Breaking News

Ramprahar Reporters

रविवारी रात्री 9 वाजता घरात दिवे उजळून सामुदायिक शक्ती दाखवा!

पंतप्रधान मोदींचे देशवासीयांना आवाहन नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना या जागतिक साथीच्या आजाराशी लढा देण्यासाठी आपली सामूहिक शक्ती दाखवणे गरजेचे आहे. त्यासाठी मला आपल्या सर्वांची नऊ मिनिटे हवी आहेत, असे सांगत येत्या रविवारी म्हणजेच 5 एप्रिलला रात्री 9 वाजता केवळ नऊ मिनिटांसाठी आपल्या घरातील सर्व दिवे बंद करा आणि आपल्या गॅलरीत …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्यामार्फत आदिवासी बांधवांना मदतीचा हात

उरण : उरणचे आमदार महेश बालदी यांनी सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या विधानसभा क्षेत्रात असलेल्या आदिवासी वाड्यांतील सहा हजार नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे आदिवासी बांधवांना तसेच इतर गरीब, गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंची निकड भासत आहे. ती लक्षात घेता आमदार महेश बालदी यांनी उरण, खालापूर व पनवेलमध्ये …

Read More »

रामनवमीतही ‘सोशल डिस्टन्सिंग’

पोलादपूरमध्ये नियम पाळून जन्मोत्सव साजरा पोलादपूर : प्रतिनिधीतालुक्यातील कशेडी घाटात असलेल्या धामणदिवी गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर (सोशल डिस्टन्सिंग) ठेवून रामनवमी साजरी करण्यात आली. या वेळी श्रीराम मंदिरात भाविकांना पाच फुटांच्या अंतरावर बसण्यासाठी चौकटी आखून देण्यात आल्याने यंदाचा जन्मोत्सव आगळावेगळा झाला.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यातील अनेक गावांत श्रीराम जन्मोत्सवाचे कार्यक्रम …

Read More »

पनवेलमध्ये आणखी एक कोरोना रुग्ण; एकूण संख्या नऊवर

पनवेल : तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता नऊ झाली आहे. खारघरमध्ये आढळलेल्या रुग्णाची पत्नीही कोरोनाबाधित असल्याचे महापालिका प्रशासनाकडून गुरुवारी (दि. 2) सांगण्यात आले. ती मुंबईत एका खासगी रुग्णालयात डॉक्टर आहे. तिच्या संपर्कात आल्याने पतीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोघांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही महिला डॉक्टर …

Read More »

पनवेल भाजपची सामाजिक बांधिलकी

पंचशील नगरमधील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना व्हायरस आणि त्यामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन लक्षात घेऊन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व महापालिका सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल भारतीय जनता पक्षातर्फे महापालिका हद्दीतील गरीब, गरजूंना …

Read More »

कोरोनाविरुद्ध एकजुटीने लढू या!

पंतप्रधान मोदींचे राज्य सरकारांना आवाहन नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशभरात कोरोना विषाणूचा उद्रेक झालेला असताना या संकटाविरुद्ध सर्वांनी एकत्र होऊन लढू या. केंद्र सरकार राज्य सरकारांच्या सोबत असून आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 2)येथे दिली. पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्य …

Read More »

कोरोनाचा धोका वाढला!

कळंबोलीत आणखी चार जवानांना लागण; पनवेल तालुक्यातील एकूण संख्या आठवर पनवेल : रामप्रहर वृत्तकळंबोली येथे वास्तव्यास असलेल्या सीआयएसएफच्या एकूण पाच जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर झाले आहे. त्यामुळे कळंबोली हादरली आहे. आता पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आठवर पोहोचली आहे. कोरोनाची लागण झालेले पाचही जवान मुंबई विमानतळावर सुरक्षेचे …

Read More »

दिल्लीतील ‘त्या’ कार्यक्रमात रायगडातील 14 जणांचा सहभाग

अलिबाग : दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिकी-ए-जमातीच्या धार्मिक कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील 14 जणांनी सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. या संमेलनात भाग घेतलेल्यांपैकी देशभरातील 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे रायगडकरांची डोकेदुखी वाढली आहे. या 14पैकी एक जण जिल्ह्यात परतलेला नाही आणि एकाचा शोध घेण्यात येत आहे, तर उरलेल्या 12 …

Read More »

अलिबागमध्ये ऑनलाईन योगवर्ग

अलिबाग : प्रतिनिधीलॉकडाऊन आणि संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर अलिबाग येथील सुंदर वेलनेस सेंटरतर्फे त्यांच्या साधकांसाठी ऑनलाईन वर्ग घेण्यात येत आहे. या प्रयोगाचे योगप्रेमींकडून उत्स्फूर्त स्वागत होत आहे.गतवर्षीच्या मार्च महिन्यात योगप्रशिक्षिका सायली वेंगुर्लेकर यांनी अलिबागमध्ये वेलनेस योग सेंटरची स्थापना केली. या योग सेंटरमध्ये अलिबाग परिसरातील जवळजवळ 80 साधक नित्यनेमाने दिवसभरातील वेगवेगळ्या वेळेत योगसाधना …

Read More »

अझिम प्रेमजींकडून 1125 कोटींचा निधी

मुंबई : प्रतिनिधीकोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशातीले उद्योगपती पुढे येत आहेत. टाटा, अंबानी यांच्यानंतर आता विप्रो कंपनीचे अझिम प्रेमजी यांच्याकडून कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी 1125 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. विप्रो लिमिटेडने 100 कोटी, विप्रो इंटरप्रायझेसने 25 कोटी, तर अझिम प्रेमजी फाऊंडेशनने 1000 कोटी रुपयांची मदत जाहीर केली …

Read More »