सहकार आयुक्तांचे बँकेला आदेश आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांच्या तारांकित प्रश्नाला सहकार मंत्र्यांचे उत्तर पनवेल ः रामप्रहर वृत्त कर्नाळा नागरी सहकारी बँकेत बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील व व्यवस्थापनाने कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला असून या बँकेतील ठेवीदारांना त्यांच्या ठेवी तत्काळ परत करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी कर्नाळा बँकेला दिले आहेत, अशी …
Read More »पनवेल बसपोर्टची प्रतीक्षा लवकरच संपणार
कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर बसपोर्ट बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, परंतु ठेकेदार नेमून अनेक वर्षे उलटली तरी पनवेल बसपोर्टचा प्रकल्प तांत्रिक अडचणीत अडकल्याचे समोर आले आहे. या सर्व तांत्रिक अडचणी …
Read More »सावरकरांवरून भाजप आक्रमक
गौरव प्रस्ताव नाकारल्याने राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी मुंबई : प्रतिनिधीराज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी (दि. 26) विधिमंडळात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून खडाजंगी झाली. सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्य सरकारने त्यांच्या गौरवाचा प्रस्ताव मांडावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती, मात्र विधानसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव नाकारला. त्यामुळे भाजपकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात …
Read More »मीरा-भाईंदरच्या महापौरपदी भाजपच्या जोत्स्ना हसनाळे
भाईंदर : मीरा-भाईंदरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला मात दिली आहे. भाजपच्या ज्योत्स्ना हसनाळे यांनी शिवसेनेचे अनंत शिर्के यांचा पराभव केला. उपमहापौरपदी भाजपचेच हसमुख गेहलोत यांनी विजय मिळवला. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशीच ही लढाई झाली. 95 सदस्यीय पालिकेत 61 नगरसेवकांसह भाजपकडे स्पष्ट बहुमत असून, शिवसेनेचे 22, तर काँग्रेसचे 12 नगरसेवक …
Read More »थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या जयंतीनिमित्त उद्या रक्तदान शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्तथोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या 92व्या जयंतीचे औचित्य साधून स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर महाविद्यालय (सीकेटी) राष्ट्रीय सेवा योजना विभाग, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि एमजीएम हॉस्पिटल रक्तपेढी कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 28) सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे …
Read More »वाळवटी संघ जय श्रीराम कबड्डी चषकाचा मानकरी
मुरूड : प्रतिनिधीयेथील जय श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तालुक्यातील 32 निमंत्रित संघांतंर्गत भव्य कबड्डी स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. या स्पर्धेत वाळवटीचा शिवलिंग संघाने जय श्रीराम चषक पटकाविला.स्पर्धेचे उद्घाटन मुरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रंगराव पवार यांच्या हस्ते झाले. उद्घाटन समारंभास नगराध्यक्षा स्नेहा पाटील, संस्थेचे चेअरमन अॅड. मोहन …
Read More »शिवकर संघाने आमदार चषक जिंकला
पनवेल : रामप्रहर वृत्ततालुक्यातील भिंगारवाडी येेथे माजी सरपंच व पळस्पे विभागीय भाजप युवा मोर्चा अध्यक्ष योगेश लहाने यांनी जय हनुमान क्रिकेट संघाच्या माध्यमातून विद्युत प्रकाशझोतातील टेनिस बॉल रजनी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत शिवकर येथील तिरंगा संघाने विजेतेपद पटकावून आमदार चषक जिंकला. स्पर्धेचे उद्घाटन भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ …
Read More »पिंपरीत पाच बहिणींवर भोंदूकडून अत्याचार
पिंपरी : प्रतिनिधीपुत्रप्राप्ती आणि घरात असलेले गुप्तधन काढून देण्याच्या बहाण्याने एका भोंदूने एकाच कुटुंबातील पाच बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरीमध्ये हा संतापजनक प्रकार घडला असून, पोलिसांनी या नराधम भोंदूच्या मुसक्या आवळल्या आहेत.सोमनाथ कैलास चव्हाण (वय 32, रा. खैरेवाडी, ता. रोहा, जि. रायगड) असे अटक केलेल्या …
Read More »पनवेल मनपा कर्मचार्यांना मारहाण करणार्यांवर कारवाईची मागणी
पनवेल : प्रतिनिधीशहरातील उरण नाक्यावरील मच्छी मार्केटमध्ये महापालिकेच्या कर्मचार्यांना मारहाण करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 24) पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांची भेट घेऊन केली.पनवेल महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागातील कर्मचार्यांनी (दि. 23) शहरातील उरण नाक्यावर असलेल्या मच्छी …
Read More »राज्य सरकारविरोधात भाजपचा हल्लाबोल
निष्क्रिय सरकारला जागे करण्यासाठी धरणे आंदोलन पनवेलमध्येही जाहीर निषेध पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी व सर्वसामान्य जनतेला दिलेली आश्वासने सत्तेवर आल्यानंतर पूर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारविरोधात मंगळवारी (दि. 25) पनवेल भाजपच्या वतीने उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकर्यांचा सातबारा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper