Breaking News

Ramprahar Reporters

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरण घटनापीठाकडे ; 25 ऑगस्ट सुनावणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरण पाच सदस्यांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आली असून यावर 25 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे या मुद्द्यावरील मंगळवारची (दि. 23) नियोजित सुनावणीदेखील दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. …

Read More »

मोदी सरकारच्या माध्यमातून देशातील गोरगरीबांचे कल्याण – केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल

महाड, प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळ गोरगरीबांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवित आहेत. देशातील नागरिकांना अन्न-पाणी पुरविण्याची जबाबदारी राज्य सरकारांची असतानाही आज पंतप्रधान मोदी केंद्राच्या माध्यमातून मोठा वाटा उचलत आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय अन्न प्रक्रिया आणि जलशक्तीमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी सोमवारी (दि. 22) केले. रायगड लोकसभा …

Read More »

ओबीसी आरक्षणासंदर्भात विशेष खंडपीठ स्थापन होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष खंडपीठ स्थापन केले जाणार आहे. तोपर्यंत म्हणजेच पुढील पाच आठवड्यांसाठी परिस्थिती जैसे थे ठेवावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. 20 जुलै रोजी न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला मान्यता दिली होती. त्याचवेळी न्यायालयाने हे आरक्षण ज्या 367 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांची आधीच घोषणा …

Read More »

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर चौथी मार्गिका विचाराधीन

मुंबई : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या चौथ्या मार्गिकेचा विस्तार करण्याबाबत राज्य शासन विचार करेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 22) विधानसभेत सांगितले. महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये उपस्थित केल्या गेलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक खूप वाढली …

Read More »

पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे प्रकल्पातील अडथळा दूर

वनजमीन हस्तांतरित करण्यास केंद्राची मंजुरी मुंबई : प्रतिनिधी पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय दुहेरी मार्ग प्रकल्पासाठी आवश्यक असलेली वनजमीन मुंबई रेल्वे विकास महामंडळाला (एमआरव्हीसी) हस्तांतरित करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला असून प्रकल्पाआड येणारे वृक्ष हटवून लवकरच रेल्वेमार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. सध्या …

Read More »

कर्नाळा बँकेच्या घोटाळ्यातील दोषींवर लवकरात लवकर कारवाई करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पनवेल : प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्यासंदर्भात मी स्वतः लक्ष घालत आहे आणि त्या अनुषंगाने या बँकेच्या घोटाळ्यातील दोषींवर लवकरात लवकर कारवाई होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. २२) विधिमंडळात दिली.         रायगड जिल्हयातील कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील तसेच …

Read More »

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

मुंबई : प्रतिनिधी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 5 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. राऊत हे पत्राचाळ घोटाळाप्रकरणी सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत. पत्राचाळ परिसरातील बैठ्या घरांमध्ये राहात असलेल्या 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. ही घरे भाडेतत्त्वावर असल्यामुळे त्यासाठी म्हाडाची परवानगी आवश्यक …

Read More »

ताम्हिणी घाटात कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू

माणगाव : माणगाव -पुणे रस्त्यावरील ताम्हिणी घाटात कारला भिषण अपघात होऊन कार 200 फूट खाली दरीत कोसळली. या अपघातात कारमधील तीन जण जागीच ठार झाले असून तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी (दि. 20) सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडला. अकोला जिल्ह्यातील वाशीम येथून आलेल्या स्विफ्ट कारमध्ये एकूण सहा प्रवासी …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रस्ता विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : प्रतिनिधी गव्हाण फाटा ते गव्हाणच्या दिशेने जाणारा रस्ता सिडकोने विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांच्या पुर्नविकासाकरीता उलवे नोड पॅकेज तीन विकसित करताना उद्ध्वस्त केला होता. हा रस्ता गव्हाण, शेलघर, न्हावा, न्हावाखाडी, कोपर, शिवाजीनगर या गावातील नागरीकांचा रहदारीचा तो बंद झाल्याने त्याचा त्रास नागरिकांना होत होता. यासंदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …

Read More »

झिम्बाब्वेविरुद्ध वनडे मालिकेत भारताची विजयी आघाडी

हरारे : वृत्तसंस्था भारताने झिम्बाब्वेचे 162 धावांचा आव्हान पाच फलंदाजांच्या मोबदल्यात पार करीत दुसरा वनडे सामना पाच विकेट्सनी जिंकला. झिम्बाब्वेने भारताची अवस्था चार बाद 97 धावा अशी करून चांगली झुंज दिली होती, मात्र संजू सॅमसन आणि दीपक हुड्डा (25) यांनी पाचव्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी रचून भारताला विजयाच्या समिप पोहचवले. …

Read More »