Breaking News

Ramprahar Reporters

आमदार प्रशांत ठाकूर आज भरणार अर्ज

पनवेल : भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आणि पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर गुरुवारी (दि. 3) सकाळी 11 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर एक लाखाहून अधिक मताधिक्य मिळवून विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी ज्येष्ठ, कार्यकर्ते व मतदारराजाच्या आशीर्वादाने सज्ज झाले आहेत. …

Read More »

पनवेलमध्ये नवरात्रोत्सवाचा ‘झंकार’

पनवेल : रामप्रहर वृत्त नवरात्रोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात सुरू आहे. पनवेलमध्ये मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने झंकार नवरात्रोत्सव 2019 आयोजित करण्यात आला आहे. या नवरात्रोत्सवाला सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी त्यांच्या हस्ते उत्तम नृत्य करणार्‍यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. पनवेलमधील …

Read More »

काँग्रेस आमदार काशीराम पावरा भाजपमध्ये

गोपीचंद पडळकरही स्वगृही मुंबई : प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील शिरपूरचे काँग्रेस आमदार काशीराम पावरा यांनी सोमवारी (दि. 30) भाजपमध्ये प्रवेश केला. गोपीचंद पडळकरही स्वगृही परतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. मुंबईतील गरवारे क्लबमध्ये झालेल्या या कार्यक्रमास मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार …

Read More »

उरण विधानसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते भाजपत

बोलतोय ते करून दाखवणार : महेश बालदी रसायनी : रामप्रहर वृत्त मी कधीही जात-धर्म मानला नाही. माणूस हाच एक धर्म आहे. ज्यांना विकास कळत नाही ते जातीचे राजकारण करतात. 21व्या शतकात आपण चंद्रावर पोहोचलो, पण विरोधक जातीच्या नावाने राजकारण करीत आहेत. उरण मतदारसंघात विकास खुंटला असून, विकासाला दिशा देण्यासाठी मी …

Read More »

शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेसला खिंडार

माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, सुनील घरत यांच्यासह अजय कांडपिळे, जयवंत महामुनी समर्थकांसह भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, राष्ट्रवादीचे नेते व माजी नगराध्यक्ष सुनील घरत, पनवेल अर्बन बँकेचे चेअरमन व शेकापचे माजी नगरसेवक अजय कांडपिळे, राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष जयवंत महामुनी, काँग्रेसचे माजी नगरसेवक अशोक …

Read More »

कार्यकर्ता हीच भाजपची शक्ती

पनवेल : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षात जेवढा नेता महत्त्वाचा तितकाच कार्यकर्ता महत्त्वपूर्ण असतो. हा कार्यकर्ता पक्षाचा आधारस्तंभ असून, याच शक्तीच्या जोरावर आमदार प्रशांत ठाकूर यांना मोठ्या मताधिक्याने तिसर्‍यांदा विधानसभेत पाठवू या, अशी साद पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी घातली. त्या कळंबोली येथे बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होत्या. पुन्हा आणू …

Read More »

पनवेल व उरण विधानसभा मतदारसंघांमध्ये आज भाजपत मेगाभरती

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल व उरण विधानसभा मतदारसंघांतील विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांचा रविवारी (दि. 29) भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार आहे. नवीन पनवेल, कळंबोली, पनवेल आणि मोहोपाडा येथे ‘मेगाभरती’ कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. भाजपच्या माध्यमातून केंद्रात व राज्यात होणारी विकासकामे, तसेच पनवेल मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …

Read More »

कर्नाळा बँकेतील ठेवीदारांचे पैसे बुडवू देणार नाही!

भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांची ग्वाही पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांचे पैसे बुडवू देणार नाही, अशी ग्वाही माजी खासदार, भाजप नेते व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांनी शनिवारी (दि. 28) पनवेल येथे दिली. कर्नाळा सहकारी बँकेतील खातेदार, ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळत नसल्याने अनेक …

Read More »

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी फोनही बंद ठेवल्याने राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हा राजीनामा मंजूर केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यात पूरग्रस्तांच्या दौर्‍यावर गेलेले असतानाच अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले …

Read More »

भाजपमध्ये इनकमिंग सुरूच

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खैरणे येथे गुरुवारी (दि. 26) झालेल्या बैठकीत शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसच्या वलप येथील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. या बैठकीस भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा …

Read More »