Breaking News

Ramprahar Reporters

आमदार रविशेठ पाटील यांचा गोरगरिबांना मदतीचा हात

पेण : प्रतिनिधीकोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने रोजंदारी काम करून पैसे कमाविणार्‍यांपुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून अनेक कुटुंबांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. अशा गोरगरीब कुटुंबांना मदतीचा हात म्हणून आमदार रविशेठ पाटील यांनी शुक्रवारी (दि. 10) जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. पेणमधील रामवाडी येथील अनेक कुटुंबांना अन्नधान्य व वस्तूंचे वाटप करण्यात आले. …

Read More »

महाडपाठोपाठ रोह्यातही 100 टक्के लॉकडाऊन

रोहे : प्रतिनिधी देशभर अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, अशा प्रशासनाच्या सूचना आहेत, मात्र रोह्यात अत्यावश्यक सेवेच्या नावाने गर्दी होऊ लागल्याने येथे 10 ते 13 एप्रिलदरम्यान पूर्णत: लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यास शुक्रवारी (दि. 10) पहिल्याच दिवशी नागरिकांनी …

Read More »

पंतप्रधान मोदी आज मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची शनिवारी (दि. 11) व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊनबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी लॉकडाऊनच्या नियमात काही महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

पनवेल भाजपचे एक पाऊल पुढे!

आतापर्यंत 10 हजारहून अधिक गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची परिस्थिती पाहता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पनवेल भाजपतर्फे गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे मदतकार्य सुरू केलेले आहे. पनवेलमध्ये …

Read More »

हनुमान जयंती व्हर्च्युअल पद्धतीने साजरी

कराडे खुर्द ग्रामस्थांकडून अनोखा जन्मोत्सव पनवेल : बातमीदारसध्या सर्वत्र कोरोना विषाणूने धूमाकूळ घातला असल्याने लोक भयभीत झालेले आहेत. त्यामुळे हनुमान जयंतीचा सोहळादेखील सगळीकडे रद्द करण्यात आला होता, परंतु पनवेल तालुक्यातील कराडे खुर्द या गावी भाविकांनी झुम अ‍ॅपवरून एकत्र येत जन्मोत्सव साजरा केला. याबाबत आशिष वैद्य यांनी सांगितले की, आमच्या कराडे …

Read More »

मॉर्निंग वॉकला गेलेल्या 46 जणांवर खारघरमध्ये पोलिसांची कारवाई

विनाकारण फिरणार्‍यांवरही गुन्हे दाखल पनवेल : वार्ताहरकोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आदेश लागू असूनही मॉर्निंग वॉकला जाणार्‍या 46 जणांवर खारघर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे विनाकारण बाहेर फिरणार्‍यांची वाहने जप्त करून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असले तरी काही नागरिक रस्त्यावर येत …

Read More »

पनवेल मनपातील भाजप नगरसेवकांचा कोरोनाविरोधात लढा

दोन महिन्यांचे मानधन महापौर सहाय्यता निधीत पनवेल : प्रतिनिधीकोरोनाशी दोन हात करण्यासाठी पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी आपले दोन महिन्यांचे मानधन महापौर सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला असून तसे पत्र सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या उपस्थितीत आयुक्त गणेश देशमुख यांना दिले आहे.कोरोना विषाणूचा …

Read More »

चिंताजनक! मुंबईत 24 तासांमध्ये नऊ जण दगावले

मुंबई : राजधानी मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली असून, गुरुवारी (दि. 9) एकाच दिवशी मुंबईत कोरोनाचे 79 नवीन रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासांत शहरात कोरोनामुळे नऊ जण दगावले आहेत, तर विविध रुग्णालयांत दाखल असलेले सहा कोरोनाबाधीत पूर्णपणे बरे झाले आहेत. राज्यातील रुग्णांचा एकूण आकडा 1346 झाला आहे. यातील …

Read More »

कर्जतमधील देवस्थानची आपत्ती निवारण निधीला मदत

कर्जत : प्रतिनिधीकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन कार्यरत असून उद्योजक, कंपन्या, स्वयंसेवी संस्थाही या युद्धात सहभागी होऊन मदत करीत आहेत. अशाच प्रकारे कर्जत तालुक्यातील वेणगाव येथील श्री गजानन, श्री महालक्ष्मी आणि श्री हनुमान देवस्थानच्या वतीने जिल्हा आपत्ती निवारण निधीला मदतीचा धनादेश देण्यात आला आहे.वेणगाव येथील देवस्थानच्या वतीने 25 हजार …

Read More »

कोरोनासंदर्भात पंतप्रधान मोदींची सर्वपक्षीयांशी चर्चा

लॉकडाऊन पूर्णपणे उठणार नसल्याची स्पष्टोक्ती नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशात फैलावत असलेले कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 8) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वपक्षीय बैठकीत चर्चा केली. या वेळी पंतप्रधानांनी 14 एप्रिलनंतर पूर्णपणे लॉकडाऊन हटवला जाणार नाही, असे स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान मोदींनी या बैठकीत सरकारद्वारे कोरोना …

Read More »