Breaking News

Ramprahar Reporters

पनवेलमधील ओवेत नळपाणी योजनेची वचनपूर्ती

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून ओवे गावातील पाण्याची समस्या सुटली असून या नळपाणी योजनेचे उद्घाटन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 26) करण्यात आले. येथील समस्यांसंदर्भात परेश ठाकूर यांनी पाहणी दौरा करून समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचे …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर, शिक्षकवर्गाचे ‘रयत’च्या पदाधिकार्‍यांकडून कौतुक

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने विशेष प्राविण्यासह अव्वल स्थान मिळवत राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 पटकाविला. त्याचबरोबर हा बहुमान मिळवणारे ते रायगड, नवी मुंबईतील एकमेव विद्यालय ठरले आहे. त्या अनुषंगाने रयत …

Read More »

कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांना शनिवारपासून टोलमाफीची सवलत

पासेस, स्टिकर्स पोलीस, परिवहन विभागाकडे उपलब्ध मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी शनिवार (दि. 27)पासून करण्यात येत आहे. मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत 11 सप्टेंबरपर्यंत असणार …

Read More »

मराठा आरक्षण निवडसूचीतील 1064 उमेदवारांना तत्काळ नियुक्ती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत घेण्यात आलेल्या विविध पदांवरील परीक्षेत मराठा आरक्षण घेऊन निवडसूचीत असलेल्या एक हजार 64 उमेदवारांना तत्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि. 26) येथे जाहीर केले. मराठा आरक्षण व अन्य मागण्यांच्या संदर्भात आयोजित बैठकीत ते …

Read More »

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखरुप होणार -ना. रवींद्र चव्हाण

अलिबाग : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखरूप होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील रस्ते दुरुस्ती, खड्डे भरण्याची कामे शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी (दि. २६) दिले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंत्री चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे …

Read More »

जलजीवन मिशन अंतर्गत शिवसणई येथे पाण्याची टाकी

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील शिवसणई येथे केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. या पाण्याच्या टाकीसाठी 30 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून त्याचा भूमिमपूजन सोहळा बुधवारी (दि. 24) आयोजित करण्यात आला होता. या पाण्याच्या टाकीच्या कामाचे भारतीय …

Read More »

मालमत्ता कराबाबत खारघर फोरम व मंगेश आढाव यांची याचिका हायकोर्टाने केली रद्द

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या मालमत्ता करा बाबत मुंबई उच्च न्यायालयात मंगेश आढाव व खारघर फोरमने केलेली याचिका उच्च न्यायालयाने रिट याचिका दाखल करण्यासाठी कोणतेही कारण नाही, असे नमूद करून रद्द केली आहे. त्याचप्रमाणे खारघर फोरमला याचिका 29 ऑगस्टपर्यंत मागे घेण्यास मुदत दिली आहे. उच्च न्यायालयात खारघर फोरम आणि मंगेश …

Read More »

विधिमंडळात नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटीलांच्या नावाचा ठराव मंजूर!

भूमिपुत्रांचा सन्मान केल्याची सर्वपक्षीय कृती समितीची भावना मुंबई : प्रतिनिधी औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्या नामांतराचा ठराव मंजूर झाला आहे. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धारशिव तर नवी मुंबई विमानतळाचे नाव दि. बा. पाटील या नावांना गुरुवारी (दि. 25) विधासभेत मंजुरी मिळाली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Read More »

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी आता 29 ऑगस्टला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील सत्तासंघर्षाच्या वादावरील सुप्रीम कोर्टातील पुढील सुनावणी 29 ऑगस्टला होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी या प्रकरणावर निकाल देताना हे प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठाकडे सोपवले होते. त्यानुसार गुरुवारी (दि. 25) सुनावणी होणे अपेक्षित होते, पण ही सुनावणी पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 29 …

Read More »

पनवेल भाजप सांस्कृतिक सेलतर्फे सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल भाजप सांस्कृतिक सेलतर्फे भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2022चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी मर्यादित असून या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणार्‍या मंडळास …

Read More »