Breaking News

Ramprahar Reporters

वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडीची घडी न बसल्याने स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक रिंगणात उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीची पहिली उमेदवार यादी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी (दि. 15) जाहीर केली. केवळ 11 मतदारसंघ वगळता 37 उमेदवारांची घोषणा आंबेडकर यांनी पहिल्याच झटक्यात करून टाकली आहे. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची यादी जाहीर …

Read More »

विद्यार्थ्यांनी शाळेत फुलवला मळा

कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील बार्णे येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून फूलझाडांची व भाजीपाल्याची लागवड केली. याद्वारे त्यांनी व्यावसायिक शिक्षणाचा धडा गिरवला आहे. बार्णे शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात मोकळ्या जागेत काकडी, शिराळी, घोसाळी, दुधी, माठ, भेंडी, पालक, कोथिंबीर, टोमॅटोच्या रोपांची कार्यानुभव या विषयांतर्गत लागवड केली. त्यांनी या रोपांची देखभाल केली …

Read More »

शेकापने विकासाऐवजी पोरखेळ केला -राजाराम जंगम

पनवेल : रामप्रहर वृत्त सत्तेचा उपयोग गावाच्या आणि परिसराच्या विकासासाठी केला जातो, मात्र कर्नाळा ग्रामपंचायतीत शेकापने सत्तेचा दुरुपयोग करून विकासाऐवजी पोरखेळ केला आहे, अशी टीका माजी सरपंच राजाराम जंगम यांनी केली आहे. भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पनवेल तालुक्यातील कल्हे येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन कर्जतचे नगरसेवक नितीन सावंत यांच्या हस्ते झाले. …

Read More »

मावळमध्ये शेकापची ताठर भूमिका राष्ट्रवादीला ठरतेय डोकेदुखी

कर्जत : बातमीदार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ हे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे, मात्र पार्थ यांना शेतकरी कामगार पक्ष सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे. पार्थ पवार यांनी प्रामुख्याने उरण, पनवेल या विधानसभा मतदारसंघात जाऊन शेतकरी …

Read More »

पार्थ पवार यांना अखेर मावळमधून उमेदवारी जाहीर

पार्थ पवार यांना अखेर मावळमधून उमेदवारी जाहीर मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी (दि. 15) आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत पक्षाचे बडे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना अखेर मावळमधून उमेदवारी घोषित झाली आहे. यादीतील बहुतांश उमेदवार नवखे आहेत. दुसर्‍या यादीत राष्ट्रवादीने 12 उमेदवार जाहीर …

Read More »

गोवठणे येथे उद्या फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धा

उरण : रामप्रहर वृत्त सह्याद्री शैक्षणिक, सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वर्तक यांच्या वतीने होळी सणाचे औचित्य साधून रविवारी (दि. 17) 40 वर्षांवरील (फोर्टी प्लस) खेळाडूंची क्रिकेट स्पर्धा उरण तालुक्यातील गोवठणे येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा उरण पूर्व विभाग मर्यादित असून, प्रथम तीन विजेत्यांना रोख रक्कम व पारितोषिक देण्यात …

Read More »

आमची युती विचारांची : मुख्यमंत्री

अमरावतीमध्ये महामेळावा; भाजप-शिवसेनेचा झंझावात अमरावती : प्रतिनिधी भाजप-शिवसेना युती केवळ सत्तेसाठी नाही; तर ही युती विचारांची आहे. आम्हाला अभिमान आहे आम्ही हिंदुत्ववादी पक्ष आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 15) येथे केले. युतीच्या घोषणेनंतर पहिला संयुक्त महामेळावा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. …

Read More »

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव धोक्याची घंटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था घरचे मैदान गाजवणार्‍या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारताने न्यूझीलंडविरुद्धची वन डे मालिकाही जिंकली. आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघाचा हा फॉर्म अतिशय चांगला असल्याने अनेकांनी भारताला विश्वचषक विजयासाठी प्रबळ दावेदार मानले होते, मात्र घरच्या मैदानावर विराट कोहलीच्या भारतीय संघाला …

Read More »

कर्नाटकने जिंकला सय्यद मुश्ताक अली चषक

इंदूर : वृत्तसंस्था मयांक अगरवालची तुफानी फटकेबाजी आणि रोहन कदमच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर कर्नाटकने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राला आठ गडी व नऊ चेंडू राखून धूळ चारत विजेतेपदाला गवसणी घातली. या पराभवामुळे तब्बल नऊ वर्षांनंतर स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचे महाराष्ट्राचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. नौशाद शेख (नाबाद 69) …

Read More »

आला रे आला… युवराज आला!

मुंबई : प्रतिनिधी मुंबई इंडियन्सचा संघ चौथ्यांदा इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल जेतेपदाचा चषक उंचावण्यासाठी सज्ज झाला आहे. तीन वेळा विजेतेपद पटकावणार्‍या मुंबईने 2018मध्ये समाधानकारक कामगिरी केली आणि 2019साठीच्या लिलावात त्यांनी अगदी अखेरच्या क्षणाला युवराज सिंग व लसिथ मलिंगाला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. मलिंगाने यापूर्वीही मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले …

Read More »