Breaking News

Ramprahar Reporters

पनवेल मनपा क्षेत्रात होणार 15 हजार रोपांची लागवड

पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य शासनाच्या वन विभागातर्फे 33 कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या मोहिमेंतर्गत पनवेल महापालिकेच्या वतीने मनपा क्षेत्रात 15 हजार रोपांची लागवड करण्यात येणार असून, त्याचा शुभारंभ सोमवारी (दि. 1) पिसार्वे येथे महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांच्या प्रमुख …

Read More »

कोसळधार कायम

रायगडातील जनजीवन विस्कळीत; अतिवृष्टीचा इशारा अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात सलग चार दिवस कोसळणार्‍या पावसाचा जोर सोमवारी (दि. 30) पाचव्या दिवशीही कायम होता. संततधारेमुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. दरम्यान, कोकणात येत्या चार दिवसांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुसळधार पावसाचा फटका अलिबाग तालुक्याला बसला. तालुक्यातील श्रीगावमध्ये …

Read More »

गुणवंत स्पोर्ट्स संघ पीपीएलचा विजेता

उरण : प्रतिनिधी उरण पूर्व विभागात कार्यरत असलेल्या आम्ही पिरकोनकर समूहातर्फे सालाबादप्रमाणे नुकतीच पावसाळी क्रिकेट स्पर्धा पिरकोन प्रीमियर लीग घेण्यात आली. गुणवंत स्पोर्ट्स हा संघ पीपीएलचा विजेता ठरला. पिरकोन गावातील आठ संघांकडून उरण पूर्व भागातील प्रत्येकी दोन आयकॉन खेळाडू खेळताना दिसले. या स्पर्धेत विजय स्पोर्ट्स संघ उपविजेता ठरला. उत्कृष्ट फलंदाज …

Read More »

जाधवऐवजी जडेजाला संधी द्या : सचिन

मुंबई : प्रतिनिधी केदार जाधवऐवजी रवींद्र जडेजाला संघात संधी द्यायला हवी, असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले आहे. विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा 31 धावांनी पराभव झाला. या सामन्याचे विश्लेषण करताना सचिन तेंडुलकरने संथ फलंदाजी करणार्‍या जाधवऐवजी जडेजाला संधी देण्यात यावी, असे म्हटले. सचिन म्हणाला, इंग्लंडची सलामीच्या …

Read More »

विजय शंकर ‘आऊट’; मयंक अग्रवालला संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला अजून एक धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू विजय शंकर दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला आहे. आधी शिखर धवन आणि नंतर विजय शंकर दुखापतीमुळे संघातून बाहेर पडल्याने भारतीय संघासमोर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विजय शंकरच्या जागी मयांक अग्रवालला संधी देण्यात आली आहे. नेट प्रॅक्टिस …

Read More »

भारताच्या पराभवाने पाकला धाकधूक

बर्मिंगहॅम : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेत निर्णायक सामन्यामध्ये दमदार खेळ करीत यजमान इंग्लंडने भारतावर 31 धावांनी विजय मिळवला. भारताच्या पराभवामुळे पाकिस्तानच्या गोटात चिंतेच वातावरण पसरले आहे. उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी पाकला बांगलादेशविरुद्ध विजयासोबत इतर संघांच्या कामगिरीवरही अवलंबून रहावे लागणार आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 337 धावा फटकावल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग …

Read More »

ठाकूर कुटुंब माझ्या विजयाचे शिल्पकार

खासदार श्रीरंग बारणे यांची कृतज्ञता पनवेल : रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी बारणे परिवारापेक्षा ठाकूर कुटुंबीयांनी जास्त मेहनत घेतली. त्यामुळे तेच खर्‍या अर्थाने या विजयाचे शिल्पकार आहेत. त्याची परतफेड आम्ही करणार असून, येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर एक लाखाहून अधिक मतांची आघाडी घेऊन विजयी होतील, असा विश्वास खासदार …

Read More »

रायगडसाठी 45 लक्ष रोपांची निर्मिती

अलिबाग : जिमाका राज्य शासनाच्या हरित महाराष्ट्र चळवळीतंर्गत या वर्षी 33 कोटी वृक्ष लागवड अभियानासाठी रायगड जिल्ह्यात रोपांची लागवड करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाने संपूर्ण जिल्ह्यात 30 ठिकाणी रोपवाटिका तयार करून 45 लाख 78 हजार रोपांची निर्मिती केली आहे, अशी माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी ए. एस. निकत यांनी …

Read More »

पुण्यात भिंत कोसळून 15 मजूर मृत्युमुखी

आठ जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पुणे : प्रतिनिधी कोंढवा भागात सोसायटीची सरंक्षक भिंत कोसळून 15 बांधकाम मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली. ढिगार्‍याखालून तिघांना जिवंत काढण्यात यश आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या आठ जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढव्यातील बडा तालाब मस्जिद परिसरात आल्कन स्टायलस …

Read More »

नवी मुंबई मनपा परिवहन समिती निवडणूक वादात

राष्ट्रवादीच्या कारभाराचा शिवसेनेकडून निषेध नवी मुंबई : रामप्रहर वृत्त येथील महानगरपालिका सभागृहात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने परिवहन समिती सदस्य निवडणुकीत नियमाला बगल देत शिवसेनेच्या सदस्यांना पदापासून वंचित ठेवले. त्यामुळे संतापलेल्या शिवसेनेने राष्ट्रवादीच्या एककल्ली कारभाराचा निषेध केला. नवी मुंबई महापालिका परिवहन समितीच्या सदस्यांची निवड शनिवारी (दि. 29) होणार होती. 2007पासून परिवहन …

Read More »