पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 1) 25 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 407 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 531 रुग्ण बरे झाले आहेत. मयत रुग्णांमध्ये पनवेल (मनपा सहा व ग्रामीण सहा) तालुक्यातील 12, खालापूर पाच, उरण दोन, कर्जत, पेण, अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, पोलादपूर येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. …
Read More »धरमतर खाडीचा संयुक्त पाहणी दौरा
पेण ः प्रतिनिधीधरमतर खाडीतील मच्छीमारांवरील अन्याय, नुकसानभरपाई व पुनर्वसन अशा अनेक मागण्यांसंदर्भात पेण व अलिबाग तालुक्यातील धरमतर खाडीच्या किनारपट्टीवर असलेल्या 47 गावांतील रहिवाशांच्या मागणीमुळे 21 फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार डॉ. विवेक वर्तक, शास्त्रज्ञ खारजमीन संशोधन केंद्र, पनवेल यांच्या अध्यक्षतेखाली धरमतर खाडी व कोकणातील इतर खाड्ड्यांत मत्स्यव्यवसाय व प्रदूषणविषयक अभ्यासासाठी समिती गठीत …
Read More »खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण
मुंबई ः भाजप खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राणे यांनी स्वत: ट्वीट करून या संदर्भात माहिती दिली. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस आयसोलेट राहीन. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईन, असे त्यांनी म्हटले आहे.
Read More »कारमध्ये गुदमरून चिमुकल्यांचा मृत्यू
महाड ः प्रतिनिधीमहाडमधील एका भंगाराच्या गोदामामधील बंद कारमध्ये अडकून दोन बालकांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी 7 वाजता खेळायला गेलेली मुले आली नसल्याने भयभीत झालेल्या पालकांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी शोध सुरू केला असता घराजवळील भंगार गोदामात उभ्या असलेल्या कारमध्ये ही दोन मुले अत्यवस्थ स्थितीत आढळली. सोहेल जकात …
Read More »राज्य सरकारविरोधात पार्थ पवारांचे बंड
सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा मुंबई ः प्रतिनिधीसुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यामुळे ठाकरे सरकारवर चोहोबाजूने टीकेची झोड उठली आहे, तर दुसरीकडे ठाकरे सरकारकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात बंड पुकारत मराठा आरक्षणावरून …
Read More »मराठा समाज घालणार ‘मातोश्री’ला घेराव
10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक मुंबई ः प्रतिनिधीमराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा आरक्षण संघर्ष समितीने येत्या 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. 6 ऑक्टोबरला ’मातोश्री’बाहेर आंदोलन, तर 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा मराठा संघर्ष समितीने दिला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात संघर्ष समितीने पत्रकार …
Read More »रायगड जिल्ह्यात एकाच दिवशी 21 रुग्णांचा मृत्यू; 519 नवे पॉझिटिव्ह
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 21 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 519 नव्या रुग्णांची नोंद बुधवारी (दि. 30) झाली, तर दिवसभरात 584 रुग्ण बरे झाले आहेत. मयत रुग्णांमध्ये पनवेल (मनपा आठ व ग्रामीण एक) तालुक्यातील नऊ, कर्जत चार, रोहा व महाड प्रत्येकी तीन आणि अलिबाग तालुक्यातील दोघांचा समावेश आहे; तर पॉझिटिव्ह …
Read More »विकास हीच भाजपची परिभाषा : आमदार प्रशांत ठाकूर
पेणमधील शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये पेण : प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा देशाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून ते कोणीही कोणत्या जाती-धर्माचा असो वा कोणत्या प्रातांचा असो विकास हीच परिभाषा समोर ठेवून काम करीत आहेत. पक्षाची वाटचालही त्या दृष्टीनेच सुरू आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी …
Read More »सायन-पनवेल महामार्गावर विचित्र अपघात
30 वाहने एकमेकांवर आदळली मुंबई : प्रतिनिधीसायन-पनवेल महामार्गावर कळंबोली उड्डाणपुलावर बुधवारी (दि. 30) सकाळी विचित्र अपघात झाला. या वेळी 30 वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यात कुणीही जखमी अथवा जीवितहानी झाली नाही.सायन-पनवेल महामार्गावर बुधवारी सकाळी 10.15च्या सुमारास दोन विचित्र अपघात झाले. पहिल्या अपघातात एका …
Read More »अलिबागेत जिवंत माशांचे विक्री केंद्र
पारंपरिक व्यवसायाला तरुणाकडून आधुनिकतेची जोड अलिबाग ः प्रतिनिधीकोरोनाची साथ आणि टाळेबंदीमुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या, मात्र त्यातूनही संधी शोधून काही तरुणांनी नवी उभारी घेतली. अलिबाग तालुक्यातील पीयूष म्हात्रे याने तर मोठ्या पगाराची नोकरी सोडून पारंपरिक मासेविक्री व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत जिवंत ताजे मासेविक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.पीयूष म्हात्रेने मुंबईच्या व्हीजेटीआय कॉलेजमधून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper