Breaking News

Pravin Gaikar

खोपोली शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करा

बाळासाहेबांची शिवसेना सीईओंच्या दालनात खोपोली : प्रतिनिधी अपुर्‍या व अनियमीत पाणीपुरवठ्याने खोपोलीतील नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील या पाणी प्रश्नाबाबत बाळासाहेबांची शिवसेना आक्रमक झाली आहे. शहरातील  पाणीपुरवठ्या संदर्भात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रतिनिधींनी गुरुवारी (दि. 24) नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अनुप दुरे यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेऊन चर्चा केली. खोपोली …

Read More »

भाजपच्या पंचायत राज व ग्रामविकास विभाग संयोजकपदी शर्मिला सत्वे यांची नियुक्ती

माणगाव : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या पंचायत राज व ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने भाजपच्या संयोजकपदी माणगाव येथील पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या शर्मिला शिवराम सत्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गणेशकाका जगताप, युवानेते विक्रांत पाटील यांच्या हस्ते नुकताच शर्मिला सत्वे यांना  नियुक्तीपत्र देण्यात आले. …

Read More »

शिलालेखातील त्रुटी सुधारण्याची मागणी

अलिबाग : प्रतिनिधी आक्षी येथील आद्य शिलालेखाचे नुकतेच रायगड जिल्हा परिषदेमार्फत  संवर्धन आणि सुशोभीकरण करण्यात आले. त्या वेळी शिलालेख परिसरात लावण्यात आलेल्या माहिती फलकांच्या मजकूरातील अनेक त्रूटी समोर आल्या आहेत. त्या तातडीने दुरुस्त कराव्यात, अशी मागणी इतिहास अभ्यासकांकडून केली जात आहे. आक्षी येथील मराठीतील आद्य शिलालेख कित्येक वर्ष दुर्लक्षीत अवस्थेत …

Read More »

बोरघाटात डांबराच्या टँकरने घेतला पेट; वाहतुकीचा खोळंबा

खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटातील एचओसी ब्रिज मॅजिक पॉईंटजवळ डांबर वाहतूक करणार्‍या टँकरला बुधवारी (दि. 23)सायंकाळी 7च्या सुमारास अचानक आग लागली. खोपोली आणि महामार्गावरील अग्निशमन दलाच्या जवानांनी लागलीच धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेमुळे द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुमारे 20 मिनिटे खोळंबली होती. या घटनेचे वृत्त समजताच …

Read More »

कालवा सफाईच्या कामाला मुहूर्त सापडेना!

माणगावातील शेतकर्‍यांना पाण्याची प्रतीक्षा; रब्बी हंगामातील शेतीची कामे अडली माणगाव : प्रतिनिधी काळ प्रकल्पांतर्ग डोलवहाळ बंधार्‍याचे पाणी दरवर्षी 15 डिसेंबरदरम्यान डाव्या कालव्यातून माणगाव तालुक्यातील शेतीला सोडले जाते, मात्र या वेळी नोव्हेंबर महिना संपत आला तरी या कालव्यांच्या सफाईची कामे पाटबंधारे विभागाने अद्यापही हाती घेतली नाहीत. यंदा अतिवृष्टीमुळे  या कालव्यात मोठ्या …

Read More »

रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 : पनवेलच्या प्रसाद ढवळेची महाराष्ट्र संघात निवड

पनवेल : रामप्रहर वृत्त रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मार्फत (राष्ट्रीय ट्रायल) म्हणजे राष्ट्रीय निवड चाचणी यामध्ये रायगड जिल्ह्यातील पनवेलचा रहिवासी प्रसाद महेश ढवळे याची महाराष्ट्र संघात पाचव्यांदा निवड झाली आहे. ही चॅम्पियनशीप 10 ते 22 डिसेंबर 2022 रोजी बेंगळूरू येथे होणार आहे. प्रसाद …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात सामंजस्य करार

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात सोमवारी (दि. 21) आजीवन अध्ययन व विस्तार विभाग व सहज योगा संस्था  खारघर या दोन्ही संस्थेमध्ये सामाजिक करार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी श्री. रणागमणार व सी. डी. आर. धारासिंग हे दोन्ही प्रतिनिधी म्हणून …

Read More »

भाजप नेते अरुणशेठ भगत यांचे गव्हाण विद्यालयात अभीष्टचिंतन

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन आणि रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य तथा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयाच्या वतीने त्यांचे …

Read More »

कळंबोलीत हिंदू राष्ट्र जागृती सभा

मान्यवरांकडून मार्गदर्शन कळंबोली : बातमीदार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास युवकांना शिकवून देशभक्त युवा पिढी घडविण्यास पालकांनी पुढाकार घ्यावा. हिंदू तरुण पिढीला धर्मशिक्षण देण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतल्यावर घरोघरी देशभक्त आणि धर्माविषयी ज्ञानी पिढी निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन कळंबोली येथील वर्तक क्लासेसचे संचालक संतोष वर्तक यांनी केले. कळंबोली येथे …

Read More »

एनएमएमटी, बेस्ट थांब्यांवर गर्दुल्ल्यांचे बस्तान

नेरूळमधील अनेक ठिकाणी प्रवाशांची गैरसोय नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई मनपा परिवहन उपक्रमाकडून नेरूळमधील विविध ठिकाणी बसथांबे-डेपो उभारले गेले, पण या बसथांब्यामध्ये असलेल्या आसन व्यवस्थेच्या ठिकाणी प्रवासी असणे अत्यावश्यक आहे, मात्र त्या ठिकाणी चक्क भिकारी, बेघर नागरिक व नशापान करणारे व्यक्ती वामकुक्षीचा आनंद घेत असल्याने प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत …

Read More »