Breaking News

Ramprahar Reporters

स्वातंत्र्यदिनी मिशन दृष्टी ; 72 नागरिकांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया

लक्ष्मी आय केअर इन्स्टिट्यूटचा उपक्रम पनवेल ः बातमीदार  पनवेलच्या लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट व लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टने ठाणे व रायगड जिल्ह्यातील 72  नागरिकांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला. इन्स्टिट्यूटच्या टीमने हा दिवस मिशन दृष्टीसाठी दिला असून मेडिकल डायरेक्टर डॉ. सुहास हळदीपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच दिवशी 72 …

Read More »

सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध : ना. योगेश सागर

अलिबाग ः जिमाका समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे नगर विकास राज्यमंत्री ना. योगेश सागर यांनी गुरुवारी (दि. 15) येथे केले. येथील पोलीस परेड मैदानात स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाचे मुख्य ध्वजारोहण त्यांच्या हस्ते झाले.  या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, …

Read More »

2020पर्यंत घराघरांत शुध्द पाणी

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी केली जल जीवन योजनेची घोषणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्था 2020पर्यंत सर्वांना घराघरांत शुध्द पाणी मिळावे यासाठी ‘जल जीवन’ योजनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 73व्या स्वातंत्र्यदिनी घोषणा केली. यासाठी 3.5 लाख कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना  भारतीय संरक्षण दलाला …

Read More »

रामशेठ ठाकूर यांच्यामुळे पनवेलला शैक्षणिक वारसा अन् परंपरा : पालकमंत्री

पनवेल ः प्रतिनिधी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यामुळे पनवेल परिसराला शैक्षणिक वारसा आणि परंपरा लाभली आहे, हे कोणीही विसरू शकणार नाही, असे प्रतिपादन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (दि. 14) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रौप्य महोत्सवी समारंभात बोलताना केले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणासोबत …

Read More »

शिक्षणाशिवाय पर्याय नाही : डॉ. सुहास पेडणेकर

पनवेल : प्रतिनिधी जगातील सर्वांत मोठे दान म्हणजे शिक्षणदान आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. अशा या शिक्षणाचा उपयोग स्वत:पर्यंत मर्यादित न ठेवता तो समाजालाही व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी केले. ते मंगळवारी (दि. 13) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रौप्य महोत्सव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून …

Read More »

पूरग्रस्तांना सर्वतोपरी सहकार्य करणार : पालकमंत्री

पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील कणे गावाला पुराचा फटका बसला असून, घरात पाणी शिरून अनेकांचे नुकसान झाले. रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (दि. 14) कणे गावातील पूरग्रस्तांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांसह भाजप सरकार पूर्णपणे आपल्या पाठीशी राहील, अशी हमी देत ग्रामस्थांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन ना. चव्हाण यांनी या वेळी …

Read More »

मुख्यमंत्र्यांना रायगडातून 14 हजार राख्या

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र सरकारचे महिलावर्गाबरोबर जिव्हाळ्याचे नाते असून, ते अधिक दृढ व्हावे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चातर्फे रक्षाबंधनानिमित्त शक्ती सन्मान महोत्सव राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्ह्यातून जमा झालेल्या जवळपास 14 हजार राख्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंबईला रवाना करण्यात येणार असल्याची माहिती महिला …

Read More »

पनवेलमध्ये रविवारी विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन

पनवेल : रामप्रहर वृत्त पुन्हा आणूया आपले सरकार! या शीर्षकाखाली भारतीय जनता पक्ष पनवेल विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन रविवारी (दि. 18) सकाळी 10 वाजता खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे शिक्षणमंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री व पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार …

Read More »

भाजप नेते महेश बालदी यांच्याकडून दिघाटी पूरबाधितांना आर्थिक मदत

पनवेल ः रामप्रहर वृत्त  पुराचे पाणी घरात शिरून नुकसान झालेल्या दिघाटी येथील ग्रामस्थांना जेएनपीटीचे विश्वस्त तथा भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी आर्थिक मदत केली आहे. 65 पूरबाधित कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात आले. मुसळधार पावसामुळे पनवेल तालुक्यातील दिघाटी गावात पूरस्थिती निर्माण होऊन अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. …

Read More »

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचा रौप्य महोत्सव; पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची आज प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त शिक्षणासह विविध क्षेत्रांत अग्रेसर असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त बुधवारी (दि. 14) सायंकाळी 4 वाजता दुसरा विशेष समारंभ होणार आहे. या समारंभास रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या प्रांगणात संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या …

Read More »