Breaking News

Ramprahar Team

सिडको क्षेत्रात 20 टक्के पाणी कपात जाहीर

पनवेल : पनवेल महानगरपालिकेत खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल येथील सिडको वसाहतीत सिडकोतर्फे पाणीपुरवठा करण्यात येतो. सद्यस्थितीत भासत असलेला पाण्याचा तुटवडा व वितरण व्यवस्था लक्षात घेता सिडको अधिकार क्षेत्रातील या भागांमध्ये पाणीपुरवठ्यात 18 मे पासून 20 टक्के पाणी कपात जाहीर करण्यात येत आहे. पाणी कपातीच्या काळात सिडको अधिकार क्षेत्रातील रहिवाशांनी …

Read More »

खारघर येथे संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

पनवेल : वार्ताहर खारघर येथे छत्रपती संभाजी महाराज यांची 363वी जयंती शंभुराजे मित्रमंडळाच्या वतीने मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. सकाळी 8 वाजता शंभूराजे मित्र मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी सीबीडी बेलापूरच्या किल्ल्यावरून शिवज्योत प्रज्वलित करून धावत आणली व उत्कर्ष हॉलमध्ये विधिपूर्वक पूजन करून ज्योतीची प्रतिष्ठापना केली. स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन …

Read More »

पनवेलमधील चायनिज गाड्यांवर कारवाईची मागणी

पनवेल : वार्ताहर पनवेल शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररीत्या चायनिज गाड्यांचा व्यवसाय सुरू असून, या गाड्यांवर खाद्य विक्रीपेक्षा मद्यपान करणारेच ग्राहक जास्ती असतात. यातूनच वादावादीचे प्रकार घडत असल्याने अशा प्रकारच्या गाड्यांवर पनवेल महानगरपालिका, तसेच संबंधित पोलीस ठाण्याने कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. पनवेल शहरातील मुख्य रस्त्यावर, तसेच …

Read More »

उन्हाळी सुट्ट्यांमुळे बेकायदा वाहतुकीचे पेव

आरटीओ, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष पनवेल : वार्ताहर शाळांना सुट्या लागल्याने शहरातील नागरिक गावी जाण्यासाठी बस थांब्यांवर गर्दी करीत आहेत. एसटी बसला गर्दी असल्याने बेकायदा वाहतूक करणारे वाहतूकदार या गर्दीचा गैरफायदा घेत आहेत. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक आणि प्रवाशांची जादा आर्थिक लूट देखील होत असून …

Read More »

बेकायदेशीर लॅबोरेटरीजवर कारवाई करा

नवी मुंबई, पनवेल महापालिका आयुक्तांकडे मागणी पनवेल : वार्ताहर नवी मुंबई आणि पनवेल भागातील अनेक पॅथॉलॉजी लॅबचालक महाराष्ट्र वैद्यकिय परिषदेकडे नोंदणीकृत नसणार्‍या व्यक्ती व मान्यताप्राप्त पॅथॉलॉजीस्टची नियुक्ती न करता पॅथॉलॉजी लॅब चालवून दररोज हजारो रुग्णांची आर्थिक लूट करत आहेत. त्यामुळे महापालिकेने अशा पॅथॉलॉजी लॅबचे आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण करून अवैधरीत्या चालणार्‍या …

Read More »

परळीत डंपर पेटला, क्लिनर होरपळला

पाली : सुधागड तालुक्यातील परळीत विज वाहिनीला चिकटल्यामुळे डंपर पेटल्याची घटना शुक्रवारी (दि. 17) घडली. त्यात डंपरचा क्लिनर गंभीररित्या भाजला असून, त्यास तातडीने खोपोलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाली येथून खडी भरलेला डंपर शुक्रवारी सकाळी 10वाजताच्या सुमारास परळी येथील मोनिका कंस्ट्रक्शन येथे  आला होता. खडी खाली करण्यासाठी डंपरचा पाठीमागील …

Read More »

वैशाख पौर्णिमेनिमित्त नेरळमध्ये हनुमान उत्सव

कर्जत : नेरळ गावात अनेक दशकापासून वैशाख पौर्णिमेनिमित्त हनुमान उत्सव आयोजित केला जातो. पूर्वी त्यानिमित्त नेरळ गावात यात्रा भरविली जायची. दरम्यान, शनिवारी (दि. 18) हनुमान उत्सवानिमित्त पालखी सोहळा आयोजित केला होता. नेरळ गावातील कुंभार आळीत मारुती मंदिर आहे, तेथे  वैशाख पौर्णिमेनिमित्त उत्सव आयोजित केला होता. आजचे छत्रपती शिवाजी महाराज मैदान …

Read More »

पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांचा डल्ला; तीन लाखांचा ऐवज लंपास

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पालीतील श्रीराम अपार्टमेंट बल्लाळेश्वर नगर येथील एका घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. व सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल तीन लाख किमतीचा ऐवज लंपास केला. या वेळी अन्य काही घरांचे कडीकोयंडे तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही.   पोलीस …

Read More »

नागोठणे वन खात्याकडून बांधकाम उद्ध्वस्त

जागा आपलीच असल्याचा परस्परांकडून दावा नागोठणे : प्रतिनिधी जागा आपली असल्याचा दावा करीत येथील वन विभागाच्या वतीने गुरुवारी (दि. 16) नारायण सॉ मिल रस्त्यालगत चाललेले वाढीव बांधकाम उद्ध्वस्त करण्यात आले. याबाबत घरमालक हवाबी हसनमिया गोलंदाज या महिलेने जागा आमचीच असल्याने बांधकाम केले असल्याचा दावा केला असून वन खात्याने बांधकाम तोडून …

Read More »

मान्सूनपूर्व नालेसफाई रखडली

महाड शहरात पाणी तुंबण्याचा धोका; रोगराई वाढण्याची शक्यता महाड : प्रतिनिधी महाड शहरातली मान्सूनपूर्व नालेसफाई रखडली असून, पावसाळा सुरु होण्यापूर्वी जर नालेसफाईची कामे पूर्ण झाली नाही, तर शहरात पावसाचे पाणी तुंबून रोगराईचा धोका वाढणार आहे. पावसाळ्यापुर्वी शहरांतील नाले, गटारे व अन्य सफाईची कामे स्थानिक प्रशासन म्हणून नगरपालिकेकडून करण्यात येतात. महाड …

Read More »