सर्व व्यवहार बंद कर्जत : बातमीदार – नेरळ येथील एक तरुण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने हे गाव सील करण्यात आले आहे, तर बाजारपेठ ग्रामपंचायतीने पुढील चार दिवस बंद ठेवली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. या बंदच्या मंगळवार (दि. 21)च्या पहिल्याच दिवशी नेरळमध्ये शुकशुकाट दिसून आला. नेरळमध्ये आढळलेला …
Read More »खालापूर तहसील कार्यालयात सोशल डिस्टन्सिंगला हरताळ
खालापूर : प्रतिनिधी – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन व संचारबंदीची मुदत 3 मेपर्यंत वाढविल्यानंतर खालापूर तहसील कार्यालयात विविध कामांसाठी भाऊगर्दी होत आहे. या वेळी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक असणार्या सामाजिक अंतराचा (सोशल डिस्टन्सिंग)नियम धाब्यावर बसविला जात आहे. तहसील कार्यालयात गाड्यांना पासेस मिळण्यासाठी तसेच शेतीची देवाण-घेवाण करणार्यांची संख्या जास्त असून तहसीलदारांच्या …
Read More »पनवेलच्या सीकेटी महाविद्यालयाचा भारतातील पहिल्या शंभरात समावेश
‘एज्युकेशन वर्ल्ड’ची टॉप रँकिंग यादी जाहीर पनवेल : रामप्रहर वृत्त – राष्ट्रीय स्तरावरील एज्युकेशन वर्ल्ड या मासिकाने एप्रिल 2020च्या विशेषांकामध्ये सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील भारतातील खासगी स्वायत्त महाविद्यालयांमध्ये अव्वल स्थान मिळवलेल्या महाविद्यालयांची यादी जाहीर केली आहे. या यादीत दर्जेदार शिक्षणासोबत कला, क्रीडा, सामजिक क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी करणार्या नामवंत अशा …
Read More »खारघरच्या पोलिसाला कोरोना
रायगडात तीन नवे रुग्ण; दोन पनवेलमधील, तर एक पोलादपूरचा; जिल्ह्यात एकूण 57 कोरोनाग्रस्त पनवेल, पोलादपूर : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 21) कोरोनाचे एकूण तीन नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात पनवेल तालुक्यातील दोन, तर पोलादपूरमधील एकाचा समावेश आहे. पनवेलमधील दोन रुग्णांपैकी एक पोलीस आहे. या नव्या तीन रुग्णांमुळे …
Read More »खोपोलीत वाहतूक बदल
खोपोली : प्रतिनिधी – येथील नगर परिषद आणि पोलीस ठाणे यांच्या वतीने लॉकडाऊन कालावधीत पालिका हद्दीतील काही ठिकाणी रस्त्यावर बॅरिकेट्स लावून वाहतूक नियंत्रित करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी याबाबत सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावे. त्याचप्रमाणे लॉकडाऊन काळात विनाकारण रस्त्यावर येऊ नये, असे आवाहन …
Read More »‘टाटा स्टील’कडून खोपोलीत मदत
खोपोली : प्रतिनिधी – आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवरील कोविड-19चा प्रभाव भारतातील छोट्या शहरांमध्ये आणि गावांमध्येही पसरत आहे. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील खोपोलीतील टाटा स्टील बीएसएल प्लांटच्या हौसिंग कॉलनीतील स्वयंसेवक आजूबाजूच्या स्थानिक समुदायातील गरीब आणि स्थलांतरित कामगारांच्या अत्यावश्यक गरजापूर्ण करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. कंपनीच्या हौसिंग कॉलनीतील क्रिएटिव्ह सोल्स लेडीज क्लबच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवकांनी …
Read More »चौल ब्राम्हण समाजाकडून शासनाला मदत
रेवदंडा : प्रतिनिधी – कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी चौल येथील ब्राम्हण समाज या संस्थेकडून पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी अशा दोन्हीमध्ये प्रत्येकी 35 हजार म्हणजेच एकूण 70 हजारांची मदत शासनाला देण्यात आली आहे. मदतीचे हे धनादेश संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जोगळेकर व सचिव नृपेन विद्वांस यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी …
Read More »रोह्यात गावठी दारूविरोधात पुन्हा कारवाई
रोहे : प्रतिनिधी – रोहा तालुक्यात पोलिसांकडून गावठी दारूच्या विरोधात छापासत्र अवलंबले असून, काही दिवसांच्या अंतरात पोलिसांनी झापडी येथे दुसरी कारवाई केली. या कारवाईत एकूण 39 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला. याआधी बेलवाडी येथे छापा टाकून गावठी दारुचा अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. कोरोना विषाणूवर नियंत्रण …
Read More »कोरोनामुळे लघु उद्योग अडचणीत
वीटभट्टी कामगारांवर उपासमारीची वेळ पेण : प्रतिनिधी – कोरोनाचा वाढता प्रभाव व यामुळे लॉकडाऊनमध्ये केलेल्या वाढीचा फटका लघु उद्योगाला बसत आहे. यातून पेण तालुक्यातील वीटभट्टी व्यवसायही अडचणीत आला असून या कामगारांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. जानेवारी ते मे महिन्यात वीटभट्टी व्यवसाय तेजीत असतो, मात्र याच कालावधीत लॉकडाऊन सुरू झाल्याने …
Read More »ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यांत झाली वाढ
पनवेल : वार्ताहर – लॉकडाऊन हा 3 मेपर्यंत वाढविण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक घरातच वास्तव्यास आहेत. अशा लोकांना ऑनलाइनच्या माध्यमातून फसवणुकीच्या प्रकाराला सुरूवात झाली असून त्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात येवू लागल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ऑनलाइन दारु खरेदी करा, ऑनलाइन आंबे खरेदी करा, वेगवेगळ्या योजना, पैसे गुंतवणुकी संदर्भात आकर्षक योजना, नोकरी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper