Breaking News

Pravin Gaikar

टंचाई आराखड्यात रायगड जिल्ह्यातील पाच तालुक्यांसाठी 44 विंधण विहिरींना मंजुरी

म्हसळा : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यातील रोहा, माणगाव, तळा, म्हसळा, व श्रीवर्धन या पाच तालुक्यांना 44 विंधण विहीर खोदाईला रायगड जिल्हाधिकारी यानी मंजुरी दिली आहे. रोहा तालुका तीन गाव पाच वाड्यांसाठी आठ विंधण विहीरी, माणगाव तालुका तीन गावे सात वाड्यांसाठी 10 विंधण विहीरी,तळा तालुका दोन गावे 10 वाड्यांसाठी 12 विंधण …

Read More »

संक्रमण आणि दिलासा

कोरोनाने आपला विळखा भारतातही घालायला सुरुवात केली आहे. कोविड-19चे नवे रुग्ण दररोज देशभरात आढळत असून, मृतांचा आकडाही हळुहळू पुढे सरकत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव देशात होत असताना या महाभयंकर आजारातून बचावणारेही आहेत. ही दिलासादायक बाब म्हटली पाहिजे. कोरोनावर मात करायची असेल, तर नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. संसर्गजन्य रोग कोरोनाने जगातील …

Read More »

रुग्णालयीन कर्मचार्यांना कोरोनाविषयक प्रशिक्षण

कर्जत ः बातमीदार – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील आरोग्य अधिकारी-कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी आरोग्य कर्मचार्‍यांनी आपल्या समस्या आणि मागण्या पुढे करून त्यांच्याकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग तसेच जिल्हा प्रशिक्षण केंद्रप्रमुख सुचिता गवळी …

Read More »

विनापरवाना वाहनचालकांवर कारवाई

रोहे : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊन काळात नागरिकांनी गर्दी करू नये, घराबाहेर पडू नये, विनापरवाना व विनाकारण वाहने घराबाहेर काढू नये, अशा सूचना वारंवार पोलिसांकडून दिल्या जात आहेत. तरीही विनापरवाना वाहने घेऊन फिरणार्‍या वाहनचालकांवर कोलाड सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. …

Read More »

पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप

प्रोग्रेसिव्ह इंडिया फाऊंडेशनचा उपक्रम पाली ः प्रतिनिधी – कोरोनासारख्या राष्ट्रीय आपत्तीत आपले कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे व  जबाबदारीने पार पाडणार्‍या पोलीस बांधवांना प्रोग्रेसिव्ह इंडिया फाऊंडेशनच्या वतीने मास्क, सेनेटायझर, पाणी आदींचे वाटप करण्यात आले. अखिल मानव जातीवर कोरोनाचे संकट ओढवले आहे, मात्र या आणीबाणीच्या स्थितीत पोलीस बांधव रात्रंदिवस जीवाचे रान करून कायदा-सुव्यवस्था …

Read More »

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी मांडावणे ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम

16 नागरिकांची अतिदक्षता टीम सज्ज कडाव ः वार्ताहर – भारतातील प्रत्येक राज्य, जिल्हा, तालुका आणि स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात ग्रामपंचायती कोरोनाशी लढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतात. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील मांडावणे ग्रामपंचायतीने वेगळी शक्कल लढवत आपल्या गावातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी ग्रामपंचायतीमधील 16 नागरिकांची अतिदक्षता टीम तयार करून तिचे चार …

Read More »

कर्जतचे कोरोना संकट तूर्तास टळले

सात जणांच्या टेस्ट निगेटिव्ह; जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू कर्जत ः बातमीदार  – नेरळमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सात जणांच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्यावर आलेले कोरोना संकट सध्या तरी टळले असून गेली चार दिवस लॉकडाऊन असलेल्या नेरळ आणि कर्जत येथील बाजारपेठेमधील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आता उघडल्याने …

Read More »

लॉकडाऊन काळात घ्या स्पर्धेत सहभाग

विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध स्पर्धा पनवेल : प्रतिनिधी – कोरोनामुळे व्यक्ती, कुटुंब, देश आणि जगावर झालेल्या परिणामांबद्दल मला काय वाटतं? यासाठी स्मार्ट ब्रेन स्किल्स अ‍ॅण्ड एज्युकेशन आणि नॅचरल हेल्थ अ‍ॅण्ड एज्युकेशन फाऊंडेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने निबंध आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे विषय 1) कोरोना : वस्तुस्थिती, उपाय …

Read More »

मोकाट फिरणार्या वाहनचालकांवर रायगड पोलिसांची कारवाई

51 लाखांचा दंड वसूल पाली : प्रतिनिधी – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही अनावश्यक घराबाहेर पडून वाहन चालवणार्‍यांवर रायगड पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 51 लाख 15 हजार 100 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. कोविड-19 या महामारीला सामोरे जात असताना …

Read More »

रेशनिंगवर तांदळाचे मोफत वितरण

पनवेल : बातमीदार – केंद्र सरकारने लागू केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी व अंत्योदय अन्न योजना लाभार्थी शिधापत्रिका धारकांना नियमित अन्नधान्याच्या वाटपाला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ वाटप एप्रिल 2020 पासून सुरू करण्यात आले आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, …

Read More »