पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल महापालिकेच्या नगरसेविका सुशीला घरत यांचा वाढदिवस शैक्षणिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. त्याअंतर्गत नवीन पनवेलमधील सीकेटी स्कूलमध्ये अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गौरव, दाखले वाटप, तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन सोमवारी (दि. 15) करण्यात …
Read More »भाजप नेते महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त वह्यावाटप
उरण ः वार्ताहर – जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि. 17) उरण नगराध्यक्षा सायली म्हात्रे व भाजप शहर अध्यक्ष व नगरसेवक कौशिक शहा यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम नगर परिषद शाळा क्र. 1 व 2 येथे होणार आहे. या …
Read More »कॅन्सर जागरूकता शिबिर
पनवेल मनपाचा मार्गदर्शनपर उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने गर्भाशय, मुख व स्तनाच्या कॅन्सरबद्दल जागरूकता व बचाव करण्याकरिता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन सोमवारी (दि. 15) करण्यात आले होते. हे शिबिर आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. …
Read More »महेश बालदी-द प्रोटॉन मॅन
एखादे काम करायचे असेल तर त्याला सतत पाठपुरावा आणि मानसिकता आवश्यक असते. त्याच अनुषंगाने अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेले उरणकरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम भाजप नेते महेश बालदी यांनी पूर्ण करून आता उरणला स्मार्ट करण्याचा दृढनिश्चय केला आहे. प्रोटॉन कधीही आपली सकारात्मकता गमावत नाही, त्याचप्रमाणे उरणच्या विकासासाठी महेश बालदी प्रोटॉन आहेत, …
Read More »नवीन पनवेलमधील वाहतूक कोंडीने नागरिक हैराण
पनवेल रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला सिडकोने नवीन पनवेल वसाहत बनवली. या वेळी सिडकोच्या तत्कालीन अधिकार्यांनी भविष्यात होणार्या विकासाचा वेध न घेतल्याने आज नवीन पनवेलमध्ये वाहतुकीची समस्या भीषण झाली आहे. त्यातच परिवहन खात्याने रिक्षांचे परवाने खिरापतीसारखे वाटले. त्याचे परिणाम पनवेल रेल्वे स्टेशनजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. वाहतूक …
Read More »जलस्रोतांचे नियोजन हवे
उत्तरेकडील काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण होते, तर पश्चिम किनारपट्टीवरही जोरदार पाऊस कोसळतो. परंतु देशाच्या दक्षिणेकडील उर्वरित भागात पाऊस यथातथाच होतो. अत्यल्प पावसामुळे या परिसरात पावसाळा संपताच लगेचच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागते. अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे यंदा तर नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनावरच मोठा परिणाम झाला. यंदाही राज्यात नेहमीप्रमाणे निरनिराळ्या …
Read More »खालापूर येथे राष्ट्रीय लोकअदालत
खोपोली ः प्रतिनिधी – खालापूर दिवाणी न्यायालय क स्तर तालुका विधी सेवा समिती अंतर्गत शनिवारी 13 जुलै रोजी खालापूर न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणे व वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. यात खालापूर तालुक्यातील एकूण 44 ग्रामपंचायती, नगर परिषद, नगरपालिका, महावितरण, बीएसएनएल व विविध बँका …
Read More »पालकमंत्र्यांच्या हस्ते माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या वास्तूचे उद्घाटन
माणगाव ः प्रतिनिधी – माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या नवीन विस्तारित इमारतीचे उद्घाटन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी (दि. 13) करण्यात आले. माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या सहकार्यातून अशोकदादा साबळे विद्यालय …
Read More »‘माथेरानचा शारलोट तलाव गाळमुक्त करा’
कर्जत ः बातमीदार – माथेरानकरांची व येथे आलेल्या पर्यटकांची तहान भागवणारा महत्त्वपूर्ण ब्रिटिशकालीन तलाव गेली पाच वर्षे साफ करून गाळमुक्त केला नसल्याने मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने तो गाळ काढून हा तलाव गाळमुक्त करून नागरिकांना व पर्यटकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी द्या, अशी मागणी येथील स्थानिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे केली आहे. माथेरान …
Read More »तक्रार
पनवेल एसटी स्टँड. सकाळची वेळ. दुसर्या दिवशी एकादशी असल्याने पंढरपूरला जाणार्यांची मोठी गर्दी होती. मुंबई, ठाणे, बोरिवली आणि पालघरकडून पंढरपूरला जाणार्या गाड्या येत होत्या, पण त्यात बसायला जागा नसल्याने कोणी गाडीत चढत नव्हते. एक पाच-सहा मध्यमवयीन व्यक्तींचा ग्रुप आला. त्यांनाही पंढरपूरला जायचे होते. पनवेलहून सुटणारी गाडी आता नसल्याचे समजल्याने त्यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper