अलिबाग ः प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (दि. 23) मतदानप्रक्रिया शांततेत झाली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत 58.06 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. शिवसेनेचे अनंत गीते, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यासह 16 उमेदवारांचे राजकीय भवितव्य तिसर्या टप्प्यातील निवडणुकीत मतदान यंत्रात बंद झाले आहे. रायगडात भरघोस मतदानाची परंपरा याही वेळी जपली गेली. सकाळपासूनच …
Read More »खारघरमध्ये महाआघाडीचा फ्लॉप शो; शरद पवारांच्या सभेत रिकाम्या खुर्च्यांची गर्दी
खारघर : प्रतिनिधी खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची कामोठ्यातील सभा मंगळवारी (दि. 23) जोरदार झाली असताना, त्याच दिवशी सायंकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ यांच्यासाठी घेतलेली सभा अक्षरशः फ्लॉप ठरली. या सभेत रिकाम्या खुर्च्यांनी गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे महाआघाडीत एकच …
Read More »बारामतीचे पार्सल परत पाठवा : मुख्यमंत्री
महायुतीची कामोठ्यात दणदणीत सभा पनवेल : रामप्रहर वृत्त यंदाची लोकसभा निवडणूक साधी नाही. ती देशाच्या अस्मितेची लढाई आहे. त्यामुळे बारामतीचे पार्सल परत पाठवून मावळ लोकसभा मतदारसंघातून खासदार श्रीरंग बारणे यांना विजयी करा. म्हणजे देशाला पुढे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ताकद मिळेल आणि मग जागतिक पातळीवर कुणीही आपल्या भारताला रोखू शकणार …
Read More »अभिनेता सनी देओल भाजपमध्ये
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत अभिनेता सनी देओल याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याला पंजाबच्या गुरुदासपूरमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. सनी देओलने गेल्या शुक्रवारी नवी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर सनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. राजकीय …
Read More »‘आयईडी’पेक्षा व्होटर आयडी अधिक शक्तिशाली : नरेंद्र मोदी
अहमदाबाद : वृत्तसंस्था आयईडी हे दहशतवादाचे शस्त्र असते; तर व्होटर आयडी हे लोकशाहीचे शस्त्र आहे. आयईडीपेक्षा लोकशाहीचे शस्त्र असलेले व्होटर आयडी कैकपटीने शक्तिशाली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 23) केले अहमदाबादमध्ये मतदान केल्यानंतर ते बोलत होते. मतदारांनी मोठ्या संख्येने लोकशाहीच्या शस्त्राचा वापर करून मतदान करावे, असे …
Read More »सानिया मिर्झाची बहीणकरणार अझरच्या मुलाशी लग्न
हैदराबाद : वृत्तसंस्था आयपीएलच्या 12व्या मोसमात कोलकाता आणि हैदराबादची मॅच बघण्यासाठी भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा पोहोचली होती. सानिया मिर्झासोबत तिची बहीण अनम मिर्झाही मॅचचा आनंद घेत होती, पण अनमसोबत असलेल्या क्रिकेटपटूच्या मुलानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. सानिया मिर्झा, अनम मिर्झा आणि मोहम्मद अझरुद्दीनचा मुलगा असद हैदराबादची मॅच बघण्यासाठी पोहोचले. …
Read More »पाकच्या खेळाडूला वर्ल्ड कप आधी सचिनला भेटायचंय
मुंबई : प्रतिनिधी आजही देशातलीच नाही, तर जगभरातली लहान मुलं सचिन तेंडुलकरला आयडॉल मानून क्रिकेट खेळायला सुरुवात करतात. क्रिकेट विश्वातला प्रत्येक खेळाडू सचिन तेंडुलकरला भेटण्याचं स्वप्न पाहत असतो. अशीच इच्छा पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटूने व्यक्त केली आहे. या खेळाडूची पाकिस्तानच्या वर्ल्ड कप टीममध्ये निवड झाली आहे. पाकिस्तानचा बॅट्समन आबिद अली याने …
Read More »धोनीच्या गेम प्लॅनबद्दल संशय नाही : फ्लेमिंग
बेंगळुरू : वृत्तसंस्था चेन्नई सुपर किंग्ज संघाला आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध एका धावेने पराभव पत्करावा लागला. शेवटच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक झालेल्या लढतीत कर्णधार महेंद्रसिंह धोनीची झुंज अपयशी ठरली. धोनीने या लढतीत 48 चेंडूंत 7 षटकार व 5 चौकारांसह नाबाद 84 धावांची खेळी केली, मात्र धोनीने 19व्या षटकात …
Read More »स्कॉटलंडच्या या खेळाडूचे 25 चेंडूत शतक
स्कॉटलंड : वृत्तसंस्था स्कॉटलंड फलंदाज जॉर्ज मुंसे याने अवघ्या 25 चेंडूत शतक ठोकत ऐतिहासिक खेळी केली आहे. ग्लोसेस्टरशायर सेकंड इलेव्हनमधून खेळताना मुंसेने ही कामगिरी केली आहे. याशिवाय सहा चेंडूत सहा षटकार लगावण्याचा पराक्रमही त्याने केला. जॉर्ज मुंसे ग्लोसेस्टरशायर सेकंड इलेव्हनकडून खेळताना बाथ सीसी संघाविरुद्ध टी-20 सामन्यात 39 चेंडूत 147 धावा …
Read More »आयपीएल फायनलची तारीख ठरली!
मुंबई : प्रतिनिधी आयपीएलच्या 12व्या मोसमाच्या फायनलची तारीख अखेर ठरली आहे. 12 मे रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये यंदाच्या आयपीएलची फायनल रंगेल. याआधीच्या वेळापत्रकानुसार क्वालिफायर-1 आणि फायनल ही चेन्नईमध्ये होणार होती, पण तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन (टीएनसीए)ला सरकारने स्टेडियममधले बंद असलेले तीन स्टॅण्ड सुरू करण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे आता …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper