Breaking News

Ramprahar Reporters

रविवारी उरण विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त पुन्हा आणूया आपले सरकार, या शीर्षकाखाली रविवारी (दि. 25) सकाळी 10 वाजता खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर भारतीय जनता पार्टी उरण विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे अर्थ नियोजन व वनमंत्री …

Read More »

पनवेल मनपा देणार गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार

समन्वय समितीच्या बैठकीत महापौरांची घोषणा पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेने गुरुवारी (दि. 22) सकाळी 10 वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गणेशोत्सव 2019 समन्वय समितीची बैठक बोलावली होती. या बैठकीत महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी यंदापासून महानगरपालिका क्षेत्रातील उत्तम देखावे सादर करणार्‍या गणेशोत्सव मंडळांना यावर्षीपासून पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल, …

Read More »

अजित पवारांसह 50 दिग्गज नेते अडचणीत

मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (एमएससी) कथित हजारो कोटी रुपयांच्या कर्ज वितरण घोटाळ्याप्रकरणी पाच दिवसांत एफआयआर नोंदविण्याचे आदेश गुरुवारी (दि. 22) मुंबई हायकोर्टाने पोलिसांना दिले. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळावर असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे आदींसह जवळपास 50 नेते अडचणीत सापडले आहेत. राज्याची …

Read More »

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे ज्युडो स्पर्धेत यश

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका अंतर्गत तालुका क्रीडा संकुल, पनवेल येथे रायगड जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धा बुधवारी (दि. 21) पार पडल्या. या स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उज्ज्वल यश संपादन केले. ज्युडो स्पर्धेत यशस्वी झालेले विद्यार्थी ः प्रथम क्रमांक – सिद्धेश खडकर   ई-9/अ, अबुझर मुल्ला  ई-10/क, कश्यप …

Read More »

पुणेरी पलटणची बंगळुरु बुल्सवर मात

मुंबई ः प्रतिनिधी बंगळुरु बुल्सच्या कमकुवत बचावफळीचा फायदा घेत पुणेरी पलटण संघाने प्रो-कबड्डीच्या सातव्या पर्वात गतविजेत्या बंगळुरु बुल्सला पराभवाचा धक्का दिला आहे. 31-23च्या फरकाने सामन्यात बाजी मारत पुणेरी पलटण संघाने स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. पुणेरी पलटणच्या चढाईपटूंनी बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात आक्रमक खेळ केला. मनजीत आणि शहाजी जाधव या तरुण …

Read More »

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा; सिंधू, सायनाची शानदार सुरुवात

बासल ः वृत्तसंस्था दोन वेळा रौप्यपदकावर नाव कोरणारी पी. व्ही. सिंधू आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल यांनी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील आपल्या अभियानाची शानदार सुरुवात केली. सिंधूने बुधवारी चायनीज तैपेईच्या पाय यू पो हिच्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवत तिसर्‍या फेरीत मजल मारली, तर सायनाने नेदरलँड्सच्या सोराया डे विच आयबेर्गेन हिला सहज …

Read More »

बीचवर ‘विरुष्का’; फोटोला 25 लाख लाइक्स!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था वन डे आणि टी-20 मालिकेनंतर काही दिवसांची उसंत मिळाल्याने भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजमधील निसर्गसौंदर्य भरपूर एन्जॉय करताना दिसत आहे. शिखर धवनसह काही खेळाडूंचे पोहतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता कर्णधार विराट कोहलीचा पत्नीसोबतचा बीचवरील खास ’लूक’ सोशल मीडियाच्या माध्यमातून झळकला आहे.  खुद्द विराट कोहलीनेच आपल्या …

Read More »

रस्त्यांची दुरुस्ती शीघ्रगतीने करा

रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश मुंबई : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी या मार्गावरील सर्व  रस्त्यांची शीघ्रगतीने व उत्तम पद्धतीने दुरुस्ती करावी, असे आदेश रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (दि. 21) येथे दिले. रायगड जिल्ह्यात आगामी गणेशोत्सवासाठी करावयाच्या उपाययोजना, तसेच कायदा- सुव्यवस्थेच्या अनुषंगाने …

Read More »

आजपासून वाशीत जागतिक स्तरावरील आरोग्यदायी कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त आयुष मंत्रालय भारत सरकार, राज्य सरकार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषद, एमसीआयएम, सिडको, नवी मुंबई महानगरपालिका, डॉ. डी. जी. पोळ फाऊंडेशन आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 22 ते 25 ऑगस्टपर्यंत आयोजित वर्ल्ड आयुष एक्स्पो आणि आरोग्य 2019 या जागतिक …

Read More »

कर्नाळा अभयारण्य बनणार जागतिक पर्यटनस्थळ

विकासासाठी वनमंत्र्यांकडून 11 कोटी 65 लाखांचा निधी मंजूर मुंबई : रामप्रहर वृत्त पर्यटकांचे आकर्षण असलेल्या कर्नाळा अभयारण्याचे रूपडे आता पालटणार असून, ते जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ होणार आहे. यासाठी 11 कोटी 65 लाख रुपयांचा निधी वने व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी (दि. 21) मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंजूर केला. यामुळे भाजप …

Read More »