उरण : वार्ताहर रायगड जिल्ह्यातील मानाची माजी सरपंच चषक 2019 रजनी क्रिकेट स्पर्धा उरण तालुक्यातील सोनारी येथे रंगली. सोनारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य महेश कडू व दिनेश तांडेल यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे उद्घाटन सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष …
Read More »रायगड फायटर्स संघ नगरसेवक चषकाचा मानकरी
पनवेल : रामप्रहर वृत्त नगरसेवक संजय भोपी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष पुरस्कृत आणि संजय भोपी प्रतिष्ठान सिद्धिविनायक मित्र मंडळ आयोजित नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धा रविवारी (दि. 24) नुकतीच खांदा कॉलनीत रंगली. या स्पर्धेत रायगड फायटर्स संघाने विजेतेपद पटकाविले; तर तोरणा रेंजर्स संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्षे …
Read More »शारजाह-जेएनपीटी मालवाहतूक मार्ग
उरण : प्रतिनिधी भारतातील प्रमुख कंटेनर पोर्ट असलेले जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) मैत्रीपूर्ण संबंध असणार्या शेजारील देशांमध्ये व्यवसायातील नवीन पुढाकाराने प्रगतीचा वेग वृद्धिंगत करीत आहे. मालवाहतुकीसाठी चालू असलेल्या संयुक्त अरब अमिरात (यूएई) व भारत समुद्री मार्गावर आता सरळ शारजाह कंटेनर टर्मिनल-जेएनपीटी-कांडला-जेएनपीटी असा नवीन मार्ग सुरू करण्यात आला आहे. या …
Read More »सात चेंडूंत सात षटकार!
शेतकर्याच्या मुलाने मोडला युवराज सिंगचा विक्रम मुंबई : प्रतिनिधी 2007 सालच्या ट्वेन्टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या युवराज सिंगने इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडची चांगलीच धुलाई केली होती. युवीने 12 वर्षांपूर्वी ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार खेचण्याचा पराक्रम केला होता. त्याच्या या खेळीची आठवण जागवणारी फटकेबाजी मुंबईच्या खेळाडूने केली आहे. मुंबईच्या 23 …
Read More »“अनंत गीतेंना निवडून आणणारच”
अलिबाग : प्रतिनिधी नरेंद्र मोदी देशाचे पुन्हा पंतप्रधान होणार असून, रायगड लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनाही निवडून आणाणारच, असा निर्धार शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. अलिबाग तालुक्यातील शिवसेना, भाजप कार्यकर्त्यांची संयुक्त सभा सोमवारी अलिबागेतील बिगफ्लॅश हॉटेलमध्ये झाली. या सभेत हा निर्धार व्यक्त करण्यात आला. या सभेस …
Read More »भाजपची स्टार प्रचारकांची यादी जाहीर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 40 स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह अन्य बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. भाजपने पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातील निवडणुकीसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली. या यादीत गृहमंत्री राजनाथ सिंह, डॉ. …
Read More »खासदार राजेंद्र गावितांना शिवसेनेकडून उमेदवारी
मुंबई : प्रतिनिधी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले खासदार राजेंद्र गावित यांनी मंगळवारी (दि. 26) शिवसेनेत प्रवेश केला. गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना पालघरमधून लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर पालघरची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली होती. त्यामुळे …
Read More »सर्वांचीच भाजपला पसंती अभिनेत्री; जयाप्रदा यांचा पक्षप्रवेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपमध्ये इनकमिंग सुरूच आहे. समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी मंगळवारी (दि. 26) भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात जयाप्रदा यांनी ‘कमळ’ हाती घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित असल्याची प्रतिक्रिया या वेळी त्यांनी दिली. जयाप्रदा या समाजवादी पक्षातून दोन …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कायम
नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदाच्या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कायम आहे. सी-व्होटर या सर्वेक्षण संस्थेने पंतप्रधान मोदींच्या कामगिरीवर विविध राज्यांतील किती टक्के जनता समाधानी आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असून, इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांत काही …
Read More »अश्विनच्या ‘त्या’ कृत्यावर दिग्गज नाराज
नवी दिल्ली : वृत्तसंस्था यंदाच्या आयपीएलमधील पहिला सामना जिंकून किंग इलेव्हन पंजाब संघाने विजयी सुरुवात केली आहे, मात्र राजस्थान फलंदाज जोस बटलरला ज्या पद्धतीने बाद केले त्यानंतर अश्विन दिग्गजांच्या टिकेचा धनी बनला आहे. बटलरला बाद केल्यानंतर अश्विनच्या अखिलाडू वृत्तीवर अनेक दिग्गजांनी नाराजी व्यक्त केली आहे. पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विन गोलंदाजी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper