Breaking News

Ramprahar Reporters

कामोठ्यात मोफत आधार कार्ड शिबिर

आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट पनवेल : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कामोठे येथील रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित या शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 8) झाले, तर या शिबिराला भाजपचे उत्तर …

Read More »

दर्जेदार शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या संधी -लोकनेते रामशेठ ठाकूर

‘आरटीपीएस’मध्ये स्थापना दिन उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या (आरटीपीएस) माध्यमातून मिळत असलेल्या दर्जेदार शिक्षणामुळे येथील विद्यार्थ्यांना अनेक चांगल्या संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे येणार्‍या काळातही स्कूल प्रगतीच्या दिशेने काम करीत राहिल, असा विश्वास जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार

मुंबई : प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी (दि. 9) होणार आहे. सकाळी 11 वाजता राजभवनमध्ये शपथविधी सोहळा होईल. याबाबत जनसंपर्क कार्यालयाने पत्रक जारी केले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भाजपश्रेष्ठींशी चर्चा केली आहे. त्यानुसार काही मंत्री पहिल्या टप्प्यात शपथ घेतील. यात भाजपमधून चंद्रकांत …

Read More »

पनवेलमधील फुटबॉल स्पर्धेत कालिना रेंजर विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल फुटबॉल क्लब आणि रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल तालुका व नवी मुंबईस्तरीय टर्फकोर्ट फुटबॉल स्पर्धा रविवारी (दि. 7) झाली. स्पर्धेत कालिना रेंजर हा अंतिम विजेते व बीवायबीएफसी हा संघ उपविजेता ठरला. रामशेठ …

Read More »

राष्ट्रकुल स्पर्धा : भारताच्या पी. व्ही. सिंधूने जिंकले सुवर्णपदक

बर्मिंगहॅम : वृत्तसंस्था ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. तिने कॅनडाच्या मिशेल ली हिला पराभूतकेले. सिंधूच्या या विजयाने भारताच्या सुवर्णपदकांची संख्या 19 झाली आहे. सिंधूला 2014 व 2018मध्ये महिला एकेरीच्या सुवर्णपदकाने सिंधूला हुलकावणी दिली होती, पण 2022मध्ये तिने अखेर पहिले सुवर्णपदक …

Read More »

पत्रा चाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई : प्रतिनिधी पत्रा चाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने (सक्तवसुली संचालनालय) राऊत यांना अटक केली आहे. दरम्यान, आता राऊत यांचा मुक्काम मुंबईतील आर्थर रोड कारागृहात असणार आहे. अटकेनंतर संजय राऊत मागील काही दिवसांपासून ईडी कोठडीत होते. त्यांना सोमवारी …

Read More »

पनवेल ते जांभिवली बससेवा पूर्ववत करा – आमदार महेश बालदी

पनवेल : प्रतिनिधी पनवेल बस आगारातून एसटी महामंडळाच्या पनवेल ते कोनमार्गे सावळे-आपटा-जांभिवली सर्व बससेवा पूर्ववत करण्यात याव्यात, अशी मागणी आमदार महेश बालदी यांनी पनवेल आगार व्यवस्थापकांकडे केली आहे. या संदर्भात आमदार महेश बालदी यांनी व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, माझ्या विधानसभा मतदारसंघातील सावळे, गुळसुंदे, आपटा, जांभिवली या ग्रामपंचायती ग्रामीण …

Read More »

रामशेठ ठाकूर स्कूलचे जिल्हास्तरीय स्पर्धेत यश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल सिबीएसईच्या विद्यार्थ्यांनी विविध जिल्हास्तरीय स्पर्धेत घवघवतील यश मिळवले आहे. या यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे रयतचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन करीत पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. कामोठे …

Read More »

गायिका मुग्धा गावकर यांच्या गायनाने पनवेलकर मंत्रमुग्ध

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, नादब्रम्ह साधना मंडळ खारघर आणि पनवेल तालुका सांस्कृतिक सेल यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित करण्यात …

Read More »

पनवेलमध्ये हर घर तिरंगा अभियान

पनवेल : पनवेलमध्ये हर घर तिरंगा अभियानाला भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी तिरंगा फडकवत भारत माता की जय या घोषणेने सुरुवात केली. या वेळी भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, माजी महापौर  डॉ. कविता चौतमोल, माजी नगरसेविका चारूशिला …

Read More »