होणार असून, दशक्रिया विधी सोमवारी (दि. 27) …
Read More »भारत भ्रमण करणारा आफताब रसायनीत
रसायनी : प्रतिनिधी विविध कारणांनी दीर्घ सायकल प्रवास करणारे जगभरात सध्या अंदाजे 1700 सायकलवीर आहेत. यात दिल्लीहून 25 ऑगस्ट 2018 रोजी सायकलवरून भारत भ्रमंतीसाठी निघालेला 23 वर्षीय पदवीधर तरुण आफताब फरीदी 18 मे 2018 रोजी रसायनीतील भटवाडी येथे अक्षर मानव ग्रंथालय अध्यक्ष रोहिदास कवले यांच्या घरी पोहोचला, तेव्हा त्याचे स्वागत …
Read More »बुद्धपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम
रसायनी : प्रतिनिधी बुद्धपौणिमा मानवतेचे ज्ञान पुष्प मानवतेच्या झाडावर फुललेले हे पुष्प जे अपरिमित वर्षानंतर एकदाच उमलते. सम्यक सामाजिक संस्था व सम्यक महिला मंडळ यांच्या वतीने रसायनीत शनिवार (दि. 18) रात्रीपर्यंत भीम महोत्सव रिस-कांबा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सम्यक सामाजिक …
Read More »लोखंडी गेट पडून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू
पनवेल : बातमीदार कळंबोलीतील स्टील मार्केटमधील बल रोडलाइन्स कंपनीत काम करणार्या सुरक्षा रक्षकाच्या अंगावर कंपनीचा मोठा वजनदार लोखंडी गेट पडल्याने या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कंपनीच्या वतीने लोखंडी गेटची डागडुजी न केल्यामुळे, तसेच त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील कुठल्याच प्रकारची उपाययोजना न केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे आढळून आले आहे. …
Read More »मोहोपाडा ग्रामविकास अधिकारी भास्कर पालकर निलंबित
रसायनी : प्रतिनिधी रसायनी व आसपासच्या परिसरातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असणार्या वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी भास्कर पालकर यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये आचारसंहितेचे पालन करण्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी भास्कर पालकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यावर प्रशासकीय अधिकार्यांना त्यांच्या प्रभागात आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश …
Read More »पोलीस ठाण्यासमोरच महिलांची हाणामारी; तीन महिलांविरोधात गुन्हा
पनवेल : वार्ताहर कळंबोली पोलीस ठाण्यासमोरच तीन महिलांमध्ये एकमेकींना शिवीगाळ करण्याबरोबरच हाणामारी करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी कळंबोली पोलिसांनी या महिलांविरोधात सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या तीनही महिला कळंबोली जाधववाडी या परिसरातील आहेत. कळंबोली पोलीस ठाण्यासमोरील रोडवर एकमेकींना शिवीगाळ करण्याबरोबरच मारहाण करण्यास या महिलांनी सुरुवात केली. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper