Breaking News

Ramprahar Reporters

खोपोली शीळफाटा येथे विचित्र अपघात; एक जण ठार, चौघे जखमी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधीमुंबई-पुणे महामार्गावर शीळफाटा येथे शनिवारी (दि. 16) दुपारी तेल टँकरच्या झालेल्या विचित्र अपघातात चालकाचा जागीच मृत्यू, तर चार जण जखमी झाले. टँकरने पुढे जाणार्‍या ट्रकला ठोकर मारली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभा असलेला अन्य एक ट्रक, पिकअप, कार व दोन दुचाकींचे नुकसान करून हा टँकर उलटला.करसनजीत ठाकूर (वय …

Read More »

कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची एमजीएम रुग्णालयाला भेट; कोरोनाग्रस्तांशी संवाद

पनवेल : रामप्रहर वृत्तराजकारणापेक्षा सामाजिक कार्याला महत्त्व देऊन समाजाची सेवा करणारे भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी कामोठे एमजीएम रुग्णालयाला भेट देऊन तेथील रुग्णांची संवाद साधून व्यवस्थेची पाहाणी केली. कोरोना विषाणू प्रादुर्भाव पाहता सर्वत्र भीतीचे वातावरण …

Read More »

पनवेल तालुक्यात 27 नवे कोरोनाबाधित

पनवेल : प्रतिनिधीपनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 15) महापालिका क्षेत्रात 15 आणि ग्रामीणमध्ये 12 असे मिळून 27 नवे रुग्ण आढळले. आता महापालिका क्षेत्रात 234 रुग्ण झाले असून, तालुक्यात 324 रुग्ण आहेत, तर जिल्ह्यातील एकूण आकडा 459 झाला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे येथे आठ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी संकल्प सोसायटीत एकाच …

Read More »

आषाढी वारीबाबत 30 मेनंतर अंतिम निर्णय

पुणे : कोरोनाची स्थिती पाहून 30 मेच्या नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, अधिकारीवर्ग आणि वारकरी प्रतिनिधी यांच्यात शुक्रवारी (दि. 15) पुणे येथील बैठकीत चर्चा झाली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाची नियमावली, लॉकडाऊन स्थिती, …

Read More »

मुरूडच्या मच्छीमार नौका पावसाळ्याआधीच किनारी

मुरूड : प्रतिनिधीसर्वसाधारणपणे 1 जूनपासून मासेमारी बंद होते, मात्र यंदा कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे मुरूडमधील मच्छीमारांनी नौका महिनाभर आधीच किनारी आणून शाकारण्यास सुरुवात केली आहे.चालू वर्षी नैसर्गिक संकटांच्या मालिकांमुळे मासेमारी न झाल्याने आधीच मच्छीमार बांधवांना खूप नुकसान सहन करावे लागले आहे. अनेक मच्छीमार कर्जबाजारी झाले आहेत. अशातच कोरोना व त्यामुळे …

Read More »

केंद्राकडून बळीराजाला दिलासा

कृषी क्षेत्रासाठी एक लाख कोटींचे पॅकेज नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाभिमानी भारताच्या मोहिमेची घोषणा करून त्यासाठी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. यातील दोन टप्प्यांची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली, तर शुक्रवारी (दि. 15) शेती, अन्न प्रक्रिया उद्योग, पशूपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसायाबाबत पॅकेज …

Read More »

मुरूडमधील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

मुरूड : प्रतिनिधीमुरूड तालुक्यातील मीठेखार येथे राहणार्‍या 28 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मुरूड तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. या महिलेस अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातून हलवून मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र 11 मे रोजी या महिलेचा मृत्यू झाला. तिचा शवविच्छेदन अहवाल 13 …

Read More »

वडखळमध्ये 450 ग्रामस्थ होम क्वारंटाइन

पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील वडखळ येथील नऊ वर्षीय मुलगा कोरोनाबाधित आढळल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या व त्या परिसरातील 75 घरांमधील 450 ग्रामस्थांना 28 दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. या लोकांना शासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत कुठेही जाण्यास अटी व शर्तीनुसार प्रतिबंधित करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगड जिल्हाधिकार्‍यांनी हे …

Read More »

पनवेल प्रभाग 19मध्ये ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेल प्रभाग क्रमांक 19तर्फे ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा एकूण आठ गटांत असून, प्रभाग 19साठी मर्यादित आहे. गट 1मध्ये सात वर्षांखालील मुले (भाषा मराठी), गट 2मध्ये सात वर्षांखालील मुली (भाषा मराठी), गट 3मध्ये 8 ते 12 वर्षांखालील मुले (भाषा मराठी), …

Read More »

पनवेल तालुक्यात कोरोनाचे 300 रुग्ण

रायगड जिल्ह्याचा एकूण आकडा चारशेपार पनवेल ः प्रतिनिधी पनवेल ग्रामीणमध्ये सात नवीन कोरोना रुग्ण आढळले असून त्यामध्ये विचुंबे येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे, तर एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात 20 नवीन रुग्ण आढळले असून, आठ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गुरुवारी (दि. …

Read More »