Breaking News

Ramprahar Reporters

आता सामना ऑस्ट्रेलियाशी; आजपासून वन-डे मालिका

मुंबई : प्रतिनिधीश्रीलंकेला टी-20 मालिकेत पराभूत करणार्‍या भारतीय संघाचा सामना आता तुल्यबळ ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. उभय संघांतील तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेला बुधवार (दि. 14)पासून सुरुवात होत असून, पहिली लढत मुंबईत रंगणार आहे. टीम इंडिया सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. संघाने गतवर्षीच्या शेवटी वेस्ट इंडिजला वन-डे आणि टी-20 मालिकेत धूळ चारली. त्यानंतर …

Read More »

नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ खोपोलीकर सरसावले; भव्य रॅली

खोपोली : प्रतिनिधीकेंद्र शासनाने नागरिकत्व सुधारणा विधेयक (सीएए) लोकसभेत व राज्यसभेत संमत केले आणि त्याचे राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतर झाले. या कायद्याच्या समर्थनार्थ रविवारी (दि. 12) जागरूक नागरिक मंचाच्या वतीने खोपोलीत भव्य रॅली काढण्यात आली होती. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची विशेष उपस्थिती लाभली.रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांनी …

Read More »

सीकेटी विद्यालयात ‘वाद्य आविष्कार’

स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे 26वे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी (दि. 11) उत्साहात साजरा झाला. या स्नेहसंमेलनात ‘वाद्य आविष्कार’ या शीर्षकांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. संस्थेचे चेअरमन, …

Read More »

आम्ही धमक्यांना घाबरत नाही : देवेंद्र फडणवीस

अकलूज : प्रतिनिधीआम्ही कसल्याही धमक्यांना घाबरत नाही जनतेला आमचा कारभार माहीत आहे. कोणाला काहीही आरोप करायचे असतील तर करावेत, आम्ही चौकशीला तयार आहोत, असे चोख प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले आहे.फडणवीस रविवारी (दि. 12) अकलूज येथे आले होते. या वेळी त्यांनी विरोधकांचे सर्व आरोप …

Read More »

‘सीएए’वरून तरुणांची दिशाभूल

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा कोलकाता : वृत्तसंस्थानागरिकत्व कायद्याबद्दल अफवा पसरवून तरुणांची दिशाभूल केली जात आहे. हा कायदा एका रात्रीत नव्हे, तर विचारपूर्वक तयार केला असून, तो नागरिकत्व हिसकावून घेणारा नाही, तर नागरिकत्व देणारा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 12) येथे केले. जे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी …

Read More »

‘शिवसेनेचे 35 आमदार उद्धव ठाकरेंवर नाराज’

ठाणे : भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेचे 56 पैकी 35 आमदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहेत, असे म्हटले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अकार्यक्षम असल्याने भाजप पुन्हा राज्यात सत्ता स्थापन करेल, असा दावाही त्यांनी केला आहे. एका कार्यक्रमानिमित्त राणे ठाण्यात आले होते. त्या वेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी …

Read More »

‘त्या’ घटनेबद्दल धोनीला आजही पश्चाताप!

नवी दिल्ली : वृत्तसंस्थागेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात महेंद्रसिंह धोनी धावचीत झाला आणि कोट्यवधी भारतीय चाहत्यांचे मन दुखावले गेले. भारताचा डाव कोसळला असताना धोनीने संयमी फलंदाजी करीत शेवटपर्यंत विजयाची आशा जिवंत ठेवली होती. धोनी बाद झाला आणि भारतीय संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडला.सेमीफायनलच्या सामन्यात धोनीच्या रन …

Read More »

चेतेश्वर पुजाराचे विक्रमी द्विशतक

राजकोट : वृत्तसंस्थाभारतीय कसोटी संघात माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडनंतर जागा निर्माण करणार्‍या चेतेश्वर पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आणखी एक द्विशतक झळकावले आहे. राजकोट येथे माधवराव सिंधिया क्रिकेट मैदानावर सौराष्ट्रविरुद्ध कर्नाटक सामन्यात पुजाराने विक्रमी द्विशतकी खेळी केली.रणजी ट्रॉफीत सौराष्ट्रविरुद्धच्या एलिट ग्रुप ए आणि ग्रुप बीमधील सामन्यात कर्नाटककडून खेळताना पुजाराने 314 चेंडूत …

Read More »

जसप्रीत बुमराहला पॉली उम्रीगर पुरस्कार

मुंबई : प्रतिनिधीआपल्या भेदक गोलंदाजीने जगभरातील फलंदाजांची दाणादाण उडवणारा भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या शिरपेचात अजून एका मानाचा तुरा खोवला गेला आहे. गेल्या वर्षभरात बुमराहने केलेल्या धडाकेबाज कामगिरीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याला 2018-19 या वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला देण्यात येणारा पॉली उम्रीगर पुरस्कार जाहीर केला आहे. …

Read More »

महाराष्ट्र सर्व बाद 434 धावा

रणजी सामन्यात झारखंडला प्रारंभिक धक्के नागोठणे : प्रतिनिधीरणजी क्रिकेट स्पर्धेत झारखंडविरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्र संघाने रविवारी (दि. 12) दुसर्‍या दिवशी खेळ संपायला काही मिनिटे बाकी असताना सर्वबाद 434 धावा केल्या. त्यानंतर पहिल्या षटकातच महाराष्ट्राच्या मुकेश चौधरीने झारखंडला झटके देत दोन बळी टिपल्याने खेळ संपला तेव्हा झारखंडची 2 बाद 2 अशी बिकट …

Read More »