Breaking News

Ramprahar Reporters

जय हो!

’चांद्रयान-2’ झेपावलं ; भारताची ऐतिहासिक कामगिरी श्रीहरिकोटा : वृत्तसंस्था जगभरातील सर्वच भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेले आणि अवघ्या जगाचे लक्ष लागलेले ’चांद्रयान-2’ सोमवारी (दि. 22) अखेर अंतराळात झेपावले. इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी ’चांद्रयान-2’चे प्रक्षेपण करण्यात आले. यान यशस्वीपणे अवकाशात झेपावल्यानंतर शास्त्रज्ञांसह देशवासीयांनी एकच जल्लोष …

Read More »

श्रीमंती नाही, तर समाजसेवा महत्त्वाची : लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. त्यामुळे श्रीमंती महत्त्वाची नाही, तर समाजसेवा महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खांदा कॉलनी येथे केले. सिडको अध्यक्ष भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही आरोग्य महाशिबिर आयोजित करण्यात आले असून या महाशिबिराच्या नियोजनासंदर्भातील आढावा …

Read More »

‘त्या’ सहा धावा चुकीच्याच

पंचांनी दिली कबुली कोलंबो ः वृत्तसंस्था वन डे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ओव्हर थ्रोच्या सहा धावा देण्याचा माझा निर्णय चुकीचाच होता; पण त्याचा मला खेद वाटत नाही, हे उद्गार आहेत श्रीलंकेचे पंच कुमार धर्मसेना यांचे. वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत ‘ओव्हर थ्रो’ आणि त्यामुळे इंग्लंडला लाभलेल्या सहा धावांची सर्वाधिक चर्चा झाली. तो …

Read More »

अखेरच्या वन डे सामन्यात विजयासह भारत अ संघाने मालिका जिंकली

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचे शतक एका धावेने हुकले मुंबई ः प्रतिनिधी पाचव्या अनौपचारिक एकदिवसीय सामन्यात भारत ‘अ’ संघाने वेस्ट इंडिज ‘अ’ संघावर मात करत मालिकेत 4-1ने बाजी मारली आहे. वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेले 237 धावांचे आव्हान भारतीय संघाने केवळ दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. भारतीय संघाचे सलामीवीर शुभमन गिल आणि ऋतुराज …

Read More »

धोनीकडून चेंडू निवड समितीच्या कोर्टात

मुंबई ः प्रतिनिधी 2019 विश्वचषक स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीविषयी चर्चा सुरू झाली आहे. अद्याप धोनीने निवृत्तीविषयी कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. आगामी वेस्ट इंडिज दौर्‍यात मात्र आपण खेळणार नसल्याचे धोनीने निवड समितीला कळवले आहे. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर संघात निवडायचे की नाही, हा निर्णय निवड समितीनेच …

Read More »

स्टँड-अप कॉमेडीची राज्यस्तरीय स्पर्धा

सीकेटी महाविद्यालयात होणार रायगडसाठीचे ऑडिशन मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून, राज्य शासनामार्फत ‘पुल’ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. याच उपक्रमांतर्गत ‘पुल’ यांच्या साहित्यावर आधारित स्टँड-अप कॉमेडीची राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेचे रायगड जिल्ह्यासाठीचे ऑडिशन खांदा कॉलनी येथील …

Read More »

खालापुरात कार डबक्यात कोसळली

खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर खालापूर तालुक्यातील वावंढळ गावच्या हद्दीत शनिवारी (दि. 20) एक इंडिका कार बाजूला असणार्‍या पाण्याच्या डबक्यात जाऊन कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा विचित्र अपघात घडला. ही कार 20 मीटर रस्ता सोडून बाजूला असणार्‍या डबक्यात पडली.

Read More »

भीषण अपघातात नऊ युवकांचा मृत्यू

हडपसर : प्रतिनिधी पुणे-सोलापूर मार्गावर लोणी काळभोर वाक वस्ती येथे कार आणि ट्रकचा भीषण अपघात होऊन कारमधील नऊ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. रायगडला सहलीला गेलेलेे हे सर्व जण घरी परतत असताना शनिवारी (दि. 20) मध्यरात्री त्यांच्यावर काळाने झडप घातली. यवत येथील रहिवासी असलेल्या तरुणांची इर्टीका कार शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास …

Read More »

पनवेलचा वीजप्रश्न सुटणार

शहरासाठी स्वतंत्र उपकेंद्र होणार कार्यान्वित आ. प्रशांत ठाकूर यांचे प्रयत्न लागणार सार्थकी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी बांधण्यात आलेले उपकेंद्र पुढील महिन्यात पूर्ण होत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आग्रहास्तव राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पनवेलमध्ये घेतलेल्या जनता दरबारानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. …

Read More »

‘हॉल ऑफ फेम’ अभिमानाची बाब

सचिन तेंडुलकरच्या भावना मुंबई : प्रतिनिधी ‘हॉल ऑफ फेम’ हा बहुमान मिळाल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रत्येक पुरस्कार हा महत्त्वाचा असतो. मला एका पुरस्काराची दुसर्‍या पुरस्काराशी तुलना करायची नाही. प्रत्येक पुरस्कार आणि कौतुक याचे माझ्या आयुष्यात एक अत्यंत खास स्थान आहे आणि मला त्याबाबत प्रचंड आदर …

Read More »