Breaking News

Ramprahar Reporters

कुस्ती स्पर्धेत ‘सीकेटी’चे उज्ज्वल यश

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. नावडे येथील प. जो. म्हात्रे विद्यालयात झालेल्या कुस्ती स्पर्धेच्या 14 वर्षांखालील मुलांच्या गटात सीकेटी विद्यालयाचे विद्यार्थी सिद्धेश तांडेल व गौरव मंडळ यांनी …

Read More »

विराट, मयांकने डाव सावरला

विंडीजविरुद्ध भारत मजबूत स्थितीत जमैका : वृत्तसंस्था वेस्ट इंडिजविरुध्द सुरू असलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि मयांक अग्रवालच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने पाच बाद 264 धावांची मजल मारली आहे. विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर लोकेश राहुल व मयांक यांनी सावध …

Read More »

गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याची कारागिरांची लगबग

अलिबाग : प्रतिनिधी गणेशोत्सव तोंडावर आल्याने गणेश कार्यशाळांमध्ये सध्या मूर्ती रंगविण्याच्या कामाची लगबग सुरू आहे. गणेश मूर्तिकार बाप्पावर शेवटचा हात फिरविण्यात व्यस्त आहेत. गणेशोत्सवाला अवघे काही दिवसच उरले आहेत. त्यामुळे गणेशमूर्तीला फायनल टच देण्यात कारागीर व्यस्त आहेत, पण अशा वेळी पुरेसे कुशल कामगार नसल्यामुळे गणेशमूर्ती वेळेवर तयार करण्यासाठी कारखानदारांना मोठी …

Read More »

राज्य सरकारचा धडाका

मंत्रिमंडळ बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (दि. 28) झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यात मुंबईत हैदराबाद विद्यापीठ स्थापन करण्याचा आणि नाशिकमध्ये मेट्रो प्रकल्प राबविण्याच्या निर्णयाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली  मंत्रिमंडळाची बैठक …

Read More »

कराटेपटू निशांत डाकूआला ब्लॅक बेल्ट

मुरूड : प्रतिनिधी ओकिनावा शोरीन-रियु क्यूडोकान कराटे डो ऐरोली (नवी मुंबई) शाखेच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परीक्षेत निशांत प्रदीप डाकूआ हा यशस्वी झाला. त्यामुळे त्याला मानाचा ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला. ऐरोलीतील संत सावता भवनात नुकत्याच झालेल्या या परीक्षेत भारताचे मुख्य प्रशिक्षक अरुण बोडके यांनी परीक्षण केले. निशांत …

Read More »

कॅरम स्पर्धेत ‘सीकेटी’ विद्यालयाचे सुयश

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत सुयश संपादन केले आहे. पिल्लई ग्लोबल अ‍ॅकॅडमी येथे झालेल्या कॅरम स्पर्धेत सीकेटी विद्यालयाच्या निमेश मोरे याने प्रथम क्रमांक पटकाविला, तर साहिल राठोडने पाचवे स्थान प्राप्त केले. दोन्ही विद्यार्थ्यांची मुंबई …

Read More »

व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘आरटीपीएस’ विजेता

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल (आरटीपीएस)मधील विद्यार्थ्यांच्या संघाने पनवेल महानगरपालिका अंतर्गत झालेल्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकाविले आहे. रायगड जिल्हास्तरीय 19 वर्षांखालील मुलांची व्हॉलीबॉल स्पर्धा बुधवारी (दि. 28) खारघर येथील बालभारती पब्लिक स्कूलमध्ये झाली. या स्पर्धेत आरटीपीएस विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन …

Read More »

जलतरणपटू प्रभात कोळीला तेनसिंग नोर्गे पुरस्कार जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा जलतरणपटू प्रभात कोळी याला मानाचा तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार जाहीर झाला आहे. 29 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पाच लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. नेरूळ …

Read More »

मानसी जोशीचा ‘सुवर्ण’स्मॅश

बासेल (स्वित्झर्लंड) : वृत्तसंस्था भारताची बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूच्या जागतिक विजेतेपदानंतर आता मानसी जोशीने पॅरा बॅडमिंटनमध्ये सुवर्णाक्षरात आपले नाव नोंदवले आहे. बासेल येथील वर्ल्ड पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये एसएल-3च्या अंतिम सामन्यात हमवतन पारुल परमारचा पराभव करीत मानसीने जेतेपदावर नाव कोरले. अंतिम सामन्यात मानसीने 21-12, 21-7च्या फरकाने पारुलवर विजय मिळवला. 2011मध्ये …

Read More »

बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या

उरण : वार्ताहर गणेशोत्सव आठवड्यावर येऊन ठेपला असल्याने शहरातील बाजारपेठा विविध वस्तूंनी फुलल्या आहेत. यामध्ये सजावटीच्या वस्तूंसह मखरांचा समावेश आहे. ‘विठू माऊली’ मालिकेत पांडुरंगाने वापरलेल्या दागिन्यांची डिझाईन, मुकूट याची मागणी बाजारपेठेत अधिक दिसून येते. गणेशोत्सवात फुलांचे भाव वाढत असल्याने कृत्रिम फुलांच्या माळा घेण्यास ग्राहक सरसावत आहेत, तर विद्युत रोषणाईच्या झगमगाटासाठी …

Read More »