रोहे : महादेव सरसंबे रोहा तालुक्यात कोरोना नंतर नवरात्र उत्सवाची धुमधाम चालु आहे.या वर्षी बंधनेमुक्त उत्सव असल्याने रोहा तालुक्यातील भातसई येथील महादेवी मातेच्या मंदिरात नवरात्र उत्सव विविध धार्मिक व आध्यात्मीक कार्यक्रम होत असुन मोठया श्रध्देने या उत्सवात भातसईसह तालुक्यातील भाविक मातेचे दर्शन घेताना दिसत आहेत.नवसला पावणारी महादेवी माता असल्याने भाविकांचे …
Read More »जेएनपीएत बंदरात अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त
उरण : प्रतिनिधी, बातमीदार जेएनपीए बंदरातून दुबईतील जेबेल अली बंदरात निर्यात करण्यात आलेल्या संशयित कंटेनरमधून अडीच कोटींचे तीन मेट्रीक टन रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे. जेएनपीए सीमा शुल्क विभागाने ही कारवाई केली. जेएनपीए बंदरातून दुबईत निर्यात करण्यात येत असलेल्या मालाच्या कंटेनरबाबत सीमा शुल्क विभागाला संशय होता. त्यामुळे या विभागाच्या गुन्हे …
Read More »सेवा पंधरवड्यानिमित्त पनवेलमध्ये नमो प्रदर्शनी
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने …
Read More »गव्हाण, मोर्बे, नेरे येथे प्राथमिक तपासणी शिबिरास प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने 16 ऑक्टोबर रोजी खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. या महाशिबिराच्या …
Read More »नवरात्रोत्सव विशेष : नागोठण्याची श्री जोगेश्वरी माता
नागोठणे : राज वैश्यंपायन नागोठण्याची श्री जोगेश्वरी माता, भैरवनाथ महाराज व व्याघ्रेश्वर या ग्रामदैवतांची घटस्थापना झाल्यानंतर नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. नागोठणे विभागासह रायगड जिल्ह्यातील भाविक, भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या जोगेश्वरी मातेचे दर्शन घेण्यासाठी या मंदिरात भक्तगणांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. नागोठण्याचे ग्रामदैवत जोगेश्वरी मातेचे मंदिर शहराच्या मध्यभागी असून मंदिर परिसरात तीन …
Read More »करंजा मच्छीमार बंदरात सोयीसुविधांची पूर्तता करावी
आमदार महेश बालदी यांची मागणी उरण : रामप्रहर वृत्त उरण येथील करंजा मच्छीमार बंदरात सोयीसुविधांबाबत व इतर प्रश्नांसंदर्भात आमदार महेश बालदी यांनी केलेल्या मागणीनुसार राज्याचे मत्सव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. या बैठकीस आमदार महेश बालदी, मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव पराग जैन आणि मच्छीमार बांधव उपस्थित …
Read More »कर्मवीर अण्णांचा आदर्श घेऊन कार्यरत रहा – लोकनेते रामशेठ ठाकूर
उलवे नोड : रामप्रहर वृत्त प्रत्येक विद्यार्थ्याने कर्मवीर अण्णांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कार्यरत रहावे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी (दि. 28) उलवे नोड येथे केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई व मराठी माध्यामिक विद्यालयात आयोजित ‘रयत’चे …
Read More »ठाकरे सरकारने रोखलेल्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी
वैधानिक विकास मंडळाच्या स्थापनेचे भाजपकडून स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त वसुली आणि वाटाघाटी एवढाच कार्यक्रम राबविणार्या ठाकरे सरकारने गुंडाळलेली वैधानिक विकास मंडळे पुन्हा स्थापन करण्याचा निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकारने विकासाचा मार्ग पुन्हा मोकळा केला आहे, अशा शब्दांत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे. केवळ …
Read More »नवीन पनवेल, खांदा कॉलनीत अपुरा व अनियमित पाणीपुरवठा
भाजपचे 11 ऑक्टोबरला सिडको टाळे बंद आंदोलन पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोनिर्मित नागरी वसाहत असलेल्या नवीन पनवेल व खांदा कॉलनी येथील रहिवासी नागरिकांना होणार्या अपुर्या व अनियमित पाणीपुरवठ्याबद्दल 11 ऑक्टोबरला भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व माजी नगराध्यक्ष सुनील घरत यांच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या नवीन पनवेलमधील कार्यालय येथे टाळे बंद …
Read More »‘पीएफआय’वर बंदी केंद्र सरकारकडून मोठे पाऊल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेवर बंदी घातली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत अध्यादेश जारी केला आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पीएफआय संघटनेविरुद्ध मोठी कारवाई केली. गेल्या आठवड्यात एनआयएने महाराष्ट्रासह देशात 15 ठिकाणी छापेमारी करीत सुमारे 106 पीएफआय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper