Breaking News

Ramprahar Reporters

न्यूझीलंडकडून भारताचा धुव्वा

पहिल्या कसोटी सामन्यात दणदणीत विजय वेलिंग्टन : वृत्तसंस्थाकसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाला अखेरीस आपल्या पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन कसोटी सामन्यात यजमान संघाने भारतावर 10 गडी राखून मात केली. तळातल्या फलंदाजांनी डावाच्या पराभवाची नामुष्की टाळली. दुसर्‍या डावात भारतीय संघाने न्यूझीलंडला केवळ 9 धावांचे आव्हान दिलं. लॅथम आणि …

Read More »

कर्जतमधील गावठी कट्टे बनविण्याचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त

दुकल अटकेत; बंदुका, काडतुसे व अन्य साहित्य जप्त कर्जत : बातमीदारतालुक्यातील खरवंडी आदिवासी पाड्यात सुरू असलेला गावठी कट्टे बनविण्याचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. कारखान्यातून गावठी कट्टे, जिवंत काडतुसे आदी साहित्य नवी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने हस्तगत केले असून, दोन जणांना अटक केली आहे.नवी मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रवीणकुमार …

Read More »

हार्बरमार्गे पनवेल-गोरेगाव लोकल एप्रिलपासून धावणार!

प्रवासी संघाचा यशस्वी पाठपुरावा पनवेल : रामप्रहर वृत्तहार्बर मार्गावरून पनवेलहून अंधेरीपर्यंत असणारा लोकल प्रवास आता गोरेगावपर्यंत करता येणार आहे. या मार्गावरील लोकलसेवा येत्या एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.पनवेल ते गोरेगाव विस्तारीकरण करताना जोगेश्वरी, गोरेगाव येथे लोकल उभी करण्यासाठी जागेचा अभाव आणि तांत्रिक अडचणी येत …

Read More »

कामोठ्यात मिसळ महोत्सव

कामोठे : रामप्रहर वृत्तरविशेठ जोशी सोशल फाऊंडेशन आणि मॅजिक टच इव्हेंट्स यांच्या वतीने महाराष्ट्राचा मिसळ महोत्सव कामोठे येथे पोलीस ठाण्यासमोरील मैदानात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 21) झाले.महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, …

Read More »

उरण भाजपचा मंगळवारी तहसील कार्यालयावर मोर्चा

उरण : वार्ताहरशेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या राज्यातील महाविकास आघाडीच्या स्थगिती सरकारविरोधात उरण भाजपतर्फे येत्या मंगळवारी (दि. 25) सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही धडक दिली जाणार आहे.   या वेळी शेतकर्‍यांच्या मागण्यांचे …

Read More »

मल्हार रोजगार मेळाव्यास उदंड प्रतिसाद

तब्बल 691 जणांना मिळाली नोकरी पनवेल : रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या मल्हार रोजगार, तसेच आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, डी. डी. विसपुते कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा पहिला भव्य रोजगार मेळावा शनिवारी (दि. 22) आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात तब्बल 691 जणांना ऑन दि स्पॉट नोकरी …

Read More »

सार्वजनिक आरोग्य जपणे आवश्यक

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांचे प्रतिपादन पनवेल ः वार्ताहर  आपण सार्वजनिक आरोग्यावर जास्त भर द्यायला हवा. सध्या भारतात काहीच संस्थांमध्ये सार्वजनिक आरोग्य हा विषय शिकविला जातो. त्यापैकी राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (एनआयपीएचटीआर) महत्त्वाचे काम करीत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्ष वर्धन …

Read More »

एमआयएमचे वारिस पठाण यांच्यावर गुन्हा दाखल

कलबुर्गी : वृत्तसंस्थाऑल इंडिया मजलिस- ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम)चे प्रवक्ते आणि माजी आमदार वारिस पठाण यांच्यावर वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटकातील कलबुर्गी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.15 कोटी आहोत, पण 100 कोटींना भारी आहोत, असे धार्मिक तेढ निर्माण करणारे वादग्रस्त वक्तव्य वारिस पठाण यांनी 15 फेब्रुवारी रोजी एका …

Read More »

बंदीनंतरच्या पहिल्याच सामन्यात घेतली हॅट्ट्रिक!

जोहान्सबर्ग : वृत्तसंस्थादक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने 107 धावांनी विजय मिळवला. अ‍ॅश्टन अ‍ॅगर ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा हीरो ठरला. त्याने हॅट्ट्रिकसह पाच विकेट्स घेतल्या. 2018मध्ये चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी अ‍ॅगरवर बंदी घालण्यात आली होती. बंदीचा कालावधी संपल्यानंतर तो प्रथमच मैदानात उतरला आणि त्याने कमाल केली.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी …

Read More »

आवरे येथील जिल्हास्तरीय मॅरेथॉनमध्ये

अक्षय जितेकर, ऋतुजा सकपाळ अव्वल उरण : रामप्रहर वृत्तएक धाव आरोग्यासाठी, पूर्वजांच्या स्मरणासाठी, हा संदेश देत उरण तालुक्यातील आवरे येथे निगा फाऊंडेशनच्या वतीने कै. सोमा रामा गावंड यांच्या स्मृतीस अभिवादन करीत जिल्हास्तरीय मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील खुल्या पुरुष गटात अक्षय जितेकर आणि महिलांमध्ये ऋतुजा सकपाळ यांनी बाजी …

Read More »